Skip to main content

मुलींची नावे इ / आ कारान्त, मुलांची अ कारान्त असे का?

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 25/02/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक माझ्याआधी हे बरयाच जणांनी निरिक्षण केलेच असेल की मुलींची नावे बहुतेक करुन इ कारान्त किंवा आ कारान्त असतात. उदा प्राजक्ता, नयना, साधना, अरुणा, सुषमा, सोनिया, अंबिका,सरोजिनी, रेवती, अदिती,वगैरे. अगदी इंग्रजी नावे पहिली तरी लिसा, मार्था, ब्रेन्डा, अशीच बहुतेक आढळतील. ह्यात पूनम, सोनम, सुझान, एलिझाबेथ, केट असे काहीच अ कारान्त अपवाद दिसतील. तर असे का? तसेच मुलांची नावे संजय, महेश,चित्तरंजन, सुनीत, मिलिंद,विनायक, बिपिन, प्रमोद, पराग, यशवंत, शिरिष, आशिष, सुनील , सचिन, कपिल अशी बहुतेक अ कारान्त आढळतील हे ही कोण समजून सांगू शकेल काय? आडनावांच्या बाबतीत कोणाचे काही निरिक्षण आहे काय?

रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 25/02/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
'रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची' ह्या सुवर्णमयी ह्यांच्या सुंदर गझलेने आमच्या मनात जुन्या 'भेटीगाठींच्या' वेदनादायक आठवणींचे काहूर पुन्हा जागवले ते असे, रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी का हव्याशा वाटणार्‍या पोरटीला टाळले मी फक्त असते तीच सोबत हेच होते मानले मी .................................................... फोन नंबर दे म्हणालो मी तिलाही पाहता.. मग- भेटण्याचे , रातच्याला.. मनसुबे रे बांधले मी रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी अन् कुल्यांना पाय लावुन धावण्याचे..

भारुड-२

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 25/02/2009 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर आलेत मिपाकर आलेत गाड्ग्यात बघुकी लोटक्यात बघु काय सांगु आता मिपाकर आलेत मिपाकरांसाठी लिहीन म्हटले लेख 'जन्माचा क्रिप्टिक' ची मेख मी का लेख लिहिण्याजोगा नव्हतो व्हय मिपाकर आलेत मिपाकर आलेत मिपाकरांसाठी टाकीन म्हटले 'पाककृती" साध्या वाक्यात तरणे बघती भलतीच आकृती मी काय पाक़कॄती टाकण्याजोगा नव्हतो व्हय मिपाकर आलेत मिपाकर आलेत मिपाकरांसाठी करीन म्हटले चारोळ्या भीती वाटते घालतील मलाच गोळ्या मी काय चारोळ्या करण्याजोगा नव्हतो व्हय मिपाकर आलेत मिपाकर आलेत मिपाकरांसाठी कुटीन म्हटले काथ्या संपादनाची धम़की देतो तात्या मी काय काथ्या कुटण्याजोगा नव्हतो व्हय. मिपाकर आलेत मिपाकर आलेत गाडग्यात बघु की
Taxonomy upgrade extras

'वीज बचत' आणि 'सुरक्षा'

लेखक लक्ष्मणसुत यांनी बुधवार, 25/02/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
'वीज बचत' आणि 'सुरक्षा'- आज अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. भारनियमनावरचे विडंबन वाचले आणि लिहावेसे वाटले. आपल्या घरात, कार्यालयात आणि इतर ठिकाणी विजेचा वापर करताना योग्य प्रकारे काळजी घेतली तर आपणांस वीज कंपनीवर ताशेरे ओढायची वेळ येणार नाही. साधारणपणे शंभर चौरस फुटांच्या खोलीत १४ ते १८ वॅट क्षमतेचा दिवा (सी.एफ.एल.) पुरतो. तर संडास/ बाथरूम मध्ये ५ वॅटचा सी.एफ.एल भरपूर प्रकाश देतो. 'शीतकपाटांची' (फ्रीज) तापमानकळ नेहमी लघुत्तमवर ठेवली तरी चालते. तसेच सर्वजण हॉलमध्ये आणि बेडरूम वकिचनचे दिवे पंखे चालू अशी परिस्थिती असते. या सर्व बाबींचा विचार करायलाच पाहिजे.

नवीन माहिती ...संकेतस्थळे...

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 25/02/2009 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मि.पा.कर मंडळी, दररोज आंतरजाळावर वावरतांना आताशा त्याच त्याच संकेतस्थळांना भेटी देण्याचे माझे प्रमाण वाढलेले आहे. (अभिमानाने सांगतो की "त्याच त्याच" संकेतस्थळांत मि.पा. व माझ्या इतर व्यावसाईक संकेतस्थळांचा (अभ्यासासाठी लागणार्‍या) समावेश नाही). तरी पण साधारण सतत "त्याच त्याच" संकेतस्थळांना भेटी देवून माहीती/ ज्ञानात साधारण एकसूरीपणा येतो आहे असे जाणवते आहे. काहीतरी नवीन, बुद्धीला चालना देणारे पाहीजे असे वाटू लागले आहे.

(अंमळ)

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 25/02/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अदितीताईंची सुरेख कविता अंमळ तुझ्या बुटांच्या वासाने ही होते मळमळ इथे अता मज उभे राहणे अशक्य केवळ पुन्हा पाहिले, कोष्टकात , हुकली तारीख घरी सांगणे, लक्ष लागणे, कठीण अंमळ... विग लावला वरून जरी हा खोटाखोटा कथा समजली तुझे कुणी हे केले जावळ अवचित आले तात तिचे ते दारावरती दार उघडता माझी झाली किती धावपळ क्षणाक्षणाला पडते आहे काव्य इथे बघ 'केश्या" मेल्या तुझी अता मग आहे चंगळ --केशवसुमार ( २५ फेब्रू. २००९, माघ अमावास्या, शके १९३०)

वळण !!

लेखक अनिल हटेला यांनी बुधवार, 25/02/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ वाजत असलेल्या डोअरबेल ने श्री ला जाग आली.डोळे चोळत आणी कोण तडमडलये हा विचार करत दरवाजा उघडला.समोर अरुण उभा. "काय बे , ११.०० वाजलेत.अजुन अंथरुणातच आहेस होय ?" "हम्म !" "आरे काय हे? आज १४ फेब्रुवारी ! सारी दुनिया आजचा दिवस एंजॉय करतीये आणी तु ?" "छोड ना यार ! चहा घेणारेस का ?

सुधारस

लेखक त्रास यांनी बुधवार, 25/02/2009 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर धडाधड पाककृत्या लिहित आहेत हे पाहिल्यावर हा माझा छोटासा प्रयत्न- ग्वोड मानून घ्यावा- कृती- हवा तेव्हढा साखरेचा पाक करा. त्यात चवीनुसार लिम्बुरस टाका. झाला सुधारस तयार. गरम पोळीबरोबर खा.

चारोळी

लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 25/02/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक फोटो आहे,एका सदाफुलीच्या पाकळीवर पाण्याचा(दवबि॑दु) थे॑ब आहे.त्यासाठी मला आपल्याकडुन चारोळ्या हव्या आहेत. बि॑बातुनी प्रतिबि॑ब दिसतसे | दवबि॑दुतुनी मोती | सदाफुलीच्या स्मितहास्यातुनी | अशी उमलली प्रिती | जयेश माधव
Taxonomy upgrade extras