मोबाईल फोन्सची स्मार्ट व्हर्जन्स उपलब्ध आहेत. शिवाय आजकाल जीपीआरएस ही सहजगत्या उपलब्ध होतयं. अशी स्थिती असताना मोबाईलवर आपले आवडते संकेतस्थळ पहायला मिळाले तर किती बरं होईल. एकतर सतत संगणक उघडून बसायला नको. शिवाय प्रवासात असतानाही आपला छोटासा मोबाईल उघडून आपण ही संकेतस्थळे पाहू शकतो.
पण यात एक अडचण अशी आहे की , आपल्याला हव्या असलेले संकेतस्थळ मोबाईलमध्ये कसे काय दिसेल ? कारण सहाजिकच मोबाईलचा स्क्रिन आणि संगणकाचा स्क्रिन यांत बराच फरक असतो. त्यामुळे मोबाईलवर पहाण्याकरता संकेतस्थळाचे मोबाईल व्हर्जन उघडावे लागते. आता आपल्याला हव्या असणार्या संकेतस्थळाचे मोबाईल व्हर्जन कसे मिळवायचे ?
एक सेवा सुरू झाली आहे. जिथे आपण आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही संकेतस्थळाचा पत्ता दिल्यावर, ती सेवा आपल्याला त्या संकेतस्थळाच्या मोबाईल व्हर्जनचा पत्ता असलेला दुवा देते. तो दुवा तुम्ही तुमच्या मोबाईलवर टाईप करून पाहिलात तर तुम्ही तुम्हाला हवं असलेलं संकेतस्थळ मोबाईलवर पाहू शकता.
या सेवेचा उपयोग करून 'माझी मराठी' चं मोबाईल व्हर्जन तुम्ही इथे पाहू शकता.
वाचने
1991
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
संकतस्थळा
एकदम
चूक लक्षात
मस्तच
गूगल, युनिकोड आणि ऑपेरा