भारतीय सैन्याचा विजयच झाला आहे असे मी म्हणेन..
कारण -
भारतीय सैन्यातील निवृत्त तोफखाना अधिकारी असलेले आपल्या मिपाचेच एक सभासद अशोक गोडबोले यांच्याशी काल चर्चा करताना ते असं म्हणाले की ताज, नरीमन भवन, आणि ओबेरॉय येथे लपलेल्या अतिरेक्यांना खणून काढणे हा अतिशोयोक्ति वाटेल परंतु भारतीय कमांडोजकरता तो अक्षरश: १० मिनिटांचा खेळ होता! तरीही केवळ आतल्या बंधकांच्या सुरक्षेचा विचार करता त्यांनी चिकाटीने, होता होईल तो जितक्या बंधकांना वचवता येईल तितक्यांना वाचवून ही ऑपरेशन्स यशस्वी केली आहेत..
अर्थात, आपली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, तसेच सागरी सुरक्षा व्यवस्था यांची मात्र ही हार आहे असेच म्हणावे लागेल. ही अतिरेकी मंडळी इथे आली केव्हा, एवढा प्रचंड दारुगोळा त्यांनी सोबत आणला केव्हा, सगळं प्लॅनिंग केव्हा अन् कसं केलं याचा आपल्या अंतर्गत यंत्रणेला थांगपत्ताही लागू नये ही हारच म्हणावी लागेल..
असो,
शून्य इच्छाशक्ति असलेल्या राजकारण्यांमुळे ढिल्या पडलेल्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमुळे भारतीय सैन्याला विनाकारण ताण पडला आणि १० मिनिटांच्या कामाकरता सैन्याचे बहुमोल ६० तास खर्ची झाले याचे मात्र वाईट वाटते..!
आपला,
(भारतीय सैन्याचा अभिमानी) तात्या.
प्रतिक्रिया
चांगला लेख!
सुहास फडके
लेख ठिक वाटला
भारतीय
खरे आहे तात्या..
In reply to भारतीय by विसोबा खेचर
युद्ध जिंकलो की हारलो
हल्ले झालेली ठिकाणे