राजकीय पक्षांची संकेत स्थळे
मुंबई हल्ल्यानंतर उत्सुकते पोटी कोणकोणत्या प्रमुख राजकीय पक्षांनी शोक "फॉर्मली" व्यक्त करणारी विधाने त्यांच्या संकेतस्थळावर लिहीली आहेत हे पहायला गेलो:
काँग्रेसच्या संकेतस्थळावर प्रथम, "Congratulations to Smt Sonia Gandhi for Leading The Congress Party to Victory in the Lok Sabha Elections 2004. This is not only a Victory for Secular India but also a resounding defeat for the Forces of Communalism." अशी ताजी बातमी आली :-). संकेतस्थळावर प्रवेश केल्यावर मग बाकीच्या बातम्या, पण मुंबई हल्ल्यासंदर्भात शब्द नाही...व्हि.पी. सिंगांसंबंधीत काहीच नाही. :-(
भाजपच्या संकेतस्थळावर अडवानी आणि वाजपेयींची प्रतिक्रीया आणि आवाहन. वाजपेयींच्या नावाने व्हि.पी.सिंगांना पण श्रद्धांजली होती.
भाजपचे हाडवैरी (आणि उलट!) असलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाच्या संकेतस्थळावर देखील मुंबई हल्ल्यासंदर्भात विधाने तसेच व्हि.पी सिंगांना श्रद्धांजली.
शिवसेनेच्या संकेतस्थळावर ताजे काहीच नसते पण मुखपत्राचे संकेतस्थळ बरेच लिहीत असते. (फायरफॉक्स मधे हा "टायगर" दिसत नाही :-) )
राष्ट्रवादी काँग्रेस अजून काहीच लिहीलेले नाही...
यावरून राजकीय पक्षांची प्रसंगासंबधीची आणि तंत्रज्ञानाच्या वापरा संबंधीची आस्था तरी किमान समजते. बाकी जे काही समजून घेयचे असेल ते घ्या...
वाचने
3383
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
लिंक्स द्या ना!
In reply to लिंक्स द्या ना! by अनंत छंदी
फक्त पक्षावर क्लिक करा
In reply to फक्त पक्षावर क्लिक करा by सागर
सहमत
In reply to फक्त पक्षावर क्लिक करा by सागर
+१/-१
कोरडी सहानुभुती नको ..
In reply to कोरडी सहानुभुती नको .. by सुक्या
प्रश्न सहानभूतीचा नाही
In reply to प्रश्न सहानभूतीचा नाही by विकास
तंत्रज्ञान राहु द्या हो ..
यातना नकोत
सर्व
बाकी जे
करमणूक झाली