Skip to main content

EMI - एकदा तरी बघाच

लेखक योगी९०० यांनी रविवार, 09/11/2008 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
Wednesday नंतर जेवढे नवीन चित्रपट आले, ते मी अर्ध्यावरच सोडून दिले. 'द्रोणा'' तर पहिल्या पंधरा मिनीटानंतरच बंद केला. आज खुपच कंटाळा आला आणि बर्याच दिवसांनी उर्मिला आणि संजूबाबाचा चित्रपट म्हणून EMI बघायला घेतला. अर्थात मान्यवर समिक्षकांनी दोनच स्टार दिले असले तरी थोडा पहावा असा विचार केला. चित्रपट तसा हलका फुलकाच आहे. पण आशय महत्वाचा. "कर्ज काढून सण साजरे करू नये" हे सांगण्याचा प्रयत्न आहे. तशी कथा चार वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर फिरते. सर्वानाच पैसा हवा आहे.

कार्यरत राहिल्याने हिम्मत येते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 08/11/2008 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्मिता करमरकरला जर का तुम्ही लहानपणी पाहिली असतीत तर आता एव्हडं धारिष्ट दाखवणारी आणि एव्हडं विश्वासाने बोलणारी हीच का ती, असा मनात संभ्रम झाला असता.निदान मला तरी तसं वाटतं. "तुझ्यात एव्हडं परिवर्तन कसं झालं?" ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्दायला सुंदर संधी आली आहे असा विश्वास चेहर्‍यावर दाखवून ती मला म्हणाली, "माझा भाऊ एका अपघातात गेला.माझ्या आईला त्या घटनेचा एव्हडा धक्का बसला होता की तिचं सान्तवन करणं महाकठीण होतं.मी त्यावेळी फक्त चार वर्षाची होती.त्यामुळे माझ्या आईचा सुरक्षतेकडे बघण्याचा कल किती बदला ते माझ्या लक्षात आलं.

न्युपोर्ट् वरिल संध्याकाळ

लेखक सूर्य यांनी शनिवार, 08/11/2008 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, सध्या मी जिथे काम करतो आहे, ते आहे न्युपोर्ट, न्यु जर्सी इथले ठिकाण. संध्याकाळच्या वेळेस इथे मस्त वातावरण असते. ते टिपण्याचा प्रयत्न केला आहे. हे आहे न्युयॉर्क सिटीचे न्युपोर्ट वरुन होणारे दर्शन. NewPort - 1 हे माझे ऑफीस. इथे चौदाव्या मजल्यावर सकाळपासुन कॉम्प्युटरमधे डोके घालुन बसलेलो असतो. ;).

को जागर्ती !

लेखक चाफा यांनी शनिवार, 08/11/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
"को जागर्ती?".......... सॉSSल्लीड दचकलो मी. एक तर रात्र इतकी झालेली त्यात स्टडीरुम मधे मी एकटाच. त्यात आज पौर्णीमा म्हणुन खिडकी उघडी टाकलेली. अश्यावेळी जर असं कुणी म्हणालं तुमच्या मागे, तर तुम्ही नाही दचकणार? दचकाल ना? मी पण जोरात दचकलो. इतका की बुडाखालची खुर्ची खर्रर्रर्रकन आवाज करत सरली. "को जागर्ती?" पुन्हा एकदा. जरा सावधपणे आजुबाजुला नजर फ़िरवली अंSSहं कुणी नाही, बाहेर येउन बेडरुमच्या दारातुन नजर टाकली सौभाग्यवती गाढ झोपलेली. आईशप्पत, ही झोपेत बडबडते की काय ?

सुन्न करणारं "कोल्ह्याट्याचं पोर"

लेखक आनंदयात्री यांनी शनिवार, 08/11/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
*कोल्ह्याट्याचं पोर हे छोटेखानी पुस्तक वाचल्यावर त्याबद्दल मिपावर लिहण्याचा मोह आवरला नाही.*
आई तेच ते गाणे म्हणुन थकली होती. मग कसतरी म्हणु लागली. तो इन्स्पेक्टर नशेत आईला म्हणाला, "तुझ्या आईची पु*. पैसे लय झाले का, गाणं चांगलं म्हण की !" आईनं पेटी मास्तराची चप्पल घेतली आणी तशीच भिरकावुन मारली; म्हणाली, "तुझ्या मायला पु* नाही का ? विनापु*तुन आलास का रं ?" आई खुप चिडली होती.
अगदी लहान असतांना अजाणत्या वयात अश्या अनेक घटना पहाणारं कोल्ह्याट्याचं पोर त्याचं आख्खं बालपण आईला तिच्या मायेला पारखं होतं.

भूपाळी (देवद्वार छंद)

लेखक घाटावरचे भट यांनी शनिवार, 08/11/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही नुकतीच धोंडोपंतांची नव्याने सुरु झालेली छंदशास्त्राची शिकवणी लावलेली आहे. हा पहिल्या धड्यावरचा गृहपाठ. उठा हो दयाळा प्रभात जाहली पाहा उजळली पूर्व दिशा भेटीसाठी झाले जन सारे गोळां भक्तांचा हा मेळां वाट पाहे दाखवा हो रूप सावळें सुंदर अति मनोहर आम्हालागीं तुम्ही राम आम्हा तुम्ही कृष्ण आम्हा विठ्ठलही आम्हा तुम्हाठायी द्या हो सर्वां सुख आरोग्य सावली करा ब्रीदावली काही सार्थ भटू म्हणे नाही मजला कवित्व केवळ ममत्व ईश्वराचे अजाणतेपणी काही केला यत्न दगडच रत्न माना ऐसे

चान्द्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं!

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 08/11/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
टी ऑफ आय मधील बातमी पुढे काय? कुणी माहिती सांगितली तर वाचायला आवडेल. चिनी ब्लॉग्स वर मात्र या मोहिमेच्या यशाविषयी बर्‍याच कुशंका व्यक्त केल्या जाताहेत असं वाचण्यात आलं, वस्तुस्थिती काय आहे?

नेपाळी बटाटा

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 08/11/2008 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आजोबा आटगांवला असताना त्यांच्या कडे एक नेपाळी गुरखा खानसामा होता,तो अशी भाजी करायचा. अशी बाबा त्यांच्या लहानपणीची आठवण सांगतात.

देवद्वार छंद

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 08/11/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, वृत्तबद्ध काव्य ज्यांना लिहायचे आहे त्यांनी एक एक वृत्तावर प्रभुत्व मिळवावे. एकदम भाराभर वृत्ते समोर घेऊन बसू नये. त्यातही तीन पायर्‍या आहेत. सर्वप्रथम १) छंदांवर प्रभुत्व मिळवावे. त्यानंतर २) छंदात लिहिणे जमू लागले की जातींमध्ये लिहायला सुरूवात करावी. आणि शेवटी ३) जातींमध्ये लिहिता यायला लागले की मग अक्षरगणवृत्तात लिहिण्याच्या पायरीवर जावे. एकदम सुरूवातच मालिनी किंवा शार्दूलविक्रीडित सारख्या वृत्तांची निवड केल्यास जमणार काहीही नाही आणि त्यातून फ्रस्ट्रेशनमात्र भरपूर येईल. एवढं येईल की ते आयुष्यभर पुरेल.
Taxonomy upgrade extras

छंदशास्त्र

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 08/11/2008 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव वर लवकरच आम्ही छंदशास्त्राचे सदर सुरू करीत आहोत. मिसळपाववर काव्यलेखनाची उर्मी अनेकांना आहे. त्यांची प्रतिभाही चांगली आहे. पण आमच्या पाहण्यात असे आले आहे की, अनेक नवोदित कवींची वृत्तांवर पकड नाही. वृत्तात निर्दोषपणे लिहिता येणे अत्यंत आवश्यक आहे. वृत्तात कविता फसली की भातात खडा आल्यासारखे ते काव्य खटकते. परिणामी त्यातील रंजकता निघून जाते. मराठीत अनेक उत्तमोत्तम वृत्ते आहेत. पण आज दुर्दैवाने मुक्तछंदाच्या नावाखाली पाडल्या गेलेल्या तथाकथित काव्याकडे अनेकांचा ओढा आहे. वृत्तात लिहायचे म्हणजे ते वृत्त अंगवळणी पडेपर्यंत श्रम घ्यायला लागतात.