Skip to main content

मी गेल्यावर वि़झुनी जातील--

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 19/02/2009 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्या नाव इथे होणार गेल्यानंतर दोन अश्रुही कोण तुला देणार
Taxonomy upgrade extras

आभाळमाया - असं असतं का प्रेम?

लेखक मराठी यौधा यांनी गुरुवार, 19/02/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळमाया - असं असतं का प्रेम? एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते. ""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?'' ""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.'' ""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?'' ""हो!

भारतीय इमोश्नल ब्लॅकमेलिंग व चुकीचे आदर्श

लेखक त्रास यांनी गुरुवार, 19/02/2009 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक बातमी- अमके तमके श्री. प्रसिद्ध व्यक्तिमत्व ह्यांना तमक्या वकिलातीने व्हीसा नाकारला. [बातमीत हे देत नाही की त्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली होती की नाही. पण आमच्या लाडक्या दैवताला तुम्ही व्हिसा देत नाही हा "इमोशनल" मुद्दा लावून धरला जातो व लोकांच्या समोर चुकीचा आदर्श उभा राहतो. व्यक्तिमत्व लाडके असले म्हणजे काय झाले त्यांना कायद्याच्या सवलती नसाव्यात हा मुद्दा त्यात येत नाही.] दुसरी बातमी- श्री. अमुक तमुक ह्यांनी १००० नाटकाचे प्रयोग केल्यानिमित्ताने सत्कार [त्यांचा नाटक हा व्यवसाय आहे. मग त्यात काय विषेश- सत्कार कशाबद्दल? त्यांनी अभिनय हा व्यवसाय पोटापाण्यासाठी निवडला आहे.

(मनोक्रमी मिपाकर)

लेखक कवटी यांनी गुरुवार, 19/02/2009 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर राहुन, जळाऊगिरी करीत आणि फक्त मिपावर येणार्‍या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे. त्यातल्या त्यात, मिपाच्या मोठ्या भावंडांची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या मिपाकर लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते. ह्या मिपाकर असलेल्या, पण लेखात प्रमाण भाषा वापरण्याचा आग्रह धरणार्‍या लोकांची ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची अस्सल मिपाकर माणसाला खरंच गरज आहे कां? इथल्या ज्या कायम निवासी लोकांची ते खिल्ली उडवतात, त्याच लोकांना निमंत्रित लेखक म्हणून दिवाळी अंकात लेख लिहायला बोलवतात.

वृद्ध माता-पित्याची जबाबदारी

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 19/02/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
"वृद्ध माता-पित्याची जबाबदारी टाळणाऱ्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास; मंत्रिमंडळाचा निर्णय" आजच्या लोकसत्तामधील बातमी www.loksatta.com कायद्याने प्रश्न सुटत नाही, पण कायदा असला की प्रश्न आहे हे तरी ध्यानात येते. खरतर असा कायदा करावा लागणे किंवा त्याचा आधार घेणे हे समाज म्हणुन आणि व्यक्ती म्हणुनही आपले अपयश आहे. देव करो आणि कुणावरही या कायद्याचा आधार घेण्याची वेळ न येवो.

अनिवासींनी निवासींना सुचवलेली मार्गदर्शक तत्वे

लेखक त्रास यांनी गुरुवार, 19/02/2009 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच चालू असलेलया दोन धाग्यावरची अनिवासी-निवासींचे यादवी युद्ध, तावातावाची चर्चा, हिरीरीने मांडलेली मते पाहून अर्थातच मला राहवले नाही आणि म्हणालो की, चला आता वेळ आली आहे ती "लिष्ट" करण्याची. आम्ही बापुड्यावाणे पहात राहिलो आणि वाटले थुत ह्या निवासी जगण्याला. आता निश्चय करायचाच आणि सुधारयचेच. पण सुरुवात कशी करावी कळेना हो. कराल तेव्ह्ढी मदत?- सांगाल मला मार्गदर्शक तत्वे? [हे विरंगुळा म्हणून लिहिले आहे. ह्या धाग्याला कृपया प्रतिसाद देउ नका. वाचा आणि सोडून द्या]- तुमचा त्रास!

टोरँट बद्दल माहिती हवी आहे.

लेखक माझी दुनिया यांनी गुरुवार, 19/02/2009 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाजालावरच्या बर्‍याचश्या फाइल्स उतरवून घेताना टोरँट प्रणाली वापरली जाते, ती नेमकी काय आहे ? टोरँट प्रणाली वापरणारी अनेक ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत, त्यातली विश्वासार्ह कोणती ? न्याहाळकामार्फत चे डाऊनलोडिंग आणि टोरँट्मार्फत चे यांत नेमका काय फरक आहे ?

हागणदारी मुक्त खेडे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/02/2009 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती. रायगड जिल्ह्यातल्या खेड्यांमधुन हागणदारी मुक्त खेडे ही योजना राबवायचा निर्णय सरकारने घेतला. त्याच्या अंमलबजावणीसाठी गावा गावातल्या अंगणवाडी शिक्षिकांना वेठीस धरण्यात आले. कल्पना अशी होती की गावातील अंगणवाडी सेविका पहाटे हागणदारीपाशी जावुन उभ्या राहतील आणि येणार्‍या स्त्री पुरुषांचे गुलाबाचे फ़ुल देवुन स्वागत करतील. नंतर त्या गावकर्‍यांचे फोटो काढुन वर्तमानपत्रात प्रकाशित केले जातील.