Skip to main content

कांद्याच्या पातीची सोप्पी कोशिंबीर

लेखक शाल्मली यांनी रविवार, 28/12/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
कांद्याच्या पातीची ही कोशिंबीर करायला अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी आहे. साहित्य- घरात सहजी उपलब्ध असणारेच- कांद्याची पात - १ जुडी दाण्याचं कूट - २ - ३ चमचे कच्चं तेल - १ चमचा गोडा मसाला - १ छोटा चमचा तिखट - १ छोटा चमचा लिंबाचा रस - १ छोटा चमचा मीठ - चवीनुसार साखर - २ चिमूट कृती - कांद्याची पात स्वच्छ पुसून चिरून घ्यावी. त्यात वरील सर्व जिन्नस - दाण्याचं कूट, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालावे.

अचूकतेचा अभाव

लेखक तिमा यांनी रविवार, 28/12/2008 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारतीयांत अचूकतेचा अभाव ठायी ठायी दिसून येतो. त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर निश्चितच होतो. आपल्या प्रगतीचा प्रवास अतिसंथ आहे त्यांतल्या अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण आहे. पत्रकारांचेच पहा ना, त्यांनी लोकांपर्यंत अचूक बातम्या पोचवल्या पाहिजेत. प्रत्यक्षांत काय दिसते? साधी नांवे सुध्दा या मंडळींना अचूक लिहिता येत नाहीत. 'कसाब्'ला पकडणारा तो शूर पोलिस! त्याचे नांव सुध्दा ओंबळे की उंबळे याबाबतीत गोंधळ दिसतो. 'कसाब' चे नांव सुध्दा कासाब, कासव, कासम असे लिहिलेले वाचायला मिळते.

न झालेला दोस्ताना..

लेखक योगी९०० यांनी रविवार, 28/12/2008 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
तसा लेखाच्या नावावरून चतूर मि.पा. करांच्या ध्यानात आले असेल की मी कोणत्या विषयावर लिहीणार आहे. मला आणि माझ्या मित्रांना आलेले अश्या लोकांचे अनुभव. म्हणजे तुम्ही तसा काही गैरसमज करून घेऊ नका. मी लिहीणार आहे की अशी माणसे कशी आमच्या मागे लागली आणि आम्ही कसे या प्रसंगातून वाचलो ते. आमच्या अनुभवातून तुम्ही काही शिकावे हाच खटाटोप. एक सांगू इत्छितो की या लेखाद्वारे कोणाला दु़खवायचा किंवा अश्या लोकांची चेष्टा करायचा मुळीच उद्देश नाही. जर कोणी मि.पा. कर नाराज झाले तर क्षमस्व. प्रसंग १ (अनुभव १ असे लिहीणार होतो.

मिपा चा RSS feed?

लेखक गोगोल यांनी रविवार, 28/12/2008 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
शोधला पण सापडला नाही...जाणकारान्नी प्रकाश टाकावा. Articles आणी Comments, साठी फीड मिळाला तर बरे होइल.

ऍसिड हल्ला आणि तरुण, तरुणी

लेखक अन्वय यांनी शनिवार, 27/12/2008 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
आंध्र प्रदेशमधील वरंगळ जिल्ह्यात दोन तरुणींवर ऍसिड हल्ला केला गेला. हल्ला करणारे तीन तरुण सुशिक्षित होते. त्यांनी इतक्‍या टोकाची भूमिका का घेतली? ज्या तरुणींवर हल्ला झाला, त्यांचा दोष काय, यांसारखे अनेक प्रश्‍न या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहेत. स्वप्निका आणि प्रणिता या विद्यार्थिनी वरंगळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. दहा डिसेंबर रोजी दुचाकीवरून घरी परतत असताना, त्यांना श्रीनिवास (23), संजय (22) व हरिकृष्ण (23) या तरुणांनी गाठले आणि काही लक्षात यायच्या आत त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला. यात दोघी गंभीर जखमी झाल्या.

एक द्वाडीक कविता

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/12/2008 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही सदरा मळवला असं पोर्‍यानी सांगावे. आम्ही साबु घेउन यावं तुम्ही उगा चेकाळावे. हे असं काय होतं बुवा ?....... तुम्ही उगा चेकाळावे त्यात साबणं नासावे. आणि करुन फेस सारा आख्खे घर पाणी पाणी अशी दुपार कशी जावी.... तुम्ही जोर बोंबलावं सारी झोप खोबरी तुम्ही लाथा झाडाव्या आम्ही उसण धरावी. कशी जीवघेणी अदा..... आम्ही लपत छपत तुमची पाठ सोलावी तुम्ही ओढत पदर आणिबाणी जाहीर करावी. कस्सा जीव कातावला...... ( संदर्भ : रामदासांची एक लाडीक कविता http://misalpav.com/node/5271 )
Taxonomy upgrade extras

वैधानीक इशारा.

लेखक रामदास यांनी शनिवार, 27/12/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
या वाटेवर इथून पुढे जरा जपून. तरबेज प्रेमी पण हलकेच पाउल टाकतात. दिवसाउजेडी. रापलेले भोई पण घाबरतात पालखी वहायला या वाटेवर. ती, फुलदाणी तो चंद्र ती शिशी ग्राईप वॉटरची. ते तांबडे तावदान तो आयना ती काकणं ते सगळं काही जे फुटतं लाखो बधीर तुकड्यात. विकीरान्नासारखं. ते डंख करेल टाचेखाली. हलकेच. साप्ताहीक भविष्यासारखं. सहज.निर्धोक. वरवर चाळता. चालता ? जरा जपून अपूर्ण कवितांचा असह्य ठणका पहाटेसच जोर धरतो.
Taxonomy upgrade extras

मुतलुलुक- ब्लिस

लेखक मॅन्ड्रेक यांनी शनिवार, 27/12/2008 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
मुतलुलुक- ब्लिस हे एका तुर्की चित्रपटाचं नाव.परदेशी चित्रपटाचं नाव योग्यवेळी आठवणं, त्याचा योग्य उच्चार समजणं, तो समजल्यावर तो योग्य पध्दतीनं करता येणं हा सगळा नव्याने शाळेत जाण्यासारखा अनुभव असतो. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या (आणि दरवर्षी नेमाने होणाऱ्या)थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला उदघाटनाचा मान मिळाला होता. मुतलुलुक चित्रपटाच्या पहिल्याच चौकटीत दिसतं एका निर्मनुष्य तळ्याच्या काठी कुशीवर पडलेलं एका वयात आलेल्या मुलीचं शरीर.चित्रपटाची नामावळ चालू होते आणि कॅमेरा तिच्यावर आवर्तनं घेत आणखी वर जाऊन दृष्याची पार्श्वभूमी उलगडत असताना, तळ्याचा निर्मनुष्य परिसर दाखवत असताना मुलीच