Skip to main content

"लव टू मरेज" प्रवासवर्णन

लेखक सौरव जोशी यांनी गुरुवार, 12/03/2009 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये मागे एक सदर आल होत... विषय होता "लव टू मरेज प्रवासवर्णन" मी थोड वेगळ पण स्वानुभवाने लिहीण्याचा प्रयत्न केला, आज "मिसळ पाव" चा मेम्बर झालोय तर म्हटल सुरुवात त्या लेखानेच करु कारण तो लेख ह्रदयाच्या अगदी जवळ आहे! पहा तुम्हाला आवडतो का... लि़खाण सुधारण्यासाठी आलेल्या सूचना व टिका, दोन्हीचे स्वागत! प्रेम काय असते हे कळायच्या अगोदरच प्रेम करून मोकळा झालेला मी!! (Thanks to Bolywood Movie संस्कार)... जेव्हा विचारांमध्ये प्रगल्भता आली, सारासार विवेक बुद्धी जागृत झाली तेव्हा."मी कोणावर खरच प्रेम करू शकतो का?" हा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला.

वीकांत आणि अवीकांत: तर्क क्रीडा आणि फरक

लेखक प्रमेय यांनी गुरुवार, 12/03/2009 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेला बरेच काळ मी मिसळपावचा सदस्य आहे, त्याआधीपासून वाचक आहे! माझ्या मनात कित्येक दिवसांपासून एक किडा वळवळत आहे. :/ किडा असा आहे की: एकूण लेख आणि कविता यांचा विचार करता जेव्हा जेव्हा वीकांत येतो तेव्हा तेव्हा मिपावर लेखांचा ढीग पडतो! (स्पर्धा पहावी तर इथे! १००वा लेख काय:O , ५० ओळींचे कवित्व म्हणावे का महाकाव्य! ) या लेखांना प्रतिक्रिया म्हणून महाढीग उत्तरे येतात, वाद घडतात, भावी लेखांची बीजे रोवली जातात. एकंदरीत, विपुल लेखन जाहले आणि उदंड पीक आले अशी परिस्थिती निर्माण होते. यात जर जोडून सुट्टी आली तर मग विचारायला नको अशी परिस्थिती होते.

फ्रॉस्ट्/निक्सन

लेखक शब्देय यांनी गुरुवार, 12/03/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॉस्ट्/निक्सन हा यंदाच्या ऑस्करसाठी नामांकन मिळवलेल्या चित्रपटांपैकी एक. यावेळी अगदी ठरवून सगळे ऑस्कर नामांकीत चित्रपट एक एक करुन पाहिले. ( अर्थात चित्रपट एक एक करुनच पाहतात...एकदम सगळे कुणी नाही पाहतं कारण ठसका लागतो.. जमल्यास ह.घ्या. न जमल्यास असो.) फ्रॉस्ट्/निक्सन बद्द्ल मी बरेच गैरसमज करुन घेतले होते. प्रोमो पाहून ही कोण्या एका फ्रॉस्ट् ने निक्सनच्या घेतलेल्या मुलाखतीची एक डॉक्युमेंटरी असावी असा आपला मी एक पूर्वग्रह करुन घेतला होता. निक्सनच्या वॉटरगेट प्रकरणाबाबतचे माझे (अ)ज्ञानही राजकारणी लोकांनी केलेला एक झोलझाल इतपतच मर्यादित होते.

समज-गैरसमज

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 12/03/2009 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' असं म्हटलं जातं. (म्हणजे काय, कुणास ठाऊक!) लहानपण हा आयुष्यातला सगळ्यात मोलाचा, महत्त्वाचा टप्पा असतो, एवढंच त्यातून घेण्यासारखं. अर्थात, हे कळतं लहानपण सरल्यावर आणि जास्त अक्कल आल्यावरच. लहानपणात मात्र आपणच हुशार, असं वाटत असतं. त्या वयात मनात काही संकल्पना, व्याख्या, तत्त्वं घट्ट बसलेली असतात. मोठ्ठं झाल्यानंतरही त्या प्रतिमांचं, संकल्पनांचं भूत मानगुटीवरून उतरायला बराच वेळ द्यावा लागतो. माझ्याही लहानपणी अशा अनेक कल्पना, गृहीतकं मनात घट्ट बसली होती.

वृत्तपत्रातील अग्रलेखाबाबत काही निरिक्षणे.

लेखक विकि यांनी बुधवार, 11/03/2009 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्तपत्रात दररोज प्रसिध्द होणार्‍या अग्रलेखाबाबत काही निरीक्षणे मिपावर लिहीत आहे. याला आपण छोटासा सर्वेक्षण अहवालही म्हणू शकता. वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे त्या त्या वृत्तपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा होणार्‍या घडामोडींवर(निवडणूक,निवडणूकीचे निकाल,साहीत्य संमेलने,इ) केलेले परखड भाष्य. अनेक नवे जुने संदर्भ अग्रलेखात सामाविष्ठ असतात.

रेसिपी हवी आहे!!

लेखक किट्टु यांनी बुधवार, 11/03/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
मला 'वांगी काप' कसे करतात त्याची रेसिपी हवी आहे. प्लीज कोणी मदत करेल का? 8>

लज्जत सुखाची

लेखक जयवी यांनी बुधवार, 11/03/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
लेवून तवंग सुखाचा आयुष्य बनतं गुळचट न अडचणींचे डोंगर आडवे न आशांचे किल्ले रासवट ऐश्वर्याच्या सरळसोट, उंचच उंच भिंती न कुठे अश्रूंचा कोनाडा, न कुठे दु:खाची पणती प्रकाशाची दारं उघडी सताड रात्रीचा अंधारही कुंपणाच्या पल्याड असतं आयुष्य असं बेचव आणि अळणी जरी पाऊस सुखाचा, तोंडात मिठाची गुळणी सुखाला हवी खरी, फोडणी खमंग दु:खाची हिंग थोडा चिंतेचा अन्‌ मोहरी हवी कष्टांची तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी सुखाची अशा मग लज्जतच न्यारी. जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

मनाच्या कुपितले - बराक ओबामा

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 11/03/2009 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा अकरावा लेख या सदरातील सर्व लेख तुम्ही येथे पाहु शकता.
बराक ओबामा - पासवर्ड फुटलाय.
बराक ओबामा, गेले वर्षभर अख्या जगभर ज्याची आणि फक्त ज्याचीच चर्चा चालू होती, ते हे व्यक्तिमत्व या काळात प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल किती लिहू आणि किती नको असे झाले होते. पण, या व्यक्तीची संपूर्ण माहिती कुठेच मिळत नव्हती. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले गेले. पण, थोडक्यात योग्य माहिती मिळेल असं कोणतच साधन नव्हतं.

चालचलाऊ गीता

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 11/03/2009 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
:P आज अचानक श्री. ज. के. उपाध्ये यांची "चालचलाऊ गीता" ही खूप लहानपणी वाचलेली कविता सापडली. मिपाच्या सदस्यांना होळीच्या मेजवानीनिमित्त सादर! होळीच्या रंगीबेरंगी, रंगतदार, रंगीत शुभेच्छा! पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग लेकांनो! होऊनिया रोग | मराना का! लढाई का असते सोपी?
Taxonomy upgrade extras