Skip to main content

(प्रातःध्वनि)

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 09/03/2009 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठल्यावर अंथरूणातून आरश्यासमोर तोंड धुताना ब्रश मला म्हणाला "घास रे मेल्या घास, लवकर घास" आळस देताना अंग मोकळं करताना चुकून पोट म्हणालं ढम ढम ढम... ट्रेनच्या बाकड्यावर शेजारच्या भय्याचा घामट दर्प घेताना चष्मा म्हणाला "तरी मी तुला सांगत होतो भलतीकडे बघू नको"
Taxonomy upgrade extras

<सत्यध्वनी>

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 09/03/2009 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा तेहेरानच्या आकाशावरून उडताना शेजारच्या काकू म्हणाल्या, "मोबाईल वरच्या ब्यागेत राहिला, काढतेस का? मुलाचा एसेमेस आला का पहायचा आहे." बदलापूर स्टेशनवर वांगणीच्या गाडीची वाट पहाताना चिम्या मुंबैच्या गाडीकडे धावला. "ही गाडी वांगणीला जाईलच ना?" त्यात केवढं मोठं तत्वज्ञान होतं. जीएमेआरटीत पोस्टर्स समजावून देताना अरित्रला एक विद्यार्थी म्हणतो, "जरा बाजूला होता का?" आणि त्याने मोबाईलवर पोस्टरचा व्हीडीओ घेतला. संदर्भासहित थोडंसं स्पष्टीकरण: या सर्व खरोखरच सत्यकथा आहे
Taxonomy upgrade extras

(नारदमुनी)

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 09/03/2009 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गातल्या नारदमुनीहून श्रेष्ठ अश्या कळा लावताना हसून फेक आयडी म्हणाला ओरपा रे ओरपा तर्री ओरपा गुत्यातला पेला मिरवत मालावरची 'वळणे' पाहताना चटकन विडंबक म्हणाला प्रीतं प्रीतम् प्रीतम् क्रियेच्या योगाक्लासमध्ये इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श होताना गजगामिनी म्हणाली '' अय्या, मोबाईल नंबर देतायना !'' -- लिखाळ. प्रेरणा सामुद्रधुनी
Taxonomy upgrade extras

महाजालावर मराठीचा जय हो

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 09/03/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
{पुर्वप्रकाशीत्-सदरचा लेख ६ मार्च २००९ रोजीच्या सकाळ वृत्तपत्राच्या कोल्हापुर आव्रुतीत मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख वृत्तपत्रात येणार हे माहीत असल्याने सर्व संकेतस्थळे दीलेली आहेत ,यातील बरीचशी मिपाकराना माहीत असण्याची शक्यता आहे. हा लेख आपण येथेही वाचु शकता. http://farm4.static.flickr.com/3314/3340207823_baf982819d_b.jpg}
महाजालावर मराठीचा जय हो
इंटरनेटला जोडलेला संगणक..

ज्याचं त्याचं आभाळ

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 09/03/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणत आभाळ मोकळ असत? पिंज-यातल्या पंख कापलेल्या पाखराला विचार! आभाळ असत बांधलेल, पिंज-याच्या गजांनी. कधी हिरव्या फांद्यांवर विसावलेल्या, कधी किलबिलत स्वच्छंद उडणा-या पाखरांच्या थव्यांनी सजलेल आभाळ असत केवळ एक स्वप्न, सत्याचा खुळा आभास फक्त! कोण म्हणत आभाळ भव्य असत? जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या कैद्याला विचार! आभाळ म्हणजे कोठडीच्या झरोक्यातून दिसणारा धूसर, कळाहीन टीचभर तुकडा काजळलेल्या कंदिलाच्या काचेसारखा. शरदातला मोहक अमृताचा चन्द्र, रौद्र तांडवान दिपवणारी वीज, किरणांच्या रांगोळीन नटलेल आभाळ असते नुसतीच वेडी कल्पना, कुणा उन्मनी कवीच्या मनातली! कोण म्हणत आभाळ भव्य असत? डोळ्यांना झापड बांधून
Taxonomy upgrade extras

सामुद्रधुनी

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 09/03/2009 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून शांततेची कबुतरे उडताना पाहून गालिब म्हणाला वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव गुंत्यातला तोरा मिरवत घाटातली वळणे घेताना चुकून मॅडोना म्हणाली जितं जितम् जितम् प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेताना सजणी म्हणाली "अय्या, याला काय अर्थ आहे?"

लक्षात राहीलेल्या वाक्यांची उत्तरे (स्पर्धा)

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 09/03/2009 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमात लक्षात राहीलेल्या वाक्यांचा धागा बघितला आणि ही कल्पना सुचली. सुप्रसिद्ध संवाद किंवा वाक्यांची विडंबन उत्तरे लिहिण्याची स्पर्धा जाहीर करत आहे. स्पर्धेचे पहिले बक्षिस रुपये.१५१ दुसरे रुपये १०१ तिसरे ५१. मराठी वा हीदी सिनेमातील संवाद, लक्षात राहीलेले वाक्य घेउन त्याच्यापुढील उत्तराचे विडंबन करावे. हिंदीचे उत्तर मराठी, मालवणी,नागपुरी,पुणेरी मराठी मधे पण चालेल. आजपासुन ४ दिवसाने निकाल जाहीर होईल. साधारण कल्पना येण्यासाठी उदाहरण देत आहे. सिनेमा: अमर प्रेम राजेश खन्ना: पुष्पा आय हेट टीअर्स. शर्मिला: ठीक आहे.

(तगमग)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 09/03/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी जिवाची एवढी 'तगमग' कधीच झाली नव्हती! सोसवेचना!! :T :O :S हा खून झाला नसता तर दिवसभर कामात लक्ष लागलं नसतं!!

राम आणी वाली

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/03/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. त्यात सितेकडे केलेली अग्नीपरिक्षेची मागणी कशी अन्यायकारक वगैरे होती हे ही वाचायला मिळाले. रामचंद्र हे आधी राजा असल्याने त्यांनी स्वत:चा आदर्श जनतेपुढे घालुन देण्यासाठी त्यांनी सितेकडे अशी अपेक्षा व्यक्त केली असावी काय ? वाली वधाविषयी मात्र खुप बोलायची इच्छा आहे. खरेतर मागे मिपावर हा प्रश्न उपस्थीत झाल्याचे पुसटसे आठवते पण तेंव्हा भवतेक कंटाळ्यामुळे हे येव्हडे सगळे टंकले नाही. आज वेळ मिळाला आहे तर हा राम आणी वाली संवाद तुमच्या पुढे सादर करत आहेत.