Skip to main content

उत्तरायण

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 17/01/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
यावर्षी १४ जानेवारीला संक्रांत होती. ती कधी १३ तारखेला येते कधी १५ ला! त्याचं कारण मला माहित नाही. पण असं म्हणतात की त्या दिवशी सूर्य मकरराशीत प्रवेश करतो म्हणून ती मकरसंक्रांत. आता या मकरसंक्रांतीचं काय महत्त्व, तर तेव्हापासून म्हणे सूर्य उत्तरेकडे सरकायला लागतो. आपल्यापैकी बर्‍याच लोकांना भूगोलात शिकलेलं आठवत असेल की उत्तर गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो २२ डिसेंबर या दिवशी, तर मग संक्रांत जानेवारीत का येते? पृथ्वीवर ऋतू होतात ते पृथ्वीचा आस कलता असल्यामुळे! या आसाचा उभ्या सरळ रेषेशी सध्या साधारण २३.५ अंश एवढा कोन आहे.

कुणी सांगेल का ?

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 17/01/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळ पावा वरील पाककृती या स्थळाचा विशेष चाहता आहे. या सदरावरील मान्यवर मंडळी ना माझी एक विनंती आहे की कृपा करून कुणी माझ्या एका शंकेचे निरसन कराल का ? मी जेव्हा पण इडली हा पदार्थ करतो तो नेहमी बरोबर होत नाही इडली ही जड होते ती मऊ होत नाही म्हणजे हलकी होत नाही मला फक्त ती कृती कुणी सांगेल का ? की ज्यामुळे इडली ही मऊ करता येईल...............

"नात॑......!!!!"

लेखक डोम्बिवली फास्ट यांनी शनिवार, 17/01/2009 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
:D ;;) नात॑......!!! एक नात॑ जन्माच॑, ते फक्त असत॑ आईच॑, अस्तित्व असत॑ ममतेच॑, वात्सल्याच॑, येथे स्वार्थाला मात्र स्थान नसत॑.... !! एक नात॑ रक्ताच॑, जे फक्त असत॑ भाऊ-बहिणीच॑, ज्यात फक्त राज्य असत॑ मायेच॑, आपुलकीच॑.... !! एक नात॑ कर्माच॑, ज्यात असते कसोटी साठी निष्ठा, जेथे कामाला येते धैर्य, विरता.... !! एक नात॑ प्रेमाच॑, जिथे असतो एक विश्वास, दोन शरीर॑ अन् एक श्वास....!! एक नात॑ मैत्रीच॑, महत्त्व यात आहे वेळेच॑, पड्त्या वेळेला लागणारया आधाराच॑....!!

फक्त तुझा ....!!!!

लेखक डोम्बिवली फास्ट यांनी शनिवार, 17/01/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
:X झोप माझी असली तरी, स्वप्न मात्र तुझीच आहेत... (|: , श्ब्द माझे असले तरी, सार्मथ्य मात्र तुझेच आहे......., :H सुर माझे असतील तरी, गीत मात्र तुझेच आहे.......... :P , प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाच आहे..........., :''( प्रेम माझे असले जरी तुजवर, सुग॑ध मात्र तुझाच आहे................ =P~ , वेडा मी असलो तरी, वेड मात्र तुझेच आहे......... :''( !!!!!!!!!!! - =(( फक्त तुझाच वेड प्रियकर.
Taxonomy upgrade extras

पण तू मात्र.........

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 17/01/2009 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
1) कसे करू माफ़ तुला जे घाव तू मला दिले...... घेऊन माझी फूले तू काटेच मला दिले...... 2) तू भातुकलीच्या खेळामधली मी राजा खरा " खुळा"...... सखे, तू माझा प्रेमात केसा ने कापला गळा...... 3) तू सर्व काही दिलेस पण उत्तर दिले नाहीस...... प्रश्न बनू न राहिलिस जीवनात प्रश्न सोडवलेस नाहीस....... 4)चूक तुझी नाही दोष नशीबाचा असेल...... जीव ओवळुन टाकल्या वरही कुणि आपले होत नसेल....... ५)स्वप्न देउन कुणाच्या मुठित ती पूर्ण करायला शिकायचे......... जीवनात एक दा तरी फक्त ख-या प्रेमासाठिच जगायचे..........
Taxonomy upgrade extras

१६ डिसेंबर ०८

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 16/01/2009 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
१६ डिसेंबर, मंगळवार.. सकाळी ७ चा सुमार, पारा मायनसकडे झुकलेला.. सूर्याची लेट ड्यूटी.. उजाडायला अजून चिकार अवकाश.. दिनेश बूट घालत असताना फोन खणाणला. आत्ता एवढ्या सकाळी कोणाचा फोन? म्हणत त्याने फोन घेतला आणि बापरे..बरं .. म्हणत ठेवलाही. कोणाचा फोन होता?ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी अंगातला ओव्हरकोट काढून त्याने सोफ्यावर फेकला. "अरे,काय झालं? कोणाचा फोन होता? " "बाबा गेले." तो सुन्नपणे म्हणाला. "बाबा गेले? कोणाचे?" "अग, आपले..सुधीरचा फोन होता." "शक्यच नाही.

आम्ही -एक अंमळ वेडझवे

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 16/01/2009 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
मास्तर, हे तुम्ही सर्व फुकट का करता. कमीत कमी खर्च तरी घ्या. -इती ब्रिटीश आज रेतीबंदरावर बाल्या उर्फ ब्रिटीश भेटला. समोर दिसला, त्याला माझा प्रोजेक्ट सांगितला. मागे त्याने "मास्तर्,आमच्या पाड्याकडे पण बघा" असे प्रतिक्रियेत मला आवाहन केले होते. समोर दिसल्यावर ते वाक्य आठवले आणि म्हटले चला करुन टाकु. त्याला म्हटले, "बाल्या तुझ्या पाड्यावर इंग्रजी माध्यमाची शाळा आहे का? तो म्हणाला,"आहे की". चल, मग कामाला लाग. पाड्यावरच्या मुख्याध्यपकाला भेट आणि माझा कार्यक्रम ठेव. कार्यक्रम झाल्यावर मी त्यांना शेवटच्या महिन्यात तयारी वाढवण्याकरिता सराव परिक्षेचे पेपर देइन.