Skip to main content

आजार्‍याकडून डॉक्टरने ऐकणं हेच उपचाराचं प्रभावी औषध आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 05/02/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि भाई नेरूरकर एकाच गावातले.एकाच शाळेत शिकत होतो.भाईचे वडील डॉक्टर होते.निरनीराळ्या खेड्यात जाऊन ते आजार्‍याना भेटून उपचार करून येत असत.पण नंतर नंतर त्याना त्यांच्या मोटरबाईक वरून प्रवास जमे ना. तोपर्यंत भाई ग्रॅन्डमेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पुरं करून एम. डी.

कृष्ण कमळ

लेखक मीनल यांनी गुरुवार, 05/02/2009 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर `बकुळ फुले`, `मोगरा` वाचल. म्हटल आपण ही वहाव एक फूल.. कृष्ण कमळ. ह्या फूलाला नाव कुणी दिल माहित नाही पण आहे मात्र अगदी योग्य. म्हणजे कृष्णासारख कमळ किंवा कमळातला कृष्ण. कृष्णासारख कमळ… कमळाची पाकळी पाहिलीत तर ती नैवेद्द घेण्यासाठी आपण जसा हाताचा द्रोण करू तशी असते. मधे फुगीर बाहेर गेलाला भाग आणि कडा जराश्या आत वळलेल्या.

गाण्यातल्या जागा

लेखक रोहन देशपांडे यांनी गुरुवार, 05/02/2009 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा प्रसिद्ध गायक वगैरे लोक गाण्यातील अमुक एक जागा प्रसिद्ध आहे असे म्हणतात. ह्या जागा म्हणजे नेमके काय असते? गाण्यातल्या ह्या जागा म्हणजे काही विशी्ष्ठ शब्द असतात की स्वर समुह अस्तो? इकडे संगीतातले अनेक जाणकार आहेत. कृपया गाण्यातल्या जागांविषयी लिहिलेत तर आवडेल. प्रतिसादात उदाहरणे दिलीत तर अजुनच छान. रोहन

बाम

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 05/02/2009 03:40 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल विश्राम

वादळ..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 05/02/2009 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे. मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.) "अरे अजिंक्य, सगळीकडे हेच चालू आहे. न्यूज वर, पेपरात, रेडीओवर.. बाहेर तर हिंदुमुस्लिम दंगल उसळली आहे... देव जाणे काय होणार आहे..? आपण आपल्या गावापासून इतक्या लांब. आई-बाबांचं काय झालं असेल? त्यांना किती काळजी लागून राहिली असेल. टेलिफोन बूथ सुद्धा बंद आहेत." वैभव अजिंक्यशी बोलत होता.

आपले दुरावलेले बांधव - रोमा

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 05/02/2009 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ही बातमी झळकली अन पुन्हा एकदा रोमांवरील पूर्वी कधितरी केलेल्या वाचनातील आठवणी जाग्या झाल्या. देशोदेशांत लढाया-युद्धे झाली त्या त्या वेळी तिकडून भारतात स्थलांतरीत झालेल्या लोकांना कायमचा आश्रय मिळाला. भारतीयांनी जगातल्या जवळपास प्रत्येक मुख्य भागातल्या लोकांना आश्रीत म्हणून येथे आल्यावर आपल्यात सामावून घेतले. मात्र खूप कमी वेळा भारतातून जीव वाचवून लोकांना बाहेरच्या जगाचा आश्रय घ्यावा लागला. त्या अपवादांमधले विषेश लक्षात घेण्यासारखे हे रोमा.

<प्रवाह....आणि उत्तर>

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 05/02/2009 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हापाशी आत्ता फार नाही वेळ संक्षेपे सकळ वर्णितो ऐका कवींनी आणिली आम्हावरी वेळ काव्याचा सुकाळ करोनिया विडंबने झाली संस्थळी उदंड करावया दंड प्राजु येई डांबिसकाकाची पुतणी प्रेमाची गट्टी मिपामाजी अनोखीच कवींची माऊली मिपाची आवली सांडूनी 'पावली' शोधी आता!:) विडंबनकर्ते सारे अवखळ लेखणी सबळ चालविती मास्तर्णीभवती गोंगाट करीती आदेश मारती फाट्यावरी काका म्हणे प्राजु संपव हा वाद सोड तूच नाद या टग्यांचा :) नानाचा तू सल्ला घेई मनावर लेख हा सुंदर येऊ देत
Taxonomy upgrade extras

झोपेचे अनेक प्रकार

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 05/02/2009 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
झोपेचे अनेक प्रकार आहेत... १ झोपणे.. २ डोळा लागणे. ३ ढाराढुर झोपणे. ४ वामकुक्षि ५ अंमळ पडणे. ६ अर्धवट डोळा लागणे. ७ पसरणे. ८ गादित लोळणे. ९ साखर झोप. १० बेंगी झोपेचा एक हा प्रकार आहे.. ज्या मधे माणसाला दिवसभर झोपावेसे वाटते. आपण ह्या यादित काहि भर टाकु शकता का? ___________________________________________________