मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अक्ष्रर ओळख

कालिन्दि मुधोळ्कर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अ ग ड प तं ग स र क स ब्रि गे डि य र मे ज र ज न र ल डोळ्याच्या दवाखान्यातल्या फ्रेमवरची सरसरती अक्षरे... म्हटलं तर सुटी-सुटी, म्हटलं तर एकमेकांना जोडलेली ध्वनी आणि शब्दांमधल्या विरामात काय असतं? आणि कुठून सुरूवात होते अर्थाच्या ओहोळाची? क ट म र क ट अ च क ट वि च क ट

वाचने 1244 वाचनखूण प्रतिक्रिया 2

मुक्तसुनीत 10/03/2009 - 03:48
अरुण कोलटकर यांच्या "तक्ता" कवितेची आठवण झाली. त्यातली अक्षरे एकमेकांशी देवाणघेवाण करतात ; प्रसंगी हल्लाही - अशा प्रकारची कल्पना. अर्थात , तुमच्या कवितेत "बीटविन द लाईन्स" प्रमाणे "बिटविन द सिलॅबल्स" हा प्रकार दिसतो आहे...

कालिन्दि मुधोळ्कर 10/03/2009 - 08:13
कोलटकरांची "तक्ता" भन्नाट आहे. आपल्यालाकडे ती आहे का? मला काही ओळी आठवतायत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.