Skip to main content

संकीर्ण शंकासुर

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 11/11/2008 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर येण्यातल्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे अनेक प्रकारची माहिती मिळणे. मी कितीही मूलभूत प्रश्न विचारला तरी मला इथे "काय पावणं , अलिबागहून आला काय ??" अशी ट्रीटमेंट मिळत नाही. (पब्लिक चिमटे काढेल , पण मदत करेलच !) तर अशा नानाविध शंकांचे आचके आपल्याला ( म्हणजे मला !) येत असतात. बर्‍याचदा गूगलगुर्जी उत्तर देतात. एरवी मित्र मैत्रिणी उत्तरे देतात. एवढे करून काही लघु नि दीर्घ शंका राहून जायच्या त्या जातातच. म्हण्टले , मिपावर एक फर्मास धागा बनवून टाकूया : शंकासमाधान ! ज्याला ज्याला अन्यत्र उत्तरे मिळणार नाहीत त्याने/तिने येथे शंका विचारावी. पब्लिक उत्तर देईलच. लगे हाथो सबका भला.

आनंद मना!

लेखक मनोजवम् यांनी मंगळवार, 11/11/2008 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो तसा मी या संकेतस्थळावर नवीनच! म्हणजे येउन बरेच आठवडे झाले...पण नुसतंच वाचन झालं...ते ही कधी कधी...सबबी भरपूर आहेत. पण त्यात वेळ न घालवता मुद्याचं सांगतो. आज ब-याच दिवसांनी पंडित कुमार गंधर्वांचे मनाला अल्लद भिडणारे आणि सुरांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घ्यायला लावणारं अत्यंत तरल असं गाणं ऐकलं आणि जमेल तेवढयांना सांगावसं वाटलं. म्हणून हा खटाटोप. गाण्याचे बोलः "आज आनंद मना, मोरा जो पिया घर आया" मालकंसातली ही रचना. इथे गाण्याची फाइल जोडण्याची व्यवस्था असती तर जरुर पाठवली असती.

अनुष्टुभ छंद - विस्तारीत अष्टाक्षर बांधणी

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 11/11/2008 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
धोंडोपंतांच्या छंदशास्त्रावरील स्तुत्य उपक्रमात माझ्या वतीने ही छोटीशी समिधा समस्त मिसळपावकरी आणि कविवर्य धोंडोपंत यांना सादर अर्पण. देवद्वार, पादाकुलक, अनुष्टुभ, गायत्री, जगती, बृहत असे अनेक छंद आज परिचयाचे आहेत. अनेक श्लोक, स्तोत्रे, वेदांमधील ऋचा, काव्ये, सर्वपरिचित सुभाषिते इ. छंदबद्ध असतातच; फक्त ती गाताना आपल्याला ती अमुक एका छंदात आहेत, याची जाणीव तेव्हढी होत नाही. मात्र छंदशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा आपण छंदांची लक्षणे अभ्यासू लागतो नि परिचित उदाहरणे वाचून ती या लक्षणांशी किती जवळीक साधतात, हे पाहू लागतो, तेव्हा हे विविध छंद अधिक जवळचे वाटू लागतात.
Taxonomy upgrade extras

रेखाटने

लेखक वर्षा यांनी मंगळवार, 11/11/2008 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दोन आवडत्या कलाकारांची रेखाटने करायला घेतली होती. पण ते मूळ फोटो मध्यंतरी पीसी format केला त्यात गायब झाले. कालपरवा आठवून शेडींग करायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. मग नाद सोडून दिला. आता परत नव्यानेच रेखाटावे म्हणते. बघुया. :) माध्यमः Derwent Charcol Medium, RAFFINE 2B Graphite pencil मग काय वाटलं कुणास ठाऊक, चक्क दोन कार्टून्स काढली आणि रंगवलीपण!

तुलना ( अष्टाक्षरी)

लेखक कपिल काळे यांनी मंगळवार, 11/11/2008 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
कवी म्हणू नका मला अशी करु नका घाई रास प्रासांची ओतिली धोंडोपंती सर नाही चार ओळी जुळवल्या कवी होईन का त्याने मूळ प्रेरणा ही दिली त्या हो अस्सल पंताने इंदराचा त्या हो भार जाणे एक एरावत वेद रेड्याने बोलावा नाही त्याची ती ऎपत वसंताच्या मोसमात काक: काक: पिक :पिक: नीर क्षीर विवेकेषु हंस: हंस: बक: बक: जाणे गुणी हो गुणाला निरगुण हा का जाणे जाणे बली महाबली निरबल ते का जाणे शेवटची तीन कडवी “जाने गुनी गुन को”, ह्या अडाणा रागातील ध्रुपदाचा भावानुवाद आहेत.
Taxonomy upgrade extras

कोणी आहे का?

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 11/11/2008 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
सेऊल येथे प्रोजेक्टसाठी रहावे लागेल असे दिसते आहे. मिपावासीयांपैकी कोणी तिथे आहे का? अथवा मिपाकरांच्या ओळखिचे? तिथे एकूण रहाणीमान कसे आहे? How to survive in Seoul? वगैरे माहिती (भारतीयांच्या दृष्टीने) मिळाली तर चांगले होईल. कृपया संपर्क साधा.

अष्टाक्षरी छंद - सहजसुंदर लेखनाचा आनंद

लेखक धोंडोपंत यांनी सोमवार, 10/11/2008 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, देवद्वार छंदावर छान चर्चा झाली . त्याला प्रतिसादही अभूतपूर्व मिळाला. आमचे तात्यासाहेबही उत्तम काव्यलेखन करू शकतात हे देवद्वार ने सिद्ध केले. नानामहाराज चेंगट , सहजराव, मनीषाताई, घाटावरचे भट, मदनबाण, ऋषिकेश, कपिलराव, अरूणपंत मनोहर, दिपोटी, लिखाळपंत, चेतनराव या सर्वांनी या छंदात सुरेख लेखन केले. आमचे लेखन सार्थकी लागल्याचा आनंद मिळाला. त्यानिमित्ताने मिपावर छंदशास्त्र हे स्वतंत्र सदर निर्माण झाले. (इतरत्र कुठेही छंदशास्त्राला वाहिलेले स्वतंत्र सदर आमच्यातरी पाहण्यात नाही.) लोकहो, तुम्हां सर्वांना या धोंडोपंताचा दंडवत. आज अजून एक अत्यंत सोपा आणि गोड छंद घेऊन आलो आहोत.

दयाशील आणि परोपकारी हृदय

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 10/11/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
नंदा प्रधान मॉन्ट्रीयला गेल्यापासून बरीच वर्ष परत आलीच नव्हती.तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती हे मला नक्कीच माहित होतं.तिची मुलं लहान होती त्यावेळेला ती दोन एक महिने इकडे राहिली होती.तिचा मोठा मुलगा दिलीप का नाही आला असं मी विचारल्यावर तिचा चेहरा कावराबावरा झालेला पाहून मलाही थोडं धक्कादायी वाटलं. नंदाने सुरवात अशी केली की काहितरी अघटीत झालं असावं ह्याची मला खात्री झाली. ती मला म्हणाली, माझ्या मुलामुळे माझा दृढविश्वास वाढला.

तिकीट `कलेक्‍टर'

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 10/11/2008 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
कॉंग्रेसच्या सरचिटणीस, आजी-माजी प्रभारी, वर्षानुवर्षांच्या निष्ठावंत नेत्या आणि बंडखोर-सुस्त-अकार्यक्षम नेते-कार्यकर्त्यांच्या कर्दनकाळ मा. मार्गारेट अल्वाताई यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे केवळ कॉंग्रेस नव्हे, तर अख्खा देश, संपूर्ण जग, किंबहुना (भारताचे यान चंद्रावर पोचल्यामुळे) परग्रहांवरील वातावरणही ढवळून निघाले. अवघे भूमंडळ डळमळले. पृथ्वी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे, असे कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांना, निष्ठावंतांना वाटले असणार! (रामानंद सागरांच्या) रामायणातल्या इंद्रजीताप्रमाणे, (बी. आर.