न्याय
काय हो सर, ह्याला न्याय म्हणायचा का?
माझ्याच एक विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न. मी उत्तर देउ शकलो नाही. बघा तुमच्याकडे असेल तर.
अजुनही संपर्कात असलेला माझा विद्यार्थी. लग्न होउन १० वर्ष झालेली. दोन मुले. मोठी मुलगी आठ वर्षाची. लहान मुलगा ४ वर्षाचा.
बायको सहकारी बॅकेत काम करते. हा मेंटेनन्स इंजिनियर असल्यामुळे सतत टुरवर. एवढा एक त्रास सोडला तर सुखाचा संसार.
४ महिन्यापुर्वी बायको आजारी पडली. युरीन इनेफक्शन्चे निदान झाले. ४ दिवस हॉस्पिटल मधे राहुन बरी झाली. परत एका महिन्यानंतर तोच त्रास. सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्या. सर्वायकल बायॉप्सी पण झाली. अँटीबायॉटीक्सचे कोर्स पुर्ण झाले. पण जखम काही बरी होईना. मग एका प्रसिद्ध 'गायनॅक' डॉक्टरांकडे सल्ला घेण्यात आला. दादरच्या फार मोठ्या हॉस्पिटल मधे पुन्हा सुरुवातीपासुन सर्व तपासण्या परत झाल्या. सर्व रीपोर्ट्स तयार झाले. संध्याकाळी ६.३० वाजता डॉक्टरांनी भेटायला बोलवले.
डॉक्टरांनी सर्व प्रथम नवर्याला एकटेच कंसल्टींग रुम मधे बोलवले.
"तुमचे बाहेर काही संबंध आहेत का"? डॉक्टर
"अजिबात नाही" नवरा
"नक्की का? असेल तर सांगा. म्हणजे निदानाला मदत होईल. तुम्ही सारखे टुर वर असता म्हणुन विचारतो" डॉक्टर
" जे नाही ते नाही" नवरा
"एक काम करा एच आय वी टेस्ट करुन घ्या. ती एक तपासणी राहीली आहे." डॉक्टरांनी सल्ला दीला.
"माझी की बायकोची"नवर्याने शांतपणे विचारले.
"अर्थात पेशंटची" डॉक्टर
एच्.आय.वी -पीसीआर टेस्ट करायचे ठरले. सुमारे २२०० रुपयाची फोडणी.
नंतर बायकोला वेगळे ला परत तपासणी साठी बोलवले. १५ मिनिटांनी बायको बाहेर आली. चेहेर्यावरचा रंग उडालेला.
घरी जाताना गाडीत स्मशान शांतता. तरी सुद्धा नवर्याने धीर करुन चौकशी केली.
"तुमचे काही बाहेर संबंध नाहीत ना" बायको
"शक्यच नाही, तुझ्याशिवाय कुणाचा विचार पण शिवला नाही गेल्या १० वर्षात. बाहेर असताना आठवण आली ,एकटेपणा वाटला तर बॅगेतला फोटो बघतो तुझा मुलांबरोबरचा."नवरा
"तुम्हाला माझ्यावर संशय आहे का? बायको
"ही सगळी चर्चा आपण टेस्टचा रीपोर्ट आल्यावर करु. तोपर्यंत काहीही झाले नाही असे समज. मी पण करुन घेणार आहे टेस्ट"नवरा
टेस्ट झाली. रीपोर्ट आला. टेस्ट निगेटीव. दोघेही निरपराध असल्याचा निर्वाळा मिळाला.
नंतर असे लक्षात आले की बायकोला दीलेल्या अँटिबायॉटीक्सला ती रेझिस्टंट होती. त्यामुळे आजार बरा होत नव्हता. सर्व काही सुरळीत झाले.
नवर्याने थोड्या दिवसाने बायकोकडे विचारणा केली.
नवरा बाहेर असताना तुमचे इतर काही संबंध आहेत का असा प्रश्न डॉक्टरनी बायकोला विचारला नव्हता. ह्या सर्व प्रकारात 'पुरुष'
दोषी असे डॉक्टरानी गृहीत धरले होते.
हा न्याय आहे का?
मला माहीत नाही.
याद्या
5731
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा न्याय
एच्.आय.वी
In reply to हा न्याय by अवलिया
हम्म
In reply to एच्.आय.वी by विनायक प्रभू
इथे सहमत. -
In reply to हा न्याय by अवलिया
डॉक्टरांच
आळ
डॉक्टरने
In reply to आळ by विनायक प्रभू
वजावट
In reply to डॉक्टरने by नीधप
पुरूष आणि
घर आणि मुले
जास्त
In reply to घर आणि मुले by विनायक प्रभू
अरे देवा
In reply to जास्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
ठ्ठो !!!!!!!!!!!!!
In reply to जास्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
(विषय दिलेला नाही)
In reply to ठ्ठो !!!!!!!!!!!!! by अवलिया
एक डिस्क्लेमर राहिलंच
In reply to (विषय दिलेला नाही) by टारझन
पुन्हा ठो!!!!!!!!!!
In reply to एक डिस्क्लेमर राहिलंच by ३_१४ विक्षिप्त अदिती
Brains x Beauty x
In reply to पुन्हा ठो!!!!!!!!!! by अवलिया
माझ्या मते
In reply to पुन्हा ठो!!!!!!!!!! by अवलिया
बरोबर,
In reply to माझ्या मते by ३_१४ विक्षिप्त अदिती
मागे एक
In reply to बरोबर, by शैलेन्द्र
सांख्यिकी
In reply to पुन्हा ठो!!!!!!!!!! by अवलिया
अर्धवट
In reply to सांख्यिकी by विनायक प्रभू
पुर्ण
In reply to अर्धवट by अवलिया
तरीही एक
In reply to पुर्ण by विनायक प्रभू
बाहेरख्याली
In reply to तरीही एक by अवलिया
(विषय दिलेला नाही)
In reply to ठ्ठो !!!!!!!!!!!!! by अवलिया
जास्त
In reply to जास्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म्म
In reply to जास्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
कदाचित् हे
कदाचित् हे
शुद्ध मराठीत
नवर्याचे विधान