Skip to main content

सोबतीला पाव आहे

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 03/02/2009 19:16 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा जयंतरावांची सुंदर गझल सोबतीचा आव आहे आणि आमच्या गुरुजींचे दर्जेदार विडंबन (सोबतीचा आव आहे)

वाढला सांबार आहे, ब्रॉथ नाही
सोबतीला पाव आहे, भात नाही

भोवती अंधार आहे, रात नाही
चुंबिला तो पाय आहे, हात नाही

वाटतो हा  खेळ पण ना फार सोपा
राहिले तोंडात बाकी दात नाही

घासतो  मी स्वखुषीने रोज भांडी
सांगतो, पण मी तुझ्या धाकात नाही

का बरे त्यांची घरे ही साफ दिसती?
गावभर करती उकिर्डा, आत नाही ;)

सोडल्यावर तो म्हणाला, काल वायू
फक्ता हा आवाज आहे, वात नाही.

हा विडंबन पाडण्या  तैयार असतो
खोड "केश्या" ची कशी ही जात नाही

(केशवसुमार)

लेखनविषय:

वाचने 3954
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

वाहवा .. फार मस्त :) विडंबन आवडले.. का बरे त्यांची घरे ही साफ दिसती? गावभर करती उकिर्डा, आत नाही सोडल्यावर तो म्हणाला, काल वायू फक्ता हा आवाज आहे, वात नाही. हे विशेष ! मूळ कवितेतला 'आत नाही 'हा शेर सुद्धा मस्तच आहे.. -- लिखाळ.

व्वा !! दर्जेदार विडंबण आवडले का बरे त्यांची घरे ही साफ दिसती? गावभर करती उकिर्डा, आत नाही विशेष आवडले

In reply to by विनायक प्रभू

पुढचे आणि मागचे मधे गडबड आहे.. बाकी चोराच्या मनात ... केशवसुमार (स्वगतः :W अरे हा माणूस समोपदेशन करतो ना मग ह्याला ...... जाउ दे ..चालायचं :B )

अतिशय दर्जेदार विडंबन. गुर्जी..... आपण खरंच धन्य आहात. प्रत्येक शेरावर... हसू येतं. मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बोर्थ म्हणजे काय ? बाकी विडंबन छान. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मलाही प्रश्न पडला आहे हा. बोर्थ म्हणजे काय? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

घासतो मी स्वखुषीने रोज भांडी सांगतो, पण मी तुझ्या धाकात नाही हाहाहाहा (धाकातला)बेसनलाडू

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार