मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भूतदया

विकास · · कौल

वाचने 956 वाचनखूण प्रतिक्रिया 12

विसोबा खेचर गुरुवार, 01/08/2009 - 01:12
पाचव्या पर्यायाला मत दिले आहे. मी एका संस्थेकरता माझ्या ऐपती व आवाक्याप्रमाणे शक्य ती सर्व मदत करतो. परंतु त्याला 'भूतदया' हा शब्द वापरणे मला योग्य वाटत नाही. किंबहुना त्या संस्थेकरता काही करणे हे मला माझे एक सामाजिक कर्तव्यच वाटते! सो नथिंग ग्रेट! त्यामुळे भूतदया करतो वगैरे म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! बाकी तिसर्‍या पर्यायातील, मी श्रद्धाळू आहेच पण मला जीवनात ऐहीक आनंद उपभोगायला आवडतो या वाक्याशीही सहमत..! तात्या.

आजानुकर्ण गुरुवार, 01/08/2009 - 01:15
माझ्यावरील हिंदू संस्कारांनुसार भूतदया, दान, मदत किंवा तत्सम प्रकारचे कार्य उजव्या हाताने केलेले डाव्या हातालाही कळू नये इतकी गुप्तता पाळण्याची मी काळजी घेतो. त्यामुळे पाचव्या पर्यायाला मत दिले आहे. आपला (जन्महिंदू) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास गुरुवार, 01/08/2009 - 01:44
माझ्यावरील हिंदू संस्कारांनुसार भूतदया, दान, मदत किंवा तत्सम प्रकारचे कार्य उजव्या हाताने केलेले डाव्या हातालाही कळू नये इतकी गुप्तता पाळण्याची मी काळजी घेतो. त्यामुळे पाचव्या पर्यायाला मत दिले आहे. आपण न सांगता गुप्त मतदान करू शकता. सुरवातीस तसे कोणीतरी केले होते हे लक्षात आले... हा कौल कोण किती मदत करतो/भूतदया करतो वगैरेशी नाही अथवा करत नसलो तरी नाही आहे. मला खात्री आहे, की येथे येणारे प्रत्येकजणच कुठल्यान कुठल्याप्रकारे मदत करत असेल. फक्त तशी मदत करत असताना, कुठल्या विभागात आपली वृत्ती बसू शकते ह्याच्याशी संबंधीत हा कौल आहे. बाकी पार्श्वभूमी वर आली आहेच :-)

प्रियाली गुरुवार, 01/08/2009 - 01:17
कोणत्याही मनुष्यप्राण्यावर दया केल्यासारखे किंवा दाखवल्यासारखे मला आठवत नाही. मदत वगैरे करतोच. भुतांबद्दल मात्र खूप दया, प्रेम, कणव आहे. नं २ ला मत दिले परंतु मी श्रद्धाळू नाही. त्यामुळे खरेतर मत ५ ला हवे होते.

In reply to by प्रियाली

विकास गुरुवार, 01/08/2009 - 01:49
कोणत्याही मनुष्यप्राण्यावर दया केल्यासारखे किंवा दाखवल्यासारखे मला आठवत नाही. मदत वगैरे करतोच. वर सांगितलेल्या पार्श्वभूमीच्या संदर्भात आधिच्या चर्चेत मला भूतदया हा शब्द दिसला जो कमीत कमी अक्षरात कौलातील प्रश्न विचारण्याच्या येथील मर्यादेत बसत होता. म्हणून वापरला इतकेच. म्हणूनच "भूतदया हा एक शब्द सर्वसमावेशक अर्थाने वापरला आहे. उ.दा. - रस्त्यावरील गरजूंना, गरजू विद्यार्थ्यांना, आपद्ग्रस्तांना, संस्थेमार्फत एखाद्या प्रकल्पाला, इत्यादी." असे म्हणले. बाकी आपल्या वाक्याशी सहमतच.

प्राजु गुरुवार, 01/08/2009 - 03:14
मला जमेल तितपत, मदत करत असते. कधी आर्थिक, कधी काही वस्तू देऊन.. कधी कधी स्वतः त्या ठिकाणी जाऊन. पण दया नाही म्हणता येणार. कारण हे मला जमतं आणि परवडतं म्हणून मी करते. माझ्याकडे कोणी गरजू आपणहून काही मागायला आला आणि मी त्याला मदत केली तर कदाचित ती दया होऊ शकेल पण जिथे मी आपणहून हे करते ती दया नाही. ते हवं तर सामाजिक कर्तव्य म्हणू शकता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय गुरुवार, 01/08/2009 - 03:36
पर्याय ५ : जे काही बारीक-सारीक पैसे मी सेवाभावी संस्थांना देतो, ते स्वत:वर लादलेला कर मानून देतो. असे काही मानले तर चालेल. जे कार्य समाजात व्हावे, असे मला वाटते, पण मला योग्य वाटते त्या प्रमाणात सरकार हल्ली तरी ते कार्य करत नाही, अशाच संस्थांना मदत देतो. दया म्हणून कोणाला काही देत नाही. बेघर लोकांसाठी निवार्‍याला आवर्जून पैसे देतो - पण भूतदया म्हणून नव्हे. थंडीत थिजून लोक आजारी पडले, तर त्यांचा मोफत इलाज करायला इस्पितळ माझेच बिल/विमा वाढवते हे सरकारचे काम आहे, पण सरकार आवश्यक प्रमाणात हे कार्य करत नाही, असे मला वाटते. ज्या कुठल्या संस्थेला मदत करतो, ते अशाच कुठल्या आपमतलबी कारणासाठी करतो. व्यक्तींना क्वचितच "भूतदया" म्हणून मदत करतो. लोकांनी माझी जितपत मदत करावी अशी माझी अपेक्षा असते - म्हणजे रस्त्यावर अपघात झाल्यास मला मदत करावी, हरवलो असल्यास वाट सांगावी, वगैरे, लोकांना तितपत मदत करतो - पण हा सुद्धा "विमा"च आहे भूतदया नाही.

एक गुरुवार, 01/08/2009 - 04:45
तो म्हणजे.. मी देवधर्म मानणारा आहे. मला देवाचे माझ्या श्रद्धेनुसार लाड करायला आवडतात. ते लाड/श्रद्धा आणि मी करत असलेली / नसलेली सो कॉल्ड भूतदया यां पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत. वरील पर्याय ऐहिक आनंदा साठी सुद्धा मॉडिफाय करता येईल. असे पर्याय ठेवण्याचं कारण --- पर्याय २,३ ,४ वरून असं वाटतं की जर तुम्ही श्रद्धाळू असाल किंवा ऐहिक आनंद उपभोगत असाल तसं करण्यापूर्वी तुम्ही "भूतदयेचा" विचार केलाच पाहिजे, तसं करत नसाल तर काहितरी फार मोठा अपराध करत आहात. (असा उपदेश करणारे , जाब विचारणारे प्रत्यक्षात कसे वागतात कोणी बघितलं आहे?) बाहेर जेवायला जाताना, बियर झोडताना रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडणारा भिकारी दिसतो का हो? पण मी जर मुर्तीला स्वेटर घालायला गेलो तर मला तसा भिकारी दिसलाच पाहिजे असं का? कुठल्याही वेळी आमचं अकाऊंट चेक केलं तर भूतदया आणि श्रद्धा/ऐहिक आनंद या गोष्टी समान प्रमाणातच असल्या पाहिजेत हा अट्टाहास का? आत्ता मला मूर्तीला स्वेटर घालण्यात आनंद मिळतो आहे, त्या गोंडस रूपा पलिकडे मला काहिही दिसत नाही आहे. बाहेरच्या भिकार्‍यांचा विचारपण मनात येत नाही आहे. कोणी सांगावं भविष्यात असंही होईल की त्याच मंदिरासमोर मी भिकार्‍यांना अन्नदान/वस्त्रदान करेन पण आत दर्शनालाही जाणार नाही. -(प्रामाणिक, नाहीत्या दांभिक झुली न पांघरणारा) एक

सुक्या गुरुवार, 01/08/2009 - 08:08
मी साधारण रस्त्यावरच्या गरजुंना मदत करतो. बरेच गरजु मला बस स्थानके किंवा बाजारात दिसतात. एक दोन दा यात फसवला पन गेलो आहे परंतु बर्‍याच लोकांना जेव्हा पाहीजे तेव्हा मदत झाल्याने त्याचे फार वाईट वाटत नाही. मुलीच्या वाढदिवसाला गरीब भिकार्‍यांना चादरी वाटतो. सेवाभावी संस्थांना पैसे देत नाही. आपण दिलेला पैसा योग्य वापरला जाईल याची शाश्वती वाटत नाही. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

हेरंब गुरुवार, 01/08/2009 - 18:30
घरातून निघताना भूतदया, गरजुंना मदत करायची असे ठरवून निघत नाही. पण मूळ स्वभावच आपणहून मदत करण्याचा आहे. (चांगले वागणे हे देवाला भिऊन नव्हे पण उपजत प्रवृत्ती म्हणून असावे असे वाटणारा)

लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 18:39
पाचव्या पर्यायाला मत दिले आहे. खरेतर योग्य पर्याय मिळाला नाही. मी भूतदया करतो की नाही माहित नाही. समाजसेवा करतो असे वाटत नाही. मी स्वतःला आणि समाजाला कसा उपयोगी पडेन ते अजून समजले नाही. देव मानतो. इतरांना आपण मदत केली पाहिजे असेही मानतो. -- लिखाळ. माझी अनुदिनी

ब्रिटिश गुरुवार, 01/08/2009 - 18:52
भूतदया - समानार्थी ईंग्रजी शब्द सांगा ghostkind ??? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)