साहित्य-
१२५ ग्राम बटर/तूप/लोणी,१२५ ग्राम साखर,३ अंडी,लिंबाची किसलेली साल १ चमचा
१.५ चमचा लिंबाचा रस,१ चिमूट मीठ,२०० ग्राम मैदा,१/४ कप दूध
२ चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर
चेरी ५०० ते ७५० ग्राम - काचेच्या बरणीत अथवा टीनमध्ये शुगरसिरपमध्ये असलेल्या आंबटगोड चेरी मिळतात त्या घ्याव्या. जर्मनीत राहणार्यांनी sauerkirchen/schatten-morellen नावाने ज्या काचेच्या बरणीतील चेरी मिळतात त्या घ्याव्या.
चेरीऐवजी टिन्ड अननस वापरूनही हा केक करता येतो आणि खूप छान लागतो.
कृती-
बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.१ चिमूट मीठ,लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे.मैदा व बेकिंग पावडर एकत्र करणे. मैदा थोडा थोडा घालत फेटणे. शेवटी दूध घालून फेटणे.
ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे.
चेरी चाळणीवर ओतणे व पाक काढून टाकणे. आता ह्या चेरीज् गोलाकार आकारात अंतराअंतरावर केकवर हलकेच बसवणे.
अवन प्री हिट करणे.१८० अंश से. वर ४५ मिनिटे बेक करणे.
बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभीत करणे.अथवा व्हिप्ड क्रिम घालून खाणे.
असा-:)
प्रतिक्रिया
जबरदस्त..
अगं
तात्यांना सांगुन तुमच्या लिखाणावर बंदी घातली पाहिजे.
:)
In reply to तात्यांना सांगुन तुमच्या लिखाणावर बंदी घातली पाहिजे. by वेताळ
स्वातीताई,
In reply to :) by स्वाती दिनेश
बटर आणि लोणी
In reply to स्वातीताई, by निमीत्त मात्र
तात्यांना सांगुन तुमच्या लिखाणावर बंदी घातली पाहिजे.
सह्ही!!
मस्त पाकृ
स्वातीआंट
वाहवा ! फार
वा !
अगगगग!
ड्राइड चेरीज्
In reply to अगगगग! by रेवती
च्यामारी,,,
वा!
हा हा हा
In reply to वा! by ऋषिकेश
असेच!
In reply to हा हा हा by सहज
>>आम्ही
मस्त
छान
धन्यवाद.
काय
मस्त रेसिपी!
स्वातीताई,