आपल्या देशातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही याची माहीती सरकारला झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या दुर्गम भागातील एक लाख शाळांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय स्वागतार्ह असला तरी देशातल्या शाळांची दयनीय परिस्थिती समजायला २००८ साल उजाडावे लागले ही शोकांतिका आहे.पिण्याच्या पाण्यासोबतच फळा,मैदाने.स्वच्छताग्रुहे,यांचीही बिकट अवस्था शाळांमध्ये आहे.याची जाणीवही सरकारला व्हावी.असो, देशभरात राबविल्या जाणार्या या योजनेमुळे आदीवासीबहुल जिल्हे,मराठवाडा,विदर्भातील दूरच्या वाड्या-वस्त्यांवर भरणार्या शाळांना तसेच हिमालयाच्या कुशीत असणारी राज्ये यांना फायदा घेता ये़ता येईल हे मात्र निश्चित..!
वाचने
1839
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
तहानलेल्या शाळांना आता पा़णी मिळणार?
ज्ञानदाना
In reply to तहानलेल्या शाळांना आता पा़णी मिळणार? by सुक्या
शिक्षण