राम राम मायबाप मिपाकरहो,
अरे जरा सुखाने जगू द्या की रे..!
अरे प्रत्येक विषयात वाद घालतांना वैयक्तिक पातळीवर नका रे उतरू!
एक तर प्रत्येक विषयात दोन दोन, तीन तीन पानी वाद घालू नका आणि घातलात तरी वैयक्तिक चिखलफेक कृपया टाळा!
हा पेश्शल घागा टाकण्याचे कारण म्हणजे मारुतीच्या शेपटीसारखे वाढत चाललेले, अंत नसलेले वाद आणि काही मंडळींनी त्यात केलेली वैयक्तिक शेरेबाजी! त्यामुळे होतं काय, की जेव्हा जेव्हा आम्ही लॉगईन होतो तेव्हा तेव्हा किमान चार व्य नि आणि खरडी आमची वाट पाहात असतात!