Skip to main content

(( म्हणजे ))

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 03/02/2009 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते १ आयडी उडवल्यावर लगेच दुसरा काढल्याशिवाय समजत नाही. "विरह" म्हणजे काय ते आपला आयपी ब्लॉक केला गेल्याशिवाय समजत नाही. "गेम" म्हणजे काय ते हिट्स वाढवुन सर्व्हरवर ताण आणल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते तरीसुद्धा संकेतस्थळ चालु असल्याचे पाहिल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते आपला पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते दिवसातुन एकदातरी आंतरजालावर गजाल्या केल्याशिवाय समजत नाही. आधारीत : - म्हणजे आणि (म्हणजे) वास्तविक पाहता काव्य आणि विडंबन हा आमचा प्रांत न्हवे, पण आज कंट्रोल सुटला. हे आमचे विडंबनाचे पहिले नवजात अपत्य आमचे मानस गुरु "केशवसुमार शेठ" व आमचे परममित्र "केशवयात्री" यांना विभागुन अर्पण ..! आता यापुढे ह्याचा सांभाळ त्यांनीच करावा ..! ;)
Taxonomy upgrade extras

वाचने 6996
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

झकास डॉन्या! "प्रतिसाद" म्हणजे काय ते पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी नेल्याशिवाय समजत नाही.

खल्लास विडंबन!!! (शितल तुझी कविता इतली भारी आहे की एकामागे एक तीन विडंबनं आली एकाच दिवसात! :)) चतुरंग

=)) बेष्ट रे डॉणूरंगा .. - टारझ'न' 'ण' बद्दल प्राजु ची माफी , ऍज सेड येल्लो णॉटी, माय हाड ऑफ विंडेक्स बोट, इज ग्रोन यक्स्ट्रा.

बहरलाय.. डॉन्या आणी विडंबन :O =)) मला काय बुध्दी झाली "म्हणजे... " काय ते मिपाकरांना सांगितले देव (मिपावरील नव्हे ;) )जाणे

येक लंबर इडंबन आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

एक लंबर हो डानराव पाटील. आज तुमच्याशी राजकीय युती केल्याचा फार्फार आनंद होत आहे. अवांतरः केशवयात्री का केशवटुकार (पक्षी: आनंदयात्री)? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मस्त रे डॉणभौ ! खल्लासच इडंबन! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

अगदी भारी! "दु:ख" म्हणजे काय ते पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही. कवीन अगदी आपलां हृदय उघडां केला दिसतां!!!!! :)

डानराव, मस्त, छान, सुरेख... कवितेतलं ओ का ठो कळत नसल्यानं जे न देखे रवि हा विभाग कधीच उघडला नाही. तुमचं नाव वाचून धाग्यावर टिचकी दिली. तुम्ही छान लिहिता हे माहिती होतं पण आता या प्रांतात सुद्धा मस्त भाईगिरी केलीय तुम्ही.

रे डान्या! चला आता त्या केशवटूकारांना रिटायर करुन हिमालयात पाठवा तपश्चर्येला! ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

डॉन्राव, एकदम धडाके बाज विडंबन.. अभिनंदन.. चांगले चालू आहे..चालू दे.. (सुखी)केशवसुमार..

विडंबन म्हणजे काय ते ओरिजिनल वाचल्याशिवाय समजत नाही :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

"दु:ख" म्हणजे काय ते आपला पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही.
आवड्या आवड्या! :)

पोरांनो , काय श्वास घ्यायला फुरसद द्याल का नाही आज ! =))

In reply to by मुक्तसुनीत

बरं झालं मी नव्हतो ऑनलाइन आज दिवसभर. ऑफिसातून पळच काढावा लागला असता. =)) बिपिन कार्यकर्ते

हा हा हा मस्त रे डॉन भाय! माझा पण प्रयत्ण! बाझवला तिच्याआयला म्हणजे काय ते मिसळ पावची तर्री ओरपल्या शिवाय कळत नाही.

हा आमच्या काव्यप्रांतातला पहिलाच प्रयोग असुनसुद्धा कौतुक करण्यासाठी प्रतिसाद देणार्‍या व न प्रतिसाद देता कौतुक करणार्‍या व कौतुक न करणार्‍यांचेही आभार ..! धन्यवाद. :) ------ ( ह्या बाबतीतही "केसुं"चा शिष्य ) छोटा डॉन

अर्पणपत्रिका पण छान जमलीय. आपल्या अपत्याचे दोन दोन पालक असतांना त्याचे चांगलेच पालनपोषण होईल. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)