आनंदी आनंद गडे
नेहमीप्रमाणे मुंबईमधील एक नावाजलेली शाळा. कार्यक्रम जवळ जवळ दोन तास चालला.
मुलांनी बरेच प्रष्न विचारले(अडचणीचे). त्यांचे समाधान करु शकलो देवाच्या दयेने. कार्यक्रम संपल्यावर मुख्याध्यापकांच्या केबिन मधे काही शिक्षक भेटायला आले. मला लगेच निघायाचे होते परत ठाण्याला. पण शिक्षकांच्या विनंतीला अव्हेरणे जमले नाही. त्यांना पण काही प्रष्न विचारायचे होते. सगळे एक रिकाम्या वर्गात जमले. १ ला वार सायन्स च्या शिक्षिकेने काढला.
सर, तुमचे ८६ अमेंड्मेंट बद्द्ल काय मत आहे.
मी: हा काय प्रकार आहे ते मला माहित नाही. मी प्रामणिक पणे उत्तर दिले.
माझ्या अज्ञानाबद्द्ल किंव त्या बाईंच्या चेहेर्-यावर स्पष्ट दिसली.
१४ वर्षापर्यंत किंवा आठवी पर्यंत मुलांना शिक्षण अनिवार्य करण्याचा कायदा होणार आहे. त्यामुळे परिक्षेत मुले नापास करताच येणार नाही. फक्त ग्रेड्स द्यायच्या आणि प्रमोट करायचे.
असे काहीतरी घाटते आहे हे मला माहित होते.
मग प्रॉब्लेम काय? -मी
बाईंनी लगेच बॅगेतुन कागद काढला. माझ्याकडे दिला.
त्यात एक गीताचे विडंबन होते. सेंडॉफ ला दहावी च्या एका मुलाने सर्व वर्गासमोर तो कागद पिवळ्या साडीतल्या मुलीला दिला होता.
हिरवी हिरवी गडद साजिरी
भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तु ग
सांगे तो चौघडा -------------------------------------ह्या गाण्याचे विडंबन.
विडंबन खालील प्रमाणे
पिवळी पिवळी गडद हा**
भरला सगळा घडा
वधु पादरी झालीस तु ग
सांगे तो चौघडा
मी हसलो.
बाई वैतागल्या. " अहो सर हा मुलगा मेरीट मधे येउ शकतो" मुलीच्या पालकांना समजावताना ना़की नउ आले.
ह्या क्लु वर संस्कृत च्या शिक्षकाने एक पेपर काढला.
त्यात एका संस्कृत श्लोकाचे भाषांतर होते.
मुळ श्लोक असा.
आशानाम मनुष्याणाम
काचिद आष्चर्य श्रुंखला
यया बद्धा प्रधावन्ति
मुक्ता: तिष्ट्ती पंगुवत
त्याचे मराठी भाषांतर असे.
आशा नावाची डेंजर आयट्म असते. हीने धरला की लय धावपळ होते. मुक्ता पांगळ्यासारखी नुसतीच बघत बसते.
संस्कृत कच्चे असेल मुलाचे. त्याला जमेल तसा अर्थ लिहीला त्याने.--मी
संस्कुत मधे १०० पैकी १०० मिळवेल अशी आशा आहे आम्हाला त्याच्याकडुन सर- शिक्षक
असे का करतात हो ही मुले ? -मुख्याध्यापक
हॉल टीकीट मिळाल्यानंतर तुमचा धाक जातो. ही नांदी असते बंडाची. साठलेल्या क्षोभाची.-मी (आणि उद्याच्या वादळाची-मनातल्या मनात)
बोललो आणि मी चुकलो हे माझ्या लक्षात आले.
मराठी शिक्षकाने लगेच मुद्दा मांडला.
सर, असे असेल तर परिक्षेत नापास होणारच नाही असे मुलांना कळेल तर शिक्षक म्हणुन आमची काय पत्रास ठेवतील ही मुले. ट्रॉमाच्या भितीने शिक्षा करता येत नाही. शिक्षेच्या अभावी बेधुंद मुलावर नियंत्रण ठेवायचे कसे? आमची गांडूळे होणार.
माझ्याकडे उत्तर नव्हते.असे काहीतरी बील पटावर आहे. त्याचे इंप्लीमेंटेशन नेमके कसे होणार ते अजुन नीट माहित नाही. शिक्षक मंडळी आधीच धास्तावलेली आहेत.
जाता जाता: ह्या दोन्ही पोरांना भेटायला पाहीजे. माझी ११वी आठवली.
वाचने
5392
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
ह्या
In reply to ह्या by अवलिया
विडंबन
In reply to विडंबन by अघळ पघळ
मला कर
In reply to मला कर by विनायक पाचलग
कोल्हापुर
In reply to कोल्हापुर by बगाराम
पटतय पण ते
In reply to पटतय पण ते by विनायक पाचलग
दादा जरा आवरत घ्या.
सर्वसाधारण...
In reply to सर्वसाधारण... by बिपिन कार्यकर्ते
+१ सहमत
माझ्यावर
पोरान्ला
In reply to पोरान्ला by ब्रिटिश
पोरान्ला
सदस्य
In reply to सदस्य by विनायक प्रभू
ते करा अगर
In reply to ते करा अगर by विनायक पाचलग
मान्य, पण तारतम्याने!!!!
प्रश्न
मास्तर
In reply to मास्तर by रामदास
प्रयोग
हे सर्व ठिक आहे पण
In reply to हे सर्व ठिक आहे पण by स्नेहश्री
आम्हालाही
लै भरि
मुले कि फुले
खतरनाक पोरे
मुले आणि मुली बर्याचदा त्या त्या वयाला साजेसा