माणुस का प्राणी
Humans are nonsense. The problem with the humans is that they have a functional brain which thinks beyond eating, sleeping and mating unlike animals. And any thing that is functional will have its own dysfunction.
घरातील माणसाकडुन अत्याचारीत मुलीच्या त्रासाला बघुन खंतावलेल्या आणि उदास झालेल्या मला साहेबांनी धीर दीला होता. साल १९७८. माणुस हा मुळात एक प्राणीच. पण प्राण्यात कुठे बलात्कार होतात. तीथे तर उलट मादी ला आपला साथीदार निवडण्याचा हक्क असतो.
अपंग शाळेतील मुलींवर शिक्षकांच्या बलात्काराला काय म्हणावे?
आईच्या उपस्थितीत जन्मदात्याने वाढलेल्या मुलीवर गेले आठ वर्ष केलेला बलात्कार काय सांगतो? धंद्यात झालेल्या नुकसानी ला तांत्रिकाच्या सांगण्यावरुन केलेल्या ह्या अत्याचाराला काय शिक्षा असावी?
'अश्वत्थामा' ह्या माझ्या लेखामधे अशाच प्रकारच्या अत्याचारावर 'अपवादात्मक गोष्ट' अशी प्रतिक्रिया आलेली होती. त्यावर मी जास्त वाद घातला नव्हता. कारण अशा गोष्टी कीती प्रमाणात होतात ह्याचा विदा माझ्या कडे नव्हता.
ह्या क्षेत्रातील मान्यवराकडे चर्चा केल्यावर असे लक्षात आले की ५०% हुन अधीक मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराना सामोरे जावे लागतेच. अत्याचार म्हणजे नुसता बलात्कार नव्हे. ज्याला आपण अपरीचीत व्यक्ती कडुन 'फाँड्लींग' (' हाताळणी' म्हणुया हवे तर) हा अविभाज्य भाग झाला आहे मुलांकरता. अगदी शाळेच्या बसचे उदाहरण घेउ. बसचा क्लीनर अचानक एखाद्या मुलीला कमरेला धरुन बसमधे चढवतो. उतरताना एखाद्या मुलीला गालाला हात लाउन ' बाय बाय' करतो. ह्या झाल्या सुरुवातीच्या पायर्या. त्या निष्पाप जीवाला काहीच माहीत नसते. नंतर हे प्रकरण हळु हळु वेगवेगळ्या स्तरावर वाढत जाते. अंगाखांद्याने सुदृढ असलेल्या मुलींना तर हा त्रास जास्तच सहन करावा लागतो. आज काल शाळांमधुन 'समुपदेशक' असतात म्हणे. पण अशा विषयांची समर्पक माहीती पालकांना आणि मुलाना देण्याकरता लागणारी ताकद असलेले फारच विरळा. बरे हे फक्त मुलींनाच भोगावे लागते असे नाही.
मुलावर विकृत शिक्षिकेचा जास्त रेंगाळलेला हात पकडताच येत नाही.
माकड असो वा एप(प्रायमेट) ह्यात समागम हा फक्त 'बेसिक इंस्टींक्ट फॉर सरवायवल' ह्या प्रकारात मोडतो. कळप जीवंत राहण्याकरता.तीथे नाती वय ह्याचा संबंध नसतो. पण तीथे सुद्धा 'इन्ब्रीडींग' अगदी नाईलाज असेल तरच होते.
आणि आजही माणसात काही जाती जमाती मधे 'इन्ब्रीडींग' ला मान्यता आहे. त्यातले धोके माहीत असुनसुद्धा. पण इच्छेविरुद्ध आपणच जन्माला घातलेल्या मुलीबरोबर प्रजनन हे विचार शक्तीच्या बाहेरचे आहे.
गुप्त रोगा पासुन सुटका करण्याकरता 'कुमारी' वर अत्याचार, गुप्त धनासाठी 'कुमारी' वर बलात्कार आणि नंतर तीचा बळी हे फक्त भारतातच होते हा पण एक गैरसमज.
मग अशा प्रकारच्या अपराधात पकडलेल्याना फाशी देणे हा हे प्रकार थांबवण्याचा एकमेव उपाय आहे काय?
साहेबानी म्हटलेले कितपत खरे?
Hundreds of theories, thousands of researches,millions of books will not be able to define human dysfunctions.
याद्या
8302
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मानवी लैंगिक वर्तन
ह्या
अवांतर पण संबधित
माणूस नावाचा प्राणी
अल्पवयीन/श
तात्या ..
In reply to अल्पवयीन/श by विसोबा खेचर
अनुमान
In reply to तात्या .. by टारझन
बोळा
In reply to अनुमान by विनायक प्रभू
च्यायला ...
In reply to बोळा by खरा डॉन
सहमत आहे
In reply to अल्पवयीन/श by विसोबा खेचर
अल्पवयीन्/श
In reply to अल्पवयीन/श by विसोबा खेचर
असल्या
घृणास्पद आहे
जनावर?
माणुसप्राणी!
एका ओळीतल्या
स्पेअरपार्ट
In reply to एका ओळीतल्या by रामदास
ओळी
In reply to एका ओळीतल्या by रामदास
फक्त भारतातच असे घडते असे नाही....
वेगवेगळ्य
आतापर्यन्
अगदी खरे....
In reply to आतापर्यन् by चित्रादेव
नैतिकता/ धर्म हीच मानवाची विशेषता.
हे..