Skip to main content

बाम

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 05/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल विश्राम

आज, सर्दी फार झाली पण कुठे तो बाम आहे
चोंदल्या  नाकात माझ्या पार ट्रॅफिक जाम आहे

पाहते ती वाट माझी, मी घरी जोषात जातो
पण तिच्या बापास बघता,  येत मजला घाम आहे

खूपसे समदुःखी आणिक वानवा नाही बघ्यांची
आमचा हा बायकोशी चालला संग्राम आहे

बायको पाहून दारी बांधतो अंदाज आम्ही
स्वागताला आज अमुच्या काय जो इतमाम आहे

पत्नीपूजेचा 'गुन्हा' चुकला कुणा; सारेच नवरे
घासतो भांडी कुणी, कोणी गडी घरकाम आहे

चार खंबे ढोसण्यासाठीच जमले दोस्त माझे
बोलले, " नाहीतरी मज काय दुसरे काम आहे? "

पाडुनी गेलाच शेवट शब्दपाचोळ्यास "केश्या"
तो तसा  धर्मास अपुल्या राहिलेला ठाम आहे...

लेखनविषय:

वाचने 2672
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आज सर्दी फार झाली ...............पार ट्रेफिक जाम आहे बायकोला चुकवून मैत्रीणीबरोबर पहिल्या पावसात भिजल्याचा केशवसुमारान्ना पडलेला हा दाम आहे

पत्नीपूजेचा 'गुन्हा' चुकला कुणा; सारेच नवरे घासतो भांडी कुणी, कोणी गडी घरकाम आहे =)) चालुध्या... मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापसून आभार!! (आभारी) केशवसुमार

टाळ्या टाळ्या.. पत्निपूजेचा गुन्हा आणि इतमाम मस्तच :) लिखाळ.

कसल लिहीलय..