Skip to main content

निराकारी रंगारी

लेखक तिमा यांनी रविवार, 22/02/2009 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
हे निराकारी कला क्रांतिवीरांनो या वास्तवाला घाबरता का ? गेली चार दशके टाळताय त्याला अन् लपताय दीवाभीतासारखे नुसत्या रंगसंगतीवर किती झुलवणार आम्हाला तुमचे पिवळे हेवेदावे आणि काळे चौकोनी सूर्य किती दिवस बघायचे ? कशासाठी हा वेगळा प्रवास ? तुमचे बाप तिथे मास्तर होते तेंव्हा तुमचे काय चालले होते ? तुमची लफडी, तुमची व्यसने तुमचे स्वप्नभंग, रागलोभ,
Taxonomy upgrade extras

कादंबरी परिचय : "भिन्न"

लेखक मुक्तसुनीत यांनी रविवार, 22/02/2009 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
"माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग-भेद... आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी आणि विशिष्ट रोगांई पीडीत असणार्‍यांच्यातले भेद ... ...पण एका क्षणी हे वगळेपणच अमची शक्ती,उर्जा, चेतना बनतं आमच्या प्रत्येक तुकड्यात जीव ओतून एकसंध बनवतं ..." ही वाक्ये आहेत "भिन्न" या कादंबरीच्या ब्लर्बमधली. लेखिका: कविता महाजन. महाजन बाईंची आधीची गाजलेली कादंबरी "ब्र" मी वाचलेली नव्हती. त्यानंतर प्रकाशित झालेली प्रस्तुत कादंबरीच मी आधी वाचायला घेतली. अलिकडच्या काळातली लक्षांत राहिलेली , मनावर दीर्घकाळ परिणाम करणारी कादंबरी असे तिचे वर्णन उचित होईल.

"विविधतेतून अखंडता"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 22/02/2009 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
"क्वान्टम फिझीक्स शाखेतले शास्त्रज्ञ सांगतात ते काही खोटं नाही.वारली लोकांसारखेच ते विचार करीत असावेत. "जगात असलेलं सर्व काही गतिबोधकतेने अत्यंत घनिष्ठ पातळीवर एकमेकाशी संबंध स्थापित करून असतं." प्रो.देसायांच्या एका नातीचं सर्व आयुष्य कलकत्यात गेलं.कारण भाऊसाहेबांचा एक जांवई कलकत्याचा.अर्थात ह्या कुटूंबावर बंगाली रीतीरिवाजाची बरचशी छाप पडली होती.एकदा ती माझ्या घरी राहायला आली होती.मला म्हणाली, "काका,मला सकाळी सकाळीच उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे." मी तिला म्हणालो, "संध्याकाळी,जुहू चौपाटीवर जाऊन आपण मावळत्या सूर्याचं दर्शन पोटभर घेऊ शकतो.पण उगवत्या सूर्याचं दर्शन तुला कलकत्या सारखं सकाळी

थीलापिया कालवण आणी पापलेट फ्राय

लेखक लवंगी यांनी रविवार, 22/02/2009 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
बाहेर भरपूर हिमवर्षाव चाललाय. थंडीने गारठून गेलेय सारं. अश्या वेळी गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर तिखट थीलापिया कालवण आणी पापलेट फ्रायची मजाच काहि और आहे.. या आजच्या बेताचे काही फोटो. थीलापिया करी - थीलापियाचे ( नसल्यास रावस किंवा सुरमई पण चालेल ) तुकडे हळद, मीठ, लाल मिरची पावडर लावून १०-१५ मिनीटे ठेवावे. २ इंच आलं, १ गड्डा लसुण, १ छोटी जुडी कोथिंबिर, १/४ ताजा खवणलेला नारळ, ३-४ हिरव्या मिरच्या असे वाटण वाटून घ्यावे. एका भांड्यात थीलापियाचे तुकडे, वाटण, थोडासा मालवणी मसला असे सगळे एकत्र करून घ्यावे. बोराएवढी चिंच कोळून घ्यावी. चिंचेचे पाणी थीलापियात टाकावे.

न्याय

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 21/02/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
काय हो सर, ह्याला न्याय म्हणायचा का? माझ्याच एक विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न. मी उत्तर देउ शकलो नाही. बघा तुमच्याकडे असेल तर. अजुनही संपर्कात असलेला माझा विद्यार्थी. लग्न होउन १० वर्ष झालेली. दोन मुले. मोठी मुलगी आठ वर्षाची. लहान मुलगा ४ वर्षाचा. बायको सहकारी बॅकेत काम करते. हा मेंटेनन्स इंजिनियर असल्यामुळे सतत टुरवर. एवढा एक त्रास सोडला तर सुखाचा संसार. ४ महिन्यापुर्वी बायको आजारी पडली. युरीन इनेफक्शन्चे निदान झाले. ४ दिवस हॉस्पिटल मधे राहुन बरी झाली. परत एका महिन्यानंतर तोच त्रास. सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्या. सर्वायकल बायॉप्सी पण झाली. अँटीबायॉटीक्सचे कोर्स पुर्ण झाले.

दुबई कट्टा वृत्तांत.

लेखक सायली पानसे यांनी शनिवार, 21/02/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री संत तात्याबा महाराज प्रसन्न || मिपाचे धर्मसंस्थापक श्री संत तात्याबा महाराज आणि मिपाधर्माच्या सर्व अनुयायांना दुबई मिपाधर्म अनुयायांचा नमस्कार! आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आपल्या धर्मसंस्थापक श्री संत तात्याबा महारा़जांच्या आशिर्वादाने आमचा दुबई मिपा कट्टा सुरळीत पार पडला. आपले ज्येष्ठ अनुयायी बिपिन दा यांना काहि अपरिहार्य कारणास्तव बाहेर देशी जावे लागल्यामुळे ते कट्ट्याला हजर राहु शकले नाहित.

शेवटची रात्र !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 21/02/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
फाशीची शिक्षा झालेल्या क्रांतिकारकाची फाशीच्या आदल्या रात्री काय मनस्थिती असेल.....त्यातुनही तो अंदमानसारख्या ठिकाणी मातृभुमीपासुन हजारो मैल दुर असेल तर.? मृत्युला निर्भयपणे ललकारणार्‍या या वीराला भीती असते ती फक्त आपले बलिदान अनाठायी तर ठरणार नाही ना याची !

आलु टिक्की / समोसा चाट

लेखक सुक्या यांनी शनिवार, 21/02/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
समोसा साठी भाजी: साहित्य: ३ मध्यम आकाराचे बटाटे ३/४ हिरव्या मिरच्या अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे / मोहरी बारीक कापलेली कोथिंबीर फ़ोडणीपुरते तेल कृती : बटाटे मायक्रोवेव्ह मधे किंवा पाण्यात उकडुन छोट्या आकारात डाइस करुन घ्या. कढईत तेल घेउन त्यात जिरे, मोहरी बारीक कापलेल्या मिरच्या टाकुन परतवा. त्यावर धने पावडर घालुन कापलेले बटाटे घालुन फ़ोडणी देउन घ्या.

सुमल्याची आश्रम वारी!!... (२)

लेखक यशोधरा यांनी शनिवार, 21/02/2009 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुमल्याची आश्रम वारी!!...(१) अरे, अरे काय ह्या?? ऑँ?? हयसर सगळे जमलेसत काय कारणान, तुम्ही झगडतसात काय कारणा काढून, अरे शोभता काय ह्या?? अशान काय्येक होवचा नाय हातून, समाजल्यात?? तर आता हो धयकालो बंद करात आणि मुद्याचा काय ता बोलाक लागात!!" "मी काय म्हणतय काकानुं, असा केल्यान तर? म्हणजे बघा, एक तर तुम्ही जावात, तुम्ही म्हणजे कशे, जरा वडीलधारे नाऽऽऽय, मगे तुमका समाजतला कसा वागूचा, काय बघूचा… होय का नाय रे??" "होय, होय…" सगळ्यांनीच होकार भरलो!!

( मी लिहिल्यावर पळुनी जातील -- )

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 21/02/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
( मी लिहिल्यावर पळुनी जातील -- ) प्रेरणा - पुष्कराज यांची कविता मी गेल्यावर वि़झुनी जातील-- ------------------------------------------------------ मी लिहिल्यावर पळुनी जातील शब्ददीप आकाशी मी लिहिताना थांबून राहील शाई तशी पेनाशी मी लिहिल्यावर प्रतिसादही कोणी द्यायचे नाही मी लिहिल्यावर कोणी तळपूनी उत्तर द्यायचे नाही मी मी माझे खुळ्या कल्पना किती काढसी धागे लिहिल्यानंतर पृष्ठावरती दोन क्षणांतच मागे नवलेखांची ही पहा अवस्था काय होतसे आहे गमनानंतर कशास वेड्या नाव आपु