क्षण.... !
क्षण !
कणकण जळे अन, क्षणक्षण झुरे.. झाला जीव सखे वेडा.. तुझ्या पायी ग..
भरुभरु डोळे बघ, वणवण फ़िरे.. आता इथे-तिथे-कुठे.. ठाई ठाई ग....
तुझ्याविना जग सारे, उदास भकास, गेला हरवुन सूर.. अन हरपले गाणे..
जगताना आणि सांग,किती वेळा करायचे,रोजरोज तेचतेच,खोटे ग बहाणे
एका तुझ्या भेटीपायी,वेड्या वेड्या आशेपायी,उरे श्वास उरे जीव,काही ग..
कण कण जळे अन....... [१]
तुझी मीठी गंध-धुंद,उश्ण श्वास धपापला,क्रिश्णमेघी केसांची ग छाया...
हरवलो हरपलो,आणि विसरुन गेलो,सखे दोन जीव,एक काया..
माझ्या देही तुझा गंध,तुझा माझा एक श्वास,दोन कुडी एक प्राण,ठाई ग..
कण कण जळे अन........
मिसळपाव
***सगळी चित्रं कुठून वा कुठून कॉपी केलेली आहेत...सध्या फक्त बघुन काढायचा प्रयत्न..***