Skip to main content

अब पछतावेसे क्या फायदा ( उत्तरार्ध)

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 03/12/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.>> पहिला भाग इथे वाचा
मौलवीचा दोस्त दुसरया दिवशी आला. त्याच्याबरोबर गेलो. रात्र भर आर्मीच्या ट्रकात बसलो होतो. पिंडीवरुन निघून मरकज़-तय्यबा ह्या गा्वात आलो. रात्रभर आर्मीच्या खुल्या ट्रकमध्ये बसून थंडीने नको जान झाली. माझ्याबरोबर अजून अशीच १२- १५ पोरं होती. सगळी अशीच गरीब.

अब पछतावेसे क्या फायदा ( पूर्वार्ध)

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 03/12/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीन तर अल्ला ला प्यारा झाला. बदनसीबीने मी कैद झालो. आता पुलिसला सांगतोय मला मरु दया.माझ्या घरवाल्यांना जिंदगी हराम करतील आता आर्मीवाले.

Terrorism and Indian Response - एक शिफारस

लेखक अभिजीत यांनी बुधवार, 03/12/2008 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादावर चर्चा करताना त्या विषयातील तज्ञ (विशेषतः भारतीय) व्यक्तिंची मतं समजावून घेणं महत्वाचं वाटतं. जालावर शोधाशोध करता काही नविन सापडलंही. ----------------------------------- "Institute of Defense Studies and Analysis" (http://www.idsa.in/) ही संस्था १९६५ साली स्थापन करण्यात आली. संरक्षण आणि प्रशासकीय सेवांचा प्रदिर्घ अनुभव असलेले लोक या संस्थेत काम करतात.

पुन्हा जिवंत परत आले तर

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 03/12/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा जिवंत परत आले तर मरण अटळ आहेच... रोज जीव वाचला याच समाधान मिळावे असेही घडते.. पण जगायच कस ते ठरवता आल असत तर?
Taxonomy upgrade extras

कोण कोम???

लेखक सुनील मोहन यांनी बुधवार, 03/12/2008 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
चार वेळा महिला मुष्टीयुद्ध विश्वविजेती एम्.सी. मेरी कोम यांच्याबद्दल असे उद्गार काढलेत अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मिल्खा सिंग यांनी. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेने मेरी कोम यांची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खासिंग यांनी ही महिला कोणता खेळ खेळते हेच माहिती नाही असे म्हटले. मणिपूरच्या मेरी कोमने सलग चारवेळा महिला विश्वविजेती होण्याचा सन्मान मिळविला आहे.

पाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 03/12/2008 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
कृपया हे पाहा - http://in.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&eurl= (कृपया यूट्यूबची चित्रफीत येथे परस्पर चिकटवू नये. तसे करण्यामुळे बर्‍याचदा आ ई उघडायला त्रास होतो. कृपया फक्त दुवा द्यावा. - आणिबाणीचा शासनकर्ता.) मुंबईत झालेल्या गहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकीस्तानी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत पाकड्यांनी मारलेल्या उलट्या बोंबांचे हे विडीओ.

पाकड्यांनी २० दहशतवादी भारताच्या हवाली करण्यास नकार दिला......

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 03/12/2008 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मटा मध्ये आलेल्या ताज्या बातमीनुसार "पाकड्यांनी " भारताला वेगवेगळ्या केसमध्ये असणारे २० दहशतवादी हवाली न करण्याची आडमुठी भुमिका घेतली आहे. बघुया आता आपले सरकार काय करतयं? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3787763.cms

नविन संगणक विषाणु पासुन सावध

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 03/12/2008 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
आजच नविन संगणक विषाणु विषयी माहिती मिळाली, ती आपणा पर्यंत पोहोचवण्यासाठी हि उठाठेव. तज्ञ लोकांनी ह्या बाबत अजुन माहिती व काय सवधगिरी घ्यावी हे सांगावे हि विनंती. संदर्भ :- http://www.esakal.com/esakal/12032008/SpecialnewsBE52E56E19.htm

अजुन मी...

लेखक राघव यांनी बुधवार, 03/12/2008 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.

एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ

लेखक धनंजय यांनी बुधवार, 03/12/2008 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
येथे श्री कलंत्री यांनी चालू केलेल्या गांधीवादी लेखमालेच्या अनुषंगाने मी हा प्रतिसाद (वेगळे चर्चासत्र म्हणून) देत आहे. श्री. कलंत्री यांनी सुचवलेली कार्यवाही मला पटलेली नाही, पण मी येथे पूर्णपणे त्यांच्या समर्थनार्थ लिहिणार आहे. या संकेतस्थळावर श्रद्धेच्या महतीबद्दल गप्पा मारणार्‍यांनी एका अश्रद्ध माणसाकडून हे ऐकून घ्यावे - श्री कलंत्री यांची श्रद्धा धाडसी आहे, आणि नि:शस्त्र लोकांना गोळ्या घालणार्‍या श्रद्धावानांसारखी भ्याड नाही. श्री. कलंत्री यांना "तुम्ही अतिरेक्यांचे मतपरिवर्तन करायला जा" म्हणणारे लोक स्वतः काय करू इच्छितात? त्यांनी स्वतः वर्दी चढवलेली आहे?