Skip to main content

नरेंद्र मोदी किंवा त्यासदृश निर्भय , रोखठोख, क्रियाशील पंतप्रधान !!

लेखक बबलु यांनी शनिवार, 29/11/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम शहीद झालेल्या सर्व वीरांना सलाम. आज तुमच्यामुळे आम्हाला भारतीय असण्याचा अभिमान वाटतो. मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली. जखमींना लवकर आराम मिळो ही ईश्वराकडे प्रार्थना.
  • गेले ३ दिवस चाललेली धुमश्चक्री,
  • अतिरेक्यांनी मारलेले सामान्य नागरीक / शहीद झालेले उत्कृष्ट पोलीस अधिकारी,
  • न भरून येणार्‍या, भळभळणार्‍या जखमा,
  • पूर्ण शहराला ठप्प करण्याची करामत.
भारतावर झालेला सर्वात भीषण दहशतवादी हल्ला. आपल्याच घरात घूसून आपल्याला जोरदार चपराक मारली या ईस्लामी अतिरेक्यांनी !! एवढं होऊन सुद्धा आपलं सर्वोच्च नेतृत्व काय करतंय...

राजकीय पक्षांची संकेत स्थळे

लेखक विकास यांनी शनिवार, 29/11/2008 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई हल्ल्यानंतर उत्सुकते पोटी कोणकोणत्या प्रमुख राजकीय पक्षांनी शोक "फॉर्मली" व्यक्त करणारी विधाने त्यांच्या संकेतस्थळावर लिहीली आहेत हे पहायला गेलो: काँग्रेसच्या संकेतस्थळावर प्रथम, "Congratulations to Smt Sonia Gandhi for Leading The Congress Party to Victory in the Lok Sabha Elections 2004. This is not only a Victory for Secular India but also a resounding defeat for the Forces of Communalism." अशी ताजी बातमी आली :-). संकेतस्थळावर प्रवेश केल्यावर मग बाकीच्या बातम्या, पण मुंबई हल्ल्यासंदर्भात शब्द नाही...व्हि.पी. सिंगांसंबंधीत काहीच नाही.

माझ्या मनातले!

लेखक अनामिका यांनी शुक्रवार, 28/11/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
४८ तास सुरु असलेले दुष्टचक्र शेवटि संपले म्हणायचे!!!!!!!!!! अजुन संपले नाही असे समजते आहे? ताज मधिल अतिरेक्याचा खात्मा करुन भारतिय सैन्याने ,एनएसजी कमांडोजनी मुंबईला वाचवले असेच म्हणायला हवे. काल शोभा डे पोटतिडकीने या निष्क्रिय सरकारला शिव्यांची लाखोली वहात होती तेंव्हा सहज मनात आल, आता या सगळ्याची आठवण झाली का?

अतिरेक्यांचे राष्ट्रीयत्व

लेखक विकास यांनी शुक्रवार, 28/11/2008 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सीएनएन वर ऐकत असल्याप्रमाणे पॉला न्युटन या लंडनमधील सिक्यूरीटी ऍनॅलिस्ट का तत्सम व्यक्तीने स्कॉटलंड यार्ड आणि मुंबई पोलीसांच्या माहीतीवर आधारीत सांगितले की किमान २ अतिरेक्यांचे राष्ट्रीयत्व हे ब्रिटनचे होते. हे खरे असेल तरी दुद्रैवाने काही नवल नाही... पण मला वाटते की ह्या युद्धास इतर कोणा राष्ट्रातील अतिरेकी जबाबदार असण्यापेक्षा आपल्यास देशातील अतिरेकी जबाबदार आहेत. हे अतिरेकी बंदूका घेऊन जाणारे नाहीत तर बंदुका घेऊन जाणार्‍यांकडे दुर्लक्ष केवळ पैशाच्या हावेचा अतिरेक करणारे आहेत असे वाटते.

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 28/11/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...) हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू. १. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.

स्ट्रेस बस्टर

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 28/11/2008 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
थकला आहात का? डोक्यात कोलाहल आहे का? कामाचा खूप ताण झाला आहे का? हा घ्या स्ट्रेस बस्टर. खुर्चीत सरळ बसा. पाठीला पोक नको एवढच सरळ. हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. बुब्बुळे किंचित वर. श्वासोश्वास नेहेमी प्रमाणे. १०० पासुन उलटे मोजा. (१००,९९,९८,९७,९६)एकदम हळू हळू. मागे वाघ लागल्यासारखे नाही. ० ला आल्यानंतर डोळे एकदम उघडे करु नका. " आता मी डोळे उघडत आहे" हे वाक्य स्वःत शी मनातल्या मनात हळु म्हणा. १ ते ५ मोजा आणि हळु हळु उघडा. बघा काय वाटते ते आणि कळवा. हा प्रयोग करायला सुमारे ३ मिनिटे लागतात. ४ लेक्चर नंतर मी हा प्रयोग करतो. थकवा पूर्ण निघून जातो. पहिल्या वेळी कदाचित रिझल्ट मिळणार नाही.

बेडर!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 28/11/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये माझ्या बाबांचे, ते शाळेत असतानाचे मराठी पाठ्यक्रमिक पुस्तक मला सापडले. त्यांनी ते जपून ठेवले होते. त्या वेळेस मी बराच निराश मनस्थितीत होतो. शिक्षण पूर्ण झालेले होते, पण पुढे काय करावे ते समजत नव्हते. कुणी मार्गदर्शन करणारा भेटत नव्हता. त्यात लोकांचे टोमणे ऐकून जीव विटून जायचा. अशा मनस्थितीत ते पुस्तक हाती पडले. अन त्यातल्या बेडरच्या व्यक्तिचित्राने माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. त्याचीच ही संक्षिप्त ओळख..! सुप्रसिद्ध ब्रिटिश वैमानिक, डग्लस बेडर चा जन्म १९१० सालाचा.

कांदेपोहे

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 28/11/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार कोल्हापुरी दादाचा पुन्हा एकवार रामराम पहिल्या लेखाला एका तासात ५ प्रतिसाद वा...................... त्याच आनंदात हा दुसरा लेख आमचा कोल्हापुरी माणुस अवधुत गुप्तेच्या एका झकास गाण्यावर......
कांदेपोहे
"आयुष्य हे चुलिवरच्या क्ढईतले कांदेपोहे'
सनई चौघडे या चित्रपटातील सध्या तूफान गाजत असलेले हे गाणे.अवधुतच्या संगीतामुळे तर हे गाणे गाजत आहेच .पण काय उपमा वापरली आहे गीतकाराने ! खरच,मानवी आयुष्य आहेच कांदेपोह्यांसारखे .जसे पोह्याचे प्रकार निरनिराळे तसेच प्रत्येक व्यक्ति निरानि