काय वाट्टेल ते....!
लेखनप्रकार
रेसेशन...? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आपल्याकडे रेसेशन वर एकदम जालिम उपाय आहे. रामबाण. काय करायचं, एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यायचा. आता तुम्ही म्हणाल याने काय होईल! तुम्ही दीर्घ श्वास घेऊन सोडलात की तुमचं मन स्थिरावेल. मन स्थिरावलं की संसद का सत्सद काय म्हणतात ती विवेकबुद्धी जागॄत होइल. ती विवेकबुद्धी जागॄत झाली की तुम्ही सारासार विचार करू लागाल. या विचारांतून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला रेसेशन वर विचार करायची काहीच गरज नाही.
त्याचं असं आहे की नको तेवढं आणि बर्याचदा नको तिथं डोकं चालवून थोडंसं डोकं पिकलंय...(डोकं थोडंसं पिकलंय!). तेव्हा मनात असा विचार आला की विचार न करता काहीतरी लिहावं. आता तुम्ही विचाराल की 'का लिहावं असं विचार न करता?'. अहो मग फरक काय राहिला माझ्यात आणि इतर लेखकांत? हा एक अभिनव उपक्रम (उपद्व्याप) आहे. टिळ्कांनी इंग्रज सरकारबद्दल विचारलेला प्रश्न सध्या तुमच्या मनातही माझ्याबद्दल डोकावत असेल. ('हा प्रश्न कोणता?' असा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी: 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?'). आहे. माझे डोके ठिकाणावर आहे. काळंजी नसावी. फक्तं ते ठिकाण कुठं सापडंत नाहीये. असो.
नाही नाही. हा लेख असा अर्धवट वाचून सोडून देण्याचा विचार तुमच्या मनाला स्पर्शूही देऊ नका. फारंच वैतागला असाल तर एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. (श्वास बरंका.....लेख वाचणं नाही).
मुद्द्याचं बोलायचं झालं तर बोलण्याचा मुद्दा काय असावा! कशाला हवाय तो मुद्देसूदपणा! कशाला हवाय एका वाक्याचा दुसर्या वाक्याशी संबंध! कशाला हवेत ते अक्षरा-अक्षरामधील, शब्दा-शब्दामधील, आवाजा-आवाजांमधील ते परस्पर ग्राह्य संबंध! थोडा वेळ सगळं बाजूला ठेवा. पाटी स्वच्छ पुसून कोरी करा. आता या पाटीवर आपल्याला एक चित्र काढायचं आहे. कशाचं? पोकळीचं. (पोफळीचं नाही हो...). पोकळीचं. निर्वात पोकळीचं. कसं काढाल? सोप्पंय! काही काढायची गरजंच नाहीये. याचा काय अर्थ? अं हं....विचार करायचा नाही....अजिबात विचार करू नका. वाचंत रहा. (थोडंसंच राहिलंय!).
जगात कोणी ना कोणी काही ना काही करंत असतो. जगात कोणी ना कोणी काही च्या काही करंत असतो. मीही ठरंवलंय की जीवनाचं ध्येय ठरंवायचं. 'काहीही' करून 'काहीही' होत नसतं तर 'काहीतरी' होण्यासाठी 'काहीतरी' करावं लागतं- हे मला आता कळून चुकलंय...(अं हं..चुकून कळ्लंय!). काय म्हणजे काय असतं, कोण म्हणजे कोण असतं याची प्रत्येकाला पारख हवी. 'जे आहे ते का आहे' आणि 'जे नाही ते का नाही' हे कळ्ल्याशिवाय 'जे आहे ते नसते तर...' आणि 'जे नाही ते असते तर...' याचा अंदाज कसा येणार! जसेजसे आपण पुढे जातो, आपण तसेतसे का जातो आणि आपण तसेतसेच का जातो याचा अभ्यास करायला हवा. 'आपल्याला इतके प्रश्न क पडतात?' विचारलात कधी हा प्रश्न स्वत:ला? समजलेल्या गोष्टी समजून घेण्याची समज आपणांत होती म्हणून त्या समजल्या. पण न समजलेल्या गोष्टी का समजत नाहीत हे समजून घेतले तर समजदारीचे कृत्य होईल ही समजूत चूक की बरोबर हे समजले पाहिजे.
'काय लिहीलंय हे?', 'का लिहीलंय हे?' वाटलं ना असं? वाटू द्या. काय वाट्टेल ते वाटू द्या. काय वाटावं हे आपल्या हातात नसतं. पण काय 'वाटून' घ्यावं हे मात्र आपल्या हातात असतं. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं वाटत असतं. कुणाला बरं वाटत असतं तर कुणाला वाईट वाटत असतं. कुणाला हसावं- नाचावं-बागडावं वाटत असतं तर कुणाला रडावं वाटत असतं; तर कुणाला पहावं...करावं...करून पहावं..पाहून करावं...वाजवावं...खाजवावं..............
प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं कारण प्रत्येकाची वाट वेगळी असते. आयुष्यात पुढे पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला वाट लागंत असते....आणि आयुष्यात पुढे पुढे जाताना प्रत्येकाची वाट लागंत असते...!
हुश्श! एवढं लिहीलं...मन हलकं झालं...तुम्हाला वाटंत असेल की या लेखकाला 'मन' नाही तर 'पोट' हलकं करण्याची गरज आहे. वाटूद्या...मी त्याबद्द्ल काही वाटून घेणार नाही. तुम्ही इथपर्यंत वाचंत आलात त्याबद्द्ल तुमचं मनापासून कौतुक. कांडी संपत आलीये...नाहीतर अजून लिहीलं असतं.
....आलो....आलो...कोणीतरी बोलावतंय....जायला हवं....बरंय तर मग्.....तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या..!
कळावे.....लोभ असावा....(खरं तर माणसाला लोभ नसावा....!).
प्रेम असावे........
-झेल्या.
वाचने
6313
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
****
In reply to **** by अनिल हटेला
एक नंबर
सहमत
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे (तुमचं)
सहमत
किती वाटायचे..
रे तूझ्या
In reply to रे तूझ्या by शंकरराव
आपल्या
--
काहीहीहीही....
In reply to काहीहीहीही.... by स्मिता श्रीपाद
तुम्हाला
खफ
गणित
In reply to गणित by विनायक प्रभू
काम, काळ,
वा!
In reply to वा! by प्राजु
धन्यवाद.
खरं सांग
In reply to खरं सांग by बामनाचं पोर
काय
पोचलेला लेख
कसं जमतं
वरील लिखाण
हा हा