मिसळपावावर विडंबने लिहिणारे सर्व लोक बिगरविडंबनात्मक लेख/कविता लिहितातच, म्हणून खरे तर क्रमांक २ गमतीदार (पण संदर्भ नसलेली) तत्त्वचर्चा आहे.
क्रमांक २ मला पटलेला नाही पण गंमत म्हणून विचाराधीन आहे.
मागे तात्यांनी (एका प्रसिद्ध कलाकाराचे) वाक्य उद्धृत केले होते, की स्वतः स्टेजवर बसून श्रोत्यांसमोर दहा मिनिटे गायल्याशिवाय समीक्षण करू नये.
विडंबन हे एका प्रकारचे समीक्षण असते - त्या कवितेची लय आणि बांधणी आवडल्याची (किंवा नावडल्याची) दाद विडंबक देत असतो. (कवितेच्या आशयाबद्दल समीक्षण नसते, कारण विषय विडंबनात वेगळे असतात.)
दर्जेदार (?) पुढील प्रश्नचिह्नाशी सहमत आहे. काही विडंबने मूळ रचनेपेक्षा दर्जेदार असतात.
(अती हसल्यामुळे माऊस ठरत नाही, सारखा हलतो आहे, म्हणून कुठल्याच पर्यायावर टिचकी मारलेली नाही.)
त्या कवितेची लय आणि बांधणी आवडल्याची (किंवा नावडल्याची) दाद विडंबक देत असतो. (कवितेच्या आशयाबद्दल समीक्षण नसते, कारण विषय विडंबनात वेगळे असतात.
असे नेहेमीच असते असे नाही. केशवकुमारांनी केलेल्या केशवसूतांच्या "आम्ही कोण" ह्या विडंबनाची आठवण येते. येथे आशयाच्या अतिशयोक्तीने विनोदनिर्मिती केली गेली आहे. लय आणि बांधणी अर्थातच तशीच ठेवली आहे.
असो, कोणताच पर्याय पसंत पडल्याने, मतदानावर बहिष्कार!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
काय केसु , च्यामारी कशाला खेचताय पामरांची !
विडंबन म्हणजे सूडात बुडवून काढलेल्या तलवारीचे अंधारात मागून कमरेखाली केलेले वार नव्हेत. आणि हे जोवर होत नाही , तोवर ज्याना ज्याची मनसोक्त थट्टा करायची आहे ती करू द्या की !
त्यामुळे माझा पर्याय : जो जे वांछील तो ते लिहो ............प्राणिजात !! =))
>>एक दर्जेदार (?) लेख/ कविता लिहिल्या शिवाय विडंबन लिहायला परवांगी नसावी
हा हा हा ! मस्त !
मतदान केले नाही. लेखनाच्या बाबतीत कोणतेच बंधन नसावे ! अजून येऊ द्या विडंबने. :)
स्वगतः केशवसुमाराला कामामुळे यापुढे विडंबनाला वेळ मिळणार नाही, त्यासाठी तर हा धागा काढला नस्सेल :?
प्रतिक्रिया
भारी आहात..
भारी आहात
नेहेमीच नाही..
In reply to भारी आहात by धनंजय
माझा पर्याय
कौलाच विडंबन..
केश्या
कौलारू
In reply to केश्या by प्रियाली
हा हा हा :)
जोजे