Skip to main content

ठकीचा संसार

लेखक प्राची यांनी शनिवार, 14/02/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार. मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती. मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.

वाळणताई डे

लेखक त्रास यांनी शनिवार, 14/02/2009 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
[एका चीनी प्रवाशाच्या डायरीतले संदर्भ- त्याने २० व्या शतकात भारतखंडाचा प्रवास केला होता- त्यातील एका प्रसंगाचे हे मराठी भाषांतर] दुनिया झुकती है, झुकानावाला पाहिजे असे संत लखोबा लोखंडे ह्यानी म्हंटले आहेच. मल्टीनॅशनल कंपन्यांनी वात्सायनाच्या भारतदेशाला प्रेम करायला शिकवले. आम्ही *सांस्कृतिक आक्रमण* वगैरे म्हणतात ते हेच असे बरेचदा लोकांना सांगुन पाहिले पण फुकटचे सल्ले लोकांना नको असतात असे सिद्ध झाल्यामुळे ते थांबवले. त्यांनी आम्हाला मोराल पोलिसींग करतोस असे म्हणून एक बेक्कार लूक दिला.

संकेतस्थळांचे मोबाईल व्हर्जन

लेखक माझी दुनिया यांनी शनिवार, 14/02/2009 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल फोन्सची स्मार्ट व्हर्जन्स उपलब्ध आहेत. शिवाय आजकाल जीपीआरएस ही सहजगत्या उपलब्ध होतयं. अशी स्थिती असताना मोबाईलवर आपले आवडते संकेतस्थळ पहायला मिळाले तर किती बरं होईल. एकतर सतत संगणक उघडून बसायला नको. शिवाय प्रवासात असतानाही आपला छोटासा मोबाईल उघडून आपण ही संकेतस्थळे पाहू शकतो. पण यात एक अडचण अशी आहे की , आपल्याला हव्या असलेले संकेतस्थळ मोबाईलमध्ये कसे काय दिसेल ? कारण सहाजिकच मोबाईलचा स्क्रिन आणि संगणकाचा स्क्रिन यांत बराच फरक असतो. त्यामुळे मोबाईलवर पहाण्याकरता संकेतस्थळाचे मोबाईल व्हर्जन उघडावे लागते.

युएफओ पाहीली आहे का कुणी, युएफओ?

लेखक त्रास यांनी शनिवार, 14/02/2009 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज पर्यंत एकाही मराठी माणसाने युएफओ पाहीली असल्याचा क्लेम केल्याचे आठवत नाही. हे युएफओवाले मराठी लोकांना टाळतात असे वाटू लागले आहे. एक पुस्तक लिहीले होते (निरंजन घाटे ह्यांनी?- आठवत नाही) की माणुस परग्रहवासीच आहे व त्याच्या पृथ्वीवारीच्या खाणाखूणा इतरत्र पसरल्या आहेत. त्यातील एकही खूण भारतातील (पुण्याजवळची तर नव्ह्तीच) नव्ह्ती. त्यामुळे अशा ठिकाणांना भेटी देउन खात्री करावी तर ते लाखो कवड्या मोजल्याशिवाय करणे शक्यच नाही. का येत नाही युएफओ आपल्याकडे?

एक भावगीत

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 13/02/2009 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रेमगीत लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. मला सोसेना उबारा ...मला सोसेना हिवाळा मी होऊन खारोटी तुझ्या ओंजळीत घेईन विसावा. * * * * मला सोसेना दुरावा .... मला सोसेना दुरावा मी होऊन चांदणे तुझ्या अंगणात मागेन जोगवा. * * * * माझ्या प्रेमाची शपथ ....गळाभरून शपथ मी रंगून विड्यात तुझ्या ओठावर सांगेन ओळख. * * * *
Taxonomy upgrade extras

लालूंचे रेल्वे बजेट !

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 13/02/2009 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे लालूंनी भारतीय रेल्वेला फायदा करुन दिला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मेल एक्स्प्रेसच्या प्रवास भाड्यात २ % कपात केली आहे . लोकलचे भाडे १ रु स्वस्त होणार आहे. ही एक आनंदाची गोष्ट. लालूंचे त्यासाठी अभिनंदन !! सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे लालूंनी मुंबई- जबलपूर गरिबरथ अलाहाबाद पर्यंत एक्स्टेंड करण्याची घोषणा केली त्यावेळी लक्षत आले की मागच्या वर्षीच्या बजेट मध्ये घोषीत केलेली मुंबई- जबलपूर ही गाडी अजून सुरुच झालेली नाही !

या पाखरांस आता---

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 13/02/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
या पाखरांस आता आहे निघून जाणे हे शब्द सूर सरले ओठी न येई गाणे छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा रे माझिया पिलांनो हा जीव गुंतला रे डोळ्यात आज माझ्या बघ प्राण साठला रे फिरता नभांगणात परतून येथ या रे वेड्या जीवास माझ्या रे एक साद द्या रे हे वेड या मनाचे तुंम्हास रे कळावे अन् शब्द सूर ताल पुन्हा जुळून यावे
Taxonomy upgrade extras

निठारी हत्याकांड

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 13/02/2009 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच बातमी वाचली. निठारी हत्याकांडाचे आरोपी कोळी आणि पांढेर ह्या दोघांनाही स्पेशल कोर्टाने देहदंडाची शिक्षा सुनावली. ही केस सुरु झाली 29 Dec. 2006. ह्या केस मधे (भारताच्या) आपल्या दृष्टीने जरा लवकर न्याय दिला गेला.नाहीतर नेहेमी प्रमाणे कमित कमी १० वर्ष सेशन कोर्ट, नंतर १० वर्ष हाय कोर्ट नंतर पुढ्ची २० वर्ष सुप्रिम कोर्ट अशा चक्रव्युहात अडकली असती. अर्थात आपले षंढ सरकार कोर्टाने शिक्षा देउन पण त्या दोघांना टांगायला ( फाशी द्यायला) चाल ढकल करतिल. पुनः पुन्हा तीच नावे लिहित नाही. पण ही फाशी जर लवकर दिल्या गेली जावी एवढीच इच्छा... दोन प्रश्न्... स्पेशल कोर्टाच्या सजेवर अपिल होतं कां??