Skip to main content

शाप की आशीर्वाद?

Published on 04/08/2025 - 10:02 प्रकाशित मुखपृष्ठ
शाप की आशीर्वाद? ========== -राजीव उपाध्ये ...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत. मला मी विठ्ठल सीताराम गुर्जरांचा पणतू आहे (गुर्जरांची सख्खी बहिण माझी सख्खी पणजी) याचं शाळेत असल्यापासून खुप भारी वाटत असे. ९वीत असतांना मी शाळेच्या वार्षिकात त्यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि आजोबांना (आईच्या वडिलांना) सांगितले. आजोबांनी टुणकन उडी मारून मला सर्व मदत करायचे ठरवले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2502

Polymathic Aversion Syndrome चे निदान

Published on 02/08/2025 - 10:23 प्रकाशित मुखपृष्ठ
 Polymathic Aversion Syndrome चे निदान या विषयी मार्गदर्शन समजा अ ही व्यक्ती वेगवेगळ्या आवडीच्या विषयात रस घेते आणि जीवन आनंदाने व्यतीत करते. आणि ब ही अ हया व्यक्तीला सर्वज्ञ समजते आणि सतत किरकिर आणि ब चा द्वेष करत राहते ( ब ला अ चे अस्तित्व सहन होत नाही). अ च्या प्रत्येक पोस्ट्वर ब ला काही तरी शिटल्याशिवाय दिवस जात नाही. या विकृतीला वैद्यकीय परिभाषेत **"Polymathic Aversion Syndrome"** असे म्हणता येईल असे वाटते.
लेखनविषय:

याद्या 909

दिवाळी अंक २०२५ - आवाहन

Published on 01/08/2025 - 15:26 प्रकाशित मुखपृष्ठ
आम्ही यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकासाठी (२०२५) साहित्य मागवत आहोत. दिवाळी अंकासाठी लेखन पाठवा असे आवाहन लिहिण्यासाठीच फार वेळ घेतला आणि कालापव्यय केला, तर ते प्रकाशित होणार कधी, तुम्ही त्यानंतर लिहिणार कधी आणि ते आमच्यापर्यंत येऊन आम्ही त्यावर किरकोळ संपादकीय संस्कार आणि सजावट करणार कधी? अशा विचाराने मिपाकर सदस्यांसाठी आणि मिपा वाचकांसाठी हे छोटेसे निवेदन प्रकाशित करत आहोत. लेखन युनिकोड टेक्स्ट याच स्वरूपाचे असावे.

याद्या 12010

सूर्य आणी कावळे.

Published on 31/07/2025 - 20:40 प्रकाशित मुखपृष्ठ
महादेववाडीतील सूर्योदय ही चित्रफीत घरातूनच काढली आहे. उगवता आणी मावळता सुर्य बघणे एक अद्भुत अनुभव मिपाखरांनी घेतला असेल यात संदेह नाही.कन्याकुमारी, गणपतीपुळे, हिमालय व अगरतला येथून हा अद्भुत अनुभव मी घेतला आहे. काचंनसंध्येला हाच अद्भुत अनुभव जर घरातून दिसत असेल तर काय बोलावे.दुधात साखर आणी साय, दुग्धशर्करा पेक्षा मोठा योग. सकाळी बाल्कनीत बसून सकाळचा चहा आणी संध्याकाळी पाॅपकाॅर्न सोबत गेली बारा वर्षांपासून हा अद्भुत अनुभव घेत आहे.

याद्या 2123

किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?

Published on 31/07/2025 - 11:48 प्रकाशित मुखपृष्ठ
किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ? --राजीव उपाध्ये ए०आय० या तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. जी राष्ट्रे अशा तंत्रज्ञानाला लवकर स्वीकारतील त्यांना एकूणच जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ’अनफेअर ॲडव्हाण्टेज’ मिळणार हे निश्चित आहे. या तंत्रज्ञानाबरोबरच आणखी एक विज्ञानशाखा चीन सारख्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित पावत आहे. ती म्हणजे कृत्रीम जीवशास्त्र. अलिकडेच वाचनात आलेल्या काही बातम्यावरून असे लक्षात येते की कृत्रीम जीवशास्त्रातील प्रगती काही राष्ट्रांना असाच अमर्याद फायदा मिळवून देईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2263

ऑपरेशन सिंदूर: अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला

Published on 30/07/2025 - 11:19 प्रकाशित मुखपृष्ठ
अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध शेरखान आणि तवाकी सारखेच आहे. अमेरिकेच्या षड्यंत्रात पाकिस्तान नेहमीच अमेरिकेची मदत करत आला आहे. अफगाणिस्तान वर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तान ने विमानळे अमेरिकेला उधार दिले होते. सर्वप्रकारची सैन्य मदत ही केली होती. वैश्विक राजनीति मध्ये एक म्हण आहे, अमेरिकेपासून अमेरिकेच्या शत्रूला जेवढा धोका नाही त्यापेक्षा जास्त धोका मित्राला असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये ही हे दिसून आले. 9 मेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जे डी वेंस ने भारताच्या पंतप्रधान मोदीजींना सूचना दिली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार आहे.

याद्या 1703

नाग पंचमी

Published on 29/07/2025 - 14:54 प्रकाशित मुखपृष्ठ
नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे. उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते. या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2492

Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

Published on 28/07/2025 - 21:21 प्रकाशित मुखपृष्ठ
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग ✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग ✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा ✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान ✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता ✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा ✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2033

येरे येरे पावसा मराठी बालगीत, | Marathi Rhymes | Marathi Balgeet | Jingle Toons ए० आय० ने बनवलेले तिसरे पूर्ण मराठी गाणे

Published on 28/07/2025 - 14:17 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्ते मित्रानो आधीच्या दोन्ही ai मुद्रित गाण्यानं प्रतिसाद दिल्याबाद्दल धन्यवाद , जमल्यास कोणी मला बालगीतं स्वतः गाऊन दिले तर मला पूर्ण नव निर्मितीचं आनंद येईल सध्या ये रे पावसा वर अनिमेशन बनवले आहे https://youtu.be/qpFDvSvEH7c ,ह्यात एक नवीन प्रयत्न केला आहे , प्रत्येक वेळी प्राण्याची वेगळी रूपे झाले असे कि मी सारखेच प्राणी वापरू शकतो पण दरवेळी नवीन प्राणी आधी पेक्षा जास्त चांगले ,बाकी थोडी ai ची मर्यादा जश्या भारतीय रुपया बनावता आला नाही ,पण पावसाळा सुरु असल्याने हे आवडेल आधीच्या २ गाण्यांचे लिंक https://youtu.be/8un9_tUz13U https://youtu.be/ADozRUMBpd8

याद्या 669

बखरीच्या पानाआड

Published on 27/07/2025 - 20:49 प्रकाशित मुखपृष्ठ
बखरीच्या पानाआड पाहिले मी क्षणभर दडपल्या वास्तवाचे छिन्नभिन्न कलेवर प्रचलित इतिहास तुझ्या माझ्या मेंदूतून अज्ञाताच्या शक्यतांना टाके पुरता पुसून जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड?
लेखनविषय:

याद्या 1728