Skip to main content

भेट

लेखक प्रविनमौति यांनी गुरुवार, 08/01/2009 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक ती भेटली, नेहमी सारर्खीच हसली, डोळ्यातूनच सारे काही बोलली, जाताना मात्र दुसर्याचे नाव लावणर्या , तिच्या डोळ्यातले माझेच पाणी लपवत गेली.

काही चारोळ्या..........

लेखक sanjubaba यांनी गुरुवार, 08/01/2009 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
१) आत्मपरीक्षण करताना काही दोष राहून गेले असतील.... माझ्या स्वार्थ आ सोबत काही चुका वाहून गेल्या असतील..... २) आनंदाचे आज मजला भरते आले असे....... समजत होतो ज्याना वाघ ते निघाले ससे....... ३) देवा किती तारे आहेत तुझ्या आकाशात...... इतके तर नसतील च जितक्या आकां शा माझ्या मनात........ ४) जाणून बुजून झालेला माझा जन्म भ्रमात गेला..... वाटले प्रामाणिकपणा खरा म्हणून माझा प्रत्येक क्षण श्रमात गेला....... ५) कधी कधी जीवनातही बेभान व्हावे लागते...... दु:खाचे काटे टोचाताना खळ्खळुन हसावे लागते......
Taxonomy upgrade extras

६४ कलेत पारंगत

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 08/01/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
६४ कलेत पारंगत हिंदु संस्कृतित काम शास्त्रा ला अन्यनसाधारण मह्त्व होते, आहे. काम शास्त्रा च्या नियमाप्रमाणे,कुमारीकेस,खालील ६४ कलेत पारंगत असण्याची आवश्यकता सांगीतली आहे, ह्या कला तिने स्वतः गुप्त पणें अभ्यास करुन शीकायच्या व आत्मसात करावयच्या शिकवण्यासाठी खालिल पैकि शिक्षिकेचि नियुक्ती केली जायची.

मनाच्या कुपीतले-समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 08/01/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो, मनाच्या कुपीतले या सदरातला हा दुसरा लेख..... (सुचना- या लेखात जेथे जेथे इश्वरवाद हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी नास्तिकानी निसर्गवाद हा शब्द वाचावा कारण तो मुद्दा फक्त त्याच द्रुष्टीने घेतला असुन त्याचा कोणत्याही धार्मीक भावनेशी काडीमात्र संबंध नाही.)
समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?
आज एकूणच मानवजात, समाज एका विशिष्ठ परिस्थितीस येऊन पोहोचला आहे. आज, समाजाला निर्णय घ्यायची गरज आहे. गेली 10-15 वर्षे, विशेषत: गेली 3-4 वर्षे समाज विविध विचारप्रवाहांमध्ये अडकलेला आहे.

गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा

लेखक चिन्या१९८५ यांनी गुरुवार, 08/01/2009 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for." महात्मा गांधी" केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालव

सुखाने जगू द्या रे! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 08/01/2009 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मायबाप मिपाकरहो, अरे जरा सुखाने जगू द्या की रे..! अरे प्रत्येक विषयात वाद घालतांना वैयक्तिक पातळीवर नका रे उतरू! एक तर प्रत्येक विषयात दोन दोन, तीन तीन पानी वाद घालू नका आणि घातलात तरी वैयक्तिक चिखलफेक कृपया टाळा! हा पेश्शल घागा टाकण्याचे कारण म्हणजे मारुतीच्या शेपटीसारखे वाढत चाललेले, अंत नसलेले वाद आणि काही मंडळींनी त्यात केलेली वैयक्तिक शेरेबाजी! त्यामुळे होतं काय, की जेव्हा जेव्हा आम्ही लॉगईन होतो तेव्हा तेव्हा किमान चार व्य नि आणि खरडी आमची वाट पाहात असतात!

गणपतीला स्वेटर

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 07/01/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
भावनांचा बाजार? मांडला मंगळवारी? सातच दिवस असतात आठवड्याला ! अरेरे ! भाव आणि भक्ती श्रद्धेचा उत्सव भरला मंगळवारी? सातच दिवस असतात आठवड्याला ! अरेरे ! गणपतीला स्वेटर अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांची विण कोणता टाका निवडला? साखळीटाका बरा भराभर होतो स्वेटर शेवटची गाठ मात्र अशी एक धागा ओढला की स्वेटर पूर्ण उसवतो. बहुधा तीच ब्रह्मगाठ असावी. --लिखाळ.
Taxonomy upgrade extras

लाखचं घर

लेखक अनामिक यांनी बुधवार, 07/01/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
लाखचं घर म्हणजे लाख रुपयांच घर नाही... लाख हे माझ्या आजोबांच्या (आबांच्या) गावाचं नाव. 'लाख' - यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातलं, दिग्रसपासून जवळ-जवळ १५-२० किमी अंतरावर असलेलं एक खेडेगाव. आबा मी लहान असतानाच वारल्याने या घराशी माझा जास्त संबंध आलाच नाही, त्यामुळे खूप आठवणी आहेत असं म्हणू शकत नाही. पण तरीही या घराचं माझ्याशी असलेलं नातं वेगळंच आहे... कुठंतरी खोल खोल रुजलेलं! माझे काका दिग्रसला राहतात त्यामुळे आम्ही सगळे (भावंडं) सुट्या लागल्या की काकाच्या घरीच जास्त राहायचो.