Skip to main content

शेपूभात (फोटो)

लेखक कवटी यांनी मंगळवार, 23/12/2008 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
स्नेहश्रीताईंनी दिलेली पाकृ येथे वाचावी. तांदूळ धुवून घ्या. शेपू बारिक चिरुन घ्या. लोण्यात मिरे,लवंग्,लसुण परतून घ्या.

काय वाट्टेल ते....!

लेखक झेल्या यांनी मंगळवार, 23/12/2008 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
रेसेशन...? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आपल्याकडे रेसेशन वर एकदम जालिम उपाय आहे. रामबाण. काय करायचं, एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यायचा. आता तुम्ही म्हणाल याने काय होईल! तुम्ही दीर्घ श्वास घेऊन सोडलात की तुमचं मन स्थिरावेल. मन स्थिरावलं की संसद का सत्सद काय म्हणतात ती विवेकबुद्धी जागॄत होइल. ती विवेकबुद्धी जागॄत झाली की तुम्ही सारासार विचार करू लागाल.

डायरेक्ट ढगात जातील . . .

लेखक काहीतरीच यांनी मंगळवार, 23/12/2008 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
अरे मुर्खान्नो,अरे लुच्चान्नो, बस करा तुमचे राजकारण, तुमच्या या हलगर्जी पनामुले, सामन्यांचे होत आहे मरण . . . खुर्चीच्या मागे लागुन-लागुन भ्रष्टाचाराचा केला कलस, अरे आतातरी सुधरा अन झटकून टाका आलस . . . आरोप-प्रत्यारोप करता-करता तुमचा वेळ जातो, कोणी जमीन, कोणी पैसे, तर कोणी चारा खातो . . . फार झाला गांडूपणा, फार झाला अत्याचार, पाकिस्तान समोर वाकू नका, करा थोडा विचार . . . तुम्ही वोटांच्या मागे असताना, भाडखाऊ बोट करुन आले, आमच्या या मुम्बापुरिला, त्यांनी गालबोट लावले . . . लाखो संकटे आलीत, तरी भारतवासी समर्थ राहतील, पण, यापुढे भ्रष्टाचारी आणि आंतकवादी मात्र डायरेक्ट ढगात जातील . .
Taxonomy upgrade extras

!! चांडाळ चौकडी !!

लेखक अनिल हटेला यांनी मंगळवार, 23/12/2008 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !! मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही (आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं.. १)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षका

चौघीजणी : मुग्ध शैशवातली कोवळी सुखदु:खे ....एक साधे,सरळ,मनाला भिडणारे पुस्तक

लेखक स्मिता श्रीपाद यांनी मंगळवार, 23/12/2008 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचं पहिलं पान उघडलं की आपण त्या दुनियेत हरवुन जातो....मेग,ज्यो,बेथ आणि ऍमि या चौघी बहिणी,त्यांचा मित्र लॉरी हे सगळे आपल्या जीवनाचा भाग वाटु लागतात..त्यांचं बालपण,त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडणार्‍या घटना,या सगळ्यात आपण हरवुन जातो.... माझे शालेय जीवन समॄद्ध करणार्‍या काही पुस्तकांपैकी चौघीजणी या पुस्तकाचा पहिला क्रमांक लागतो... लुईसा मे अल्कॉट या लेखिकेच्या "लिटिल वुमेन" आणि "गुड वाईफस" या दोन पुस्तकांचा "चौघीजणी " हा अनुवाद,प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यानी केलेला हा अनुवाद अतिशय सुंदर आहे. अमेरिकेत राहणार्‍या मार्च कुटुंबातल्या च

आयटीवाले....

लेखक सुचेल तसं यांनी मंगळवार, 23/12/2008 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
गटणेंचा "आयटीतील मंदी आणखी दोन-तीन वर्षे" हा काथ्याकूट वाचत होतो. त्यावरचे काही प्रतिसाद वाचून आयटीवाल्यांवर उगीचच आगपाखड करण्यात येते असं जाणवलं. मी जवळपास दोन वर्ष मॅन्युफॅक्चरींग कंपनीत आयटी खात्यात नोकरीला होतो आणि आता गेल्या अडीच वर्षांपासून आयटी कंपनीत आहे. त्यामुळे मला आयटी आणि नॉन-आयटी अशी दोन्ही ठिकाणं पहायला मिळाली. आयटीवाल्यांवर सर्वसाधारणपणे खालील आक्षेप ऐकायला मिळतात. आक्षेप क्र.१.

घरटे -१ : सत्यकथेवर आधारित!

लेखक चेतन१२३प यांनी सोमवार, 22/12/2008 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा! त्यातही लाडक्या सुनेच्या हातचा कडक, तजेलदार चहा आणि वर्तमानपत्र गॅलरीमध्ये अगदी हातामध्ये आणून मिळावे, म्हणजे माझ्यासारख्या भाद्रपदी विचार करणाऱ्या रिटायर्ड माणसाला स्वर्गसुखच म्हणा. किंबहुना त्याहूनही अधिक! तसा माझ्या सौच्या हातचा चहादेखील अगदी कडक असतो बरका! पण, सुनेच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "आदरणीयं श्वशुरम ।" ही भावना जाणवते तर आमच्या हिच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "हाताचा" कडकपणाच अधिक वाटतो.

आनंदी आनंद गडे

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 22/12/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे मुंबईमधील एक नावाजलेली शाळा. कार्यक्रम जवळ जवळ दोन तास चालला. मुलांनी बरेच प्रष्न विचारले(अडचणीचे). त्यांचे समाधान करु शकलो देवाच्या दयेने. कार्यक्रम संपल्यावर मुख्याध्यापकांच्या केबिन मधे काही शिक्षक भेटायला आले. मला लगेच निघायाचे होते परत ठाण्याला. पण शिक्षकांच्या विनंतीला अव्हेरणे जमले नाही. त्यांना पण काही प्रष्न विचारायचे होते. सगळे एक रिकाम्या वर्गात जमले. १ ला वार सायन्स च्या शिक्षिकेने काढला. सर, तुमचे ८६ अमेंड्मेंट बद्द्ल काय मत आहे. मी: हा काय प्रकार आहे ते मला माहित नाही.

स्वप्नं

लेखक स्मिता श्रीपाद यांनी सोमवार, 22/12/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यातली रात्र असावी,डोळ्यांमद्धे स्वप्नं असावे अशा क्षणाला ओठी माझ्या,तुझेच केवळ नाव असावे. दुरुन कुठुनसा ओळखीतला,निशिगंधाचा सुगंध यावा, वार्‍यावरती वाहत अलगद,माझ्या श्वासामधे भिनावा. अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे, तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे. पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे, स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे. तुझ्या रेशमी स्पर्शाने मग,स्वप्नातुन मी जागे व्हावे, वास्तव सुद्धा असते सुंदर,हे माझ्या प्रत्ययास यावे. मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी, इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी... फक्त तुझीच स

हमी

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 22/12/2008 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
कुणालाच माझी हमी आज नाही. जगाला कशी बातमी आज नाही ? मला एकट्याला नको दोष देऊ. तुझी प्रीतही संयमी आज नाही..! कधी मी म्हणालो हवे चंद्र तारे, कसा काजवाही तमी आज नाही..! जरा धाव घे आसवांच्या सवे तू. खरे दुःख हे, मोसमी आज नाही..! तुझ्या वेदनेची नशा और काही. तशी वेदनांची कमी आज नाही..! -- अभिजीत दाते