वाहतूकदारांच्या संप
नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास लवकर उठून सुप्रभाती चालत चालत रेल्वे स्टेशन पर्यंत रहदारी नसलेल्या रस्त्यावरुन जाण्याची मजा कधी अनुभवली आहे ?
कालपर्यंत कंपनीने दिलेल्या गाडीतून आरामात जाणारा बॉस ८.०५ च्या ठाणे लोकल मधे लोंबकाळत उभा आहे आणि ऑफीस मधे पोचल्या पोचल्या संध्याकाळच्या गाड्यांचे वेळापत्रक विचारुन एकत्र जाण्याचे आश्वासन देत आहे असा विचार तरी कोणी करील का ?
पण असे घडायला सुरवात झाली आहे.
निमित्य वाहतुकदारांचा संप
काही दिवसांपुर्वी चालू झालेल्या वाहतुकदारांच्या संपाकडे कॉमन मॅनचे फारसे लक्ष नव्हते. मला काय त्याचे अशी सर्वसाधार्ण मनोवृती होती.
मिसळपाव