Skip to main content

एक अंमळ मजेदार बातमी..

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 04/02/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या 'इ-सकाळ'मधे ही बातमी वाचनात आली. बातमी ऐकून मजा वाटलीच आणि या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने आपण एका मोठ्या जंगी सामन्यापासून दूर राहीलो याबद्दल खेदही वाटला. प्रस्तुत बातमीत अनेक समिक्षकानी वेगवेगळ्या कविना आणि त्यांच्या कवितांना धारेवर धरले. तसेच कवींची केवळ रोमँटिक कविता केल्याबद्दल हेटाळणी केली. नंतर एका कविराजानी या सर्व टीकाकारांचा उपरोधिक शब्दात समाचार घ्यायला सुरुवात केल्यावर मात्र संबंधित समिक्षक चिडले व गोंधळ सुरू केला. अधिक माहीती वरील दुव्यावर वाचावी.

उत्साहाचं भरीत!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 04/02/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
`मिपा'वर सातत्याने येत असलेल्या पाकक्रुतीच्या प्रकारांपासून प्रेरणा घेऊन आपणही अनुभवलेला एखादा पाकक्रुतीचा प्रकार इथे टाकावा, असं वाटलं. तोच हा प्रयत्न. ------------ उत्साहाचं भरीत! साहित्य ः प्रचंड उत्साह, चवीपुरता चटपटीतपणा, शोभेपुरता रंगेलपणा आणि बचकाभर ऊर्जा. कृती ः प्रथम प्रचंड उत्साह शरीर आणि मनभर घुसळून घ्यावा. अंगात सर्वत्र भिनवून घ्यावा. वाटल्यास आपल्या पूर्वानुभवाचाही त्यासाठी वापर करावा. मग त्यात चवीपुरता चटपटीतपणा चांगला मिसळून घ्यावा.

तोतयांचे बंड!!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 03/02/2009 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, गेल्या दोन दिवसांत मिपावर एक महत्वपूर्ण घटना घडली...... तुमच्या लक्षांत आलीये का? या दोन दिवसांत मिपावर एकंदर सहा (चूभूद्याघ्या) विडंबनं सादर झाली.... धनंजयने "धुकट सकाळ" लिहिली त्यावर बेसनलाडवाचं "फुकट सकाळ" हे विडंबन आलं.

ही चव कधी घेतलीत?

लेखक अनंत छंदी यांनी मंगळवार, 03/02/2009 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे आंजर्ले, हर्णै, मुरूड परिसरात सहल केल्याचा धागा मिपावर प्रकाशित करण्यात आला होता. त्यात या परिसराचे सुंदर, सचित्र वर्णन करण्यात आले आहे. परंतु या भागातील खादाडीवर फारसा प्रकाश पडल्याचे दिसत नाही. म्हणून थोडी माहिती. शाकाहारी मंडळींना मुरूड गावातील घरगुती खाणावळीत खास उकडीचे मोदक, डाळींब्यांची उसळ, आत्ता हिवाळ्यात ओल्या पावट्यांची भरपूर खोबरे घालून केलेली उसळ या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. उन्हाळ्यात आमरस व घावन फणसाचे सांदण यांची चव घेता येते.सामीष पदार्थांचा आस्वाद घेणार्‍यांची तर केवळ चंगळ असते.

लावणी-प्रणयरातीला कुठ चालला

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 03/02/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
रात चांदण टिपूर सांडल वार्‍याचा बी साज नवा प्रणयरातीला कुठ चालला शृंगाराला सोडून या नथनी पैंजण दूर ठेवल कशास त्यांची भीड उगा प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका हाती माझ्या हात सख्याचा अन् फुललेली रात हवी नभांगणातील लाख चांदणी प्रीत बघुनी जळल मनी प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी अस सामोर जाव रातीला रोजच व्हावी रात नवी
Taxonomy upgrade extras

सोबतीला पाव आहे

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 03/02/2009 19:16 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा जयंतरावांची सुंदर गझल सोबतीचा आव आहे आणि आमच्या गुरुजींचे दर्जेदार विडंबन (सोबतीचा आव आहे)

वाढला सांबार आहे, ब्रॉथ नाही
सोबतीला पाव आहे, भात नाही

भोवती अंधार आहे, रात नाही
चुंबिला तो पाय आहे, हात नाही

वाटतो हा  खेळ पण ना फार सोपा
राहिले तोंडात बाकी दात नाही

घासतो  मी स्वखुषीने रोज भांडी
सांगतो, पण मी तुझ्या धाकात नाही

कारल्याची कोशिंबीर

लेखक शाल्मली यांनी मंगळवार, 03/02/2009 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
कारल्याची कोशिंबीर
साहित्य :- २ ते ३ कारली १ मध्यम कांदा - बारीक चिरून १ मोठा चमचा दाण्याचे कूट अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर २ चमचे लिंबाचा रस २ मिरच्या चवीप्रमाणे मीठ २ चमचे तेल फोडणीचे साहित्य - मोहरी, जिरे, हिंग, हळद कृती:- कोशिंबीर करायच्या आधी २ ते २.५ तास कारली उभी मधे चिरून घ्यावी.

व्यर्थ न हो बलिदान...

लेखक यांनी मंगळवार, 03/02/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
मरकेगाव, तालुका धानोरा. नक्षलवाद्यांनी पंधरा पोलिसांना हाल हाल करून मारलं. कुणाच्या डोळ्यात पहार खुपसली, कुणाचे हात पाय तोडले,तर कुणाच्या डोक्यात दगड घालून मेंदू बाहेर काढलेला... कुणाही जखमीला गोळी घालू नका! त्यांना दगडाने सळईने चेचून मारा असं त्या नक्षलवाद्यांचा प्रमुख ओरडून सांगत होता. लोकसत्तात आलेली ही बातमी. आज भारताला नक्की धोका कुणापासून आहे? बाहेरील देशातून आलेल्या दहशतवाद्यांकडून का स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाल्यानंतर सुद्धा नायनाट न करता आलेल्या अंतर्गत अतिरेक्यांकडून?

म्हणजे-२

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 03/02/2009 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ सकाळी मिपावर आल्यावर बघितले तर सगळेच म्हणजे (म्हणजे)म्हणजे...>(( म्हणजे )) करता आहेत..अस असताना आम्ही गप्प बसावे म्हणजे........ "ओढ" म्हणजे काय ते दारू सोडल्याशिवाय समजत नाही. "विरह" म्हणजे काय ते ड्राय डे असल्याशिवाय समजत नाही. "प्रेम" म्हणजे काय ते बापाचा मार खाल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते लग्न केल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते विडंबनातून निवॄत्त झाल्याशिवाय सम

कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 03/02/2009 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
गुंजन करण्या का कष्ट विहंग घेई ही समस्या सदैव माझ्या मनी येई गीत लिहूनी कवी ते गाण्या देई सप्तसूरातून गायिका मग गान गाई कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी अपुले कवन सहजगत्या तो गाई प्रीति कशी एकमेकावरी करावी गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी अपुली प्रीति सहजगत्या व्हावी हीच कामना कवनातूनी मिळावी श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras