Skip to main content

सांगली कट्टे,

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 06/04/2021 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
"मित्र ", हा माझा विक पाॅइंट आणि त्यातही ते "मिपाकर" असतील तर, फारच उत्तम, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... त्यामुळे कधीही नविन गावात जायचे असेल तर, कुणी मिपाकर त्या गावांत आहेत का? अशी हाकाटी पिटवतो. जगांत असे एकही ठिकाण नाही की, ज्याच्या आसपास मिपाकर रहात नाहीत. मुलगा 21 वर्षांचा झाला (2016-17) आणि त्याची एकूण शैक्षणिक प्रगती बघून, त्याला योग्य अशी मुलगी शोधायला सुरूवात केली. एप्रील 2020 मध्ये एका मुलीने आमच्या मुलाला पसंत केले. 9-10 महिने, त्या दोघांनी एकमेकांना जाणून घेतले आणि पुढील बोलणी करायला, मी आणि आमची सौ.

१. मिनी लॉकडाऊन : दिवस पहिला

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 06/04/2021 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
काल उद्धव ठाकरेसाहेबांनी करोनाच्या केसेस चा वाढीव आकडा पहता कडक निर्बंध आणि वीकेंडला संपुर्ण लॉकडाऊन ची घोषणा केली . #मिनीलॉकडाऊन . आज संध्याकाळपासुन आठ वाजल्यापासुन त्याची अंमलबजावणी सुरु झाली , त्या अर्थाने आज लो़कडाऊनचा पहिला दिवस. मागच्या वर्षीच्या मिपावरील लॉकडाउन स्पेशल लेखमालिकेत लेख लिहिता न आल्याची खंत मनात होतीच , ती दुर करण्याची संधी सरकारने दिली ह्यबद्दल मी सरकारचा आभारी आहे ;) ________________________________________ खरंतर लिहिण्यासारखं खुप आहे पण सगळंच अघळपघळ ... अगदी खरंच बोलायचं तर लॉकडाऊन आपल्याला काही झेपला नाही.

कुटचलनाची बाराखडी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 05/04/2021 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी सध्या मिपावर बाराखडीची चलती आहे. त्यामुळे म्हटले आपणही एक जिलबी टाकूया. तर "जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्या शिकवावे , शहाणे करून सोडावे सकाळ जन" या समर्थांच्या उक्ती प्रमाणे मी हा धागा लिहितोय. कोणाच्या फायद्या तोट्याची जबाबदारी माझ्यावर नाही.अर्थातच प्रत्येकाने लेख आपल्या जबाबदारीवर वाचावा किंवा अनुकरण करावा हे सांगणे नलगे. पुढील माहिती विकीवरून साभार --- तर १९८३ मध्ये अमेरिकन क्रिप्टोग्राफर डेव्हिड चाम यांनी इ-कॅश नावाच्या अज्ञात क्रिप्टोग्राफिक इलेक्ट्रॉनिक पैशाची कल्पना केली.

टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल गाडीचा, पुरेशा वापरानंतरचा रिव्यू

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 05/04/2021 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे हा धागा मी काढला होता. तिथल्या सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. २० सप्टेंबर २०२० ला गाडी हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन असं ठरवलं होतं पण मग म्हटलं पाचेक हजार किमी वापरानंतर लिहावा (टंकाळा, दुसरं काय!). आता लिहितोय. उशीर झाल्याबद्धल क्षमस्व. स्वतःची नवीन चारचाकी घेण्याचा पहिलाच अनुभव होता. पोटात अनेक फुलपाखरे बागडत आहेत असं उगीच वाटत होतं.

पणजीचं लुगडं (भाग -१)

लेखक Bhakti यांनी रविवार, 04/04/2021 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
दीपाचं पहिलच बाळंतपण. अमेरिकेमध्ये लीगल असुनही जेन्डर रिव्हील न करण्याचं जोडप्यानं ठरवलं होतं. तेव्हा भारतात सगळ्यांची पेढा की बर्फी याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मऊ मऊ कापडात गुंडाळलेला इवलासा जीव टुकू टुकू आईबाबांना पाहत होता.. संदीपने कळवल.. ”बर्फी झाली हो..” रजनीकाकूंनी लगेच देवासमोर बर्फीचा पुडा ठेवला. अशोककाकांनी पेढा आणि बर्फी हे दोन्ही पुडे आणून ठेवले होते. ”मुलीच्या पहिल्या बाळाचा उत्साह काही वेगळाच अनुभव देतो”, अशोककाका म्हणाले. ”त्यात आज मार्गशीष अष्टमीही आहे, चांगला योग आला.

शेअरमार्केट ची बाराखडी... भाग २.१ : Technical Analysis - Heikin-Ashi charts आणि bollinger bands

लेखक गणेशा यांनी रविवार, 04/04/2021 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आधिचे भाग - भाग ० : Basics - By गणेशा - https://misalpav.com/node/48553 भाग ०.१: मार्जिन - By बिटाकाका - https://misalpav.com/node/48574 भाग १: Fundamental Analysis - By गणेशा - https://misalpav.com/node/48578 -------------------------------------- प्रस्तावना : प्रस्तावना लिहावी लागण्याची तशी गरज नसेल असे आधी मला वाटलेले.. पण तसे नसल्याने लिहितो. आता आपण Technical Analysis पाहणार आहोत.

मलई

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 03/04/2021 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
महामार्गाला लागूनच असलेल्या त्या मोठ्या झोपडपट्टीत सगळं एकदम शांत होतं. हायवेवर धावणार्या जडशीळ ट्रेलरचा दणदणाट आणि त्या दिशेने भुंकणारी कुत्री यांचा आवाज सोडला तर बाकी सगळं सुमसाम. रघ्याच्या पत्र्याच्या झोपडीत मात्र रात्रीचे एक वाजले तरी साठचा बल्ब जळत होता. बाकीच्या झोपड्यातून लोकांची बत्ती केव्हाच गुल झालेली. दहा दिवसांपूर्वीच सेन्ट्रल जेलमधून बाहेर पडलेला रघ्या.! या दहा दिवसात कुठंतरी नक्कीच नजर लावून होता. कायतरी साॅल्लीड प्लान रघ्याच्या उजाड खोपडीत नक्कीच घुमत असल्याशिवाय त्याने बाकीच्या चौघांना भेटायला बोलवलेच नसते. ”खबर पक्कीये.

या अशा कुंठीत वेळी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 03/04/2021 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
एकही कविता आताशा काळजाला भिडत नाही शब्द मोहक विभ्रमांनी  भ्रमित आता करीत नाही कोरडा असतो किनारा  लाट फुटते मत्त तरिही जखम होते खोलवर पण  रक्त आता येत नाही प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ,  बीजअक्षर श्रांतलेले भंगलेल्या देवतांना  आळवूनी भ्रष्टलेले मार्गदर्शी ध्रुव अन्  सप्तर्षी आता लोपलेले दीपस्तंभांचे दिवेही  भासती मंदावलेले या अशा कुंठीत वेळी दाटुनी येते मनी विफलता, जी रोज उरते  रोमरोमा व्यापुनी एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी
काव्यरस

काळ

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 03/04/2021 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
काळ वासंती तिशीची झाली तरी लग्नाचा विचार करायला तयार नव्हती. तिच्या आई-वडिलांना ती काहीशी उशिराच झाली होती. बाबा आणि आई देखील दोघेही रिटायर होऊन सिनियर सिटीझन्सचं आयुष्य जगायला लागल्याला आता तीन-चार वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण धडधाकट आहोत आणि थोडीफार जमापुंजी हाताशी आहे तोपर्यंत लेकीचं लग्न हौसेमौजेने करून टाकावं. वासंती अत्यंत हुशार मुलगी होती आणि दिसायला देखील छानच होती. लांब काळेभोर केसांची एक लांबसडक वेणी ती घालायची. मोठे बोलके डोळे होते तिचे. राहणी अगदी साधी होती. आजच्या काळातदेखील ती ऑफिसला जाताना व्यवस्थित साडी नेसून जात असे.