मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक भावगीत

रामदास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एक प्रेमगीत लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. मला सोसेना उबारा ...मला सोसेना हिवाळा मी होऊन खारोटी तुझ्या ओंजळीत घेईन विसावा. * * * * मला सोसेना दुरावा .... मला सोसेना दुरावा मी होऊन चांदणे तुझ्या अंगणात मागेन जोगवा. * * * * माझ्या प्रेमाची शपथ ....गळाभरून शपथ मी रंगून विड्यात तुझ्या ओठावर सांगेन ओळख. * * * *

वाचने 5834 वाचनखूण प्रतिक्रिया 25

मदनबाण 13/02/2009 - 23:55
मी रंगून विड्यात तुझ्या ओठावर सांगेन ओळख. लय भारी !!! मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda.

शशिधर केळकर 14/02/2009 - 00:26
व्हॅलंटाईन स्पेशल तर खरेच, पण अप्रतिम भावपूर्ण कविता उतरली आहे. तीनही कडव्यातल्या मधल्या ३-३ ओळी विशेष सुरेख!

सहज 14/02/2009 - 05:01
व्हेलेंटाईननिमित्त तुम्ही पण :-)

प्राजु 14/02/2009 - 05:08
कल्पना खूप छान आहेत. पण एक 'रामदास टच" जो असतो तो नाही जाणवला. तुमच्या लेखणीतून उत्तमच वाचायची सवय लागली आहे.. काय करू? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

रामदास 14/02/2009 - 05:29
गाणं चालीसकट मला सुचलं.मी ऑडीओ टाकण्याचा प्रयत्न करून पाहीला. जमलं नाही.त्यामुळे जसं सुचलं त्यात कारागीरी न करता तसंच लिहीलं. २-३-३ १-३-३ २-४ ३-३ अशी रचना त्या चालीत होती. त्यातही बदल केला नाही किंवा यमक जुळवण्याचा प्रयत्न केला नाही. ता.क.: हा वॅलंटाईन चा साईड इफेक्ट असावा.असेलही. पावसाळ्यात , टोपलीत ठेवलेल्या कांदा बटाट्याला पण कोंब फुटतात. तसंच काहीसं.

In reply to by रामदास

दशानन 14/02/2009 - 07:26
>>हा वॅलंटाईन चा साईड इफेक्ट असावा.असेलही. पावसाळ्यात , टोपलीत ठेवलेल्या कांदा बटाट्याला पण कोंब फुटतात. तसंच काहीसं. =)) कविता सुंदरच ;) आवडली.
भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! पण आता बाय-बाय =))

विसोबा खेचर 14/02/2009 - 07:04
माझ्या प्रेमाची शपथ ....गळाभरून शपथ मी रंगून विड्यात तुझ्या ओठावर सांगेन ओळख. वा! क्या केहेने रामदासभैय्या! तात्या.

मला सोसना उभारा मला सोसना हिवाळा . . . वैशाली सामंतच्या कोंबडी पळाली च्या चालीत म्हनुन दाखवा प्रकाश घाटपांडे

मी होऊन चांदणे तुझ्या अंगणात मागेन जोगवा. क्या बात है रामदासजी! मार डाला... प्रेमात आत्मसमर्पणाशिवाय दुसरं असतंच काय?

In reply to by विनायक प्रभू

अवलिया 14/02/2009 - 14:12
पेवातले असले की थोडी हवा दमट झाली की कोंब फुटतात. --अवलिया

In reply to by प्रमोद देव

सहज 15/02/2009 - 08:51
हेमंतकुमार यांच्या आवाजाची आठवण आली हो. "मला सोसेना, मला सोसेना" हे आर्त सूर तर अगदी पटण्यासारखे. ;-)

यशोधरा 15/02/2009 - 19:40
होऊन चांदणे तुझ्या अंगणात मागेन जोगवा. हे खूपच आवडले.