<<आंतरध्वनी>>
मी पहील्यांदाच विडंबन हा प्रकार करत आहे.
प्रेरणा कोण? हे सांगणे न लगे... ;)
घरी रीकामा वेळ काढताना
भेळ करायची ठरवली असताना
चुरमुर्याचा डबा खाली पडला
आणि कांदा रडला
ढसा ढसा ढसा ढसा
पडलेले चुरमुरे गोळा करताना
त्यातले खडे काढताना
फरसाणच्या तोंडाला सुटले पाणी
कैरी कापलेली पाहताना
=P~ =P~ =P~ =P~
नवर्याला भेळ खायला देताना
तोंड केले वाकडे
आणि म्हणाला तो मला,
"त्यापेक्षा प्रिये विकत का आणली नाहीस?"
Taxonomy upgrade extras
युफओ असावेत की नसावेत ?
मागे दिवाळीच्या आसपास मी, माझे मानलेले मामा, दोन मानलेले भाचे आमच्या मानलेल्या मामांच्याच फार्म हाऊस मध्ये पार्टीसाठी गेलो होतो तेव्हा अचानक लहान वाला भाचा म्हणाला मामा ते बघा काय आयटम आहे कळत नाही आहे.. जेव्हा मी पाहीले तेव्हा मी पण दंग झालो होतो त्रिकोणी वस्तू असावी, तीन्ही टोकांना निळ्या रंगाच्या लाईट्स होत्या व त्या चमकत नव्हत्या चालू होत्या, व त्याचा आकार नेहमीच्या फायटर प्लेन पेक्षा तरी मोठा होता ... आम्ही दर शनिवारी फार्म हाऊस वरच असतो व एयरपोर्ट जवळच आहे म्हणजे ..
सुसंवाद
आजपर्यंत खुपदा असे पहावयास मिळ्ते कि एखाद्या कल्पनेवर एखादी स्त्री काय लिहु शकेल ? असा विचार करुन लेखकांनी लिहलेले आहे, म्ह्नणुन सहज च असा विचार आला कि पुरुषांच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर मी त्यांच्या नजरेतुन काही वेगळे लिहु शकेन का?
जिव्हाळ्याचा विषय म्हणले तर सहजच आठ्वते ती मदीरा किंवा चेतन्यनलिका...
खुप सहज पणे या सवयीवर येता जाता ताशेरे मारले जातात... तर या विषयावर पुरुषांना काय वाटत असावे... जर घरात सुसंवाद असेल तर कदचीत या प्रकारचे नेराश्य कमी होउ शकेल...या अर्थाची ही १ मुक्त कविता...
अशाप्रकारचे लिह्ण्याचा पहिलाच प्रयत्न चु.भु.दे.घे.
तुम्ही कोण आणि कसे आहात पडताळा!
काल नागपूर सकाळचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. त्या निमित्त विवेक मेहेत्रे यांनी राशीवर्ष हा डिजिटल शो सादर केला. त्यात त्यानी चिनी पद्धतीनुसार राशीवर्ष कसे गणले जाते, त्याची विस्तृत माहिती दिली. मिपावरील सदस्यांना ती द्यावी म्हणून हा लेखनप्रपंच!
१२ वर्षांच्या कालांतराने मूषक, वृषभ, व्याघ्र, मांजर, गरुड, सर्प, अश्व, मेन्ढा, मर्कट, कुक्कुट, श्वान, वराह या प्राण्यांच्या नावाने राशीवर्ष गणले जाते. त्या राशीवर्षात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव त्या प्राण्यासारखा असतो, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले.
होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..
सर्व मिपाकरांना होळी,रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा.. :)
मोत्झार्टचे शांतिस्तवन (रेक्विएम)
परवाच बॉल्टोमोर सिंफनी ऑर्केस्ट्रा आणि बॉल्टिमोर कोरल आर्ट्स सोसायटी यांनी एकत्र सादर केलेला कार्यक्रम ऐकायचा योग आला. त्यांनी मोत्झार्टचे रेक्विएम (मृतात्म्यासाठी शांतिस्तवन) सादर केले.
या संगीताबद्दलची दंतकथा काही लोकांनी हॉलिवुड-निर्मित "आमादेउस" चित्रपटात बघितली असेलच - तीत कल्पनारम्यता फार आणि तथ्य फार कमी आहे. त्या चित्रपटात मोत्झार्टचा द्वेषयुक्त भक्त त्या काळातला संगीतकार सालिएरी होता, आणि त्याने मोत्झार्टच्या बापाच्या भुताचे सोंग घेऊन भावनिक दडपणाखाली हे संगीत मोत्झार्टकडून लिहून घेतले, अशी काही कथा आहे.
अक्ष्रर ओळख
अ ग ड
प तं ग
स र क स
ब्रि गे डि य र
मे ज र ज न र ल
डोळ्याच्या दवाखान्यातल्या फ्रेमवरची सरसरती अक्षरे...
म्हटलं तर सुटी-सुटी, म्हटलं तर एकमेकांना जोडलेली
ध्वनी आणि शब्दांमधल्या विरामात काय असतं?
आणि कुठून सुरूवात होते अर्थाच्या ओहोळाची?
क ट
म र क ट
अ च क ट वि च क ट
पु.ल. एक साठवण
मित्रहो,
असा एकही मराठी माणुस नसेल, ज्याच्या मनात पु. ल. म्हणताच त्यांची एकाधी ओळ , एखादे पुस्तक किंवा त्यांचे मिस्किल हसू उमटणार नाही.
अश्या पु.ल. वेड्या सर्वांसाठी हे संकेतस्थळ देत आहे.
पु.लं. चे मजेदार किस्से, पु.लं. ची छायाचित्रे , त्यांचे विचार ह्या एका ठिकाणी मिळ्तील.
संकेतस्थळाचे सर्व श्रेय त्याच्या मालकाला आहे. मी फक्त एक हास्यदुताचे काम करित आहे.
भरपुर हसा आणि भरपुर जगा.
संकेतस्थळः
"http://cooldeepak.blogspot.com"
क्षमस्व..
मिपावर भरभरून लिहिणार्या मिपाकरहो,
सध्या आम्ही पोटापाण्याच्या उद्योगामागे व दोन टायमाची भाकरी कमावण्यामागे प्रचंड व्यग्र आहोत..
अनेक मंडळी मिपावर भरभरून लिहीत आहेत, नवे नवे लेखन वरचेवर येत आहे हे आम्ही पाहतो आहोत. ते लेखन वाचणे किंवा त्याला प्रतिक्रिया देणे तर दूरच राहिले परंतु एखादा लेख उघडून पाहायला सध्या आम्हाला वेळ नाही..
मिपाच्या संग्रहात मोलाची भर घालणार्यांचे लेखन उघडूनही न पाहणे हे मालक या नात्याने आम्हाला शोभत नाही याची जाणीव आहे परंतु तूर्तास अजून तरी टाईम भेटेल असं वाटत नाही.
मिसळपाव