<बाई मी पळाली (एक वैताग विडंबन)>
प्रेरणा: मुखदुर्बळ यांची ही कविता कृ. ह. घ्या.
बाई मी गेले मिसळपाववर
लेखणी घेऊन लिहायला
काव्यविभागात कविता सुचली
भुंगा डसल्यासारखी लिहित सुटली….
बाई मी गेली पाकृ विभागात
घेऊन लाटणे हातात
कमीन्या साखरेची बरणीच फुटली
सोडली साखर नी पळत सुटली….
बाई मी गेली काथ्याकुटात
पास नाय मिळाला प्रतिसादाचा
रस्त्यात कंपुबाजांची गर्दी दिसली
कुटला काथ्या अन पळत सुटली…..
बाई मी गेली साहित्य विभागात
पदर खोचुन टीका करायला
पाचकळ लेखांनी नजर विटली
सोडलं साहित्य नी पळत सुटली…..
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
प्रदीप