लेखकविंजिनेरयांनी मंगळवार, 14/04/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू हा कुणालाही वेड लावणारा असतो.
कोरिया आणि जपानात साकूरा अर्थात चेरी ब्लॉसम जेव्हा फुलतो तेव्हा लोक वसंताच्या आगमनाला सज्ज होतात. ही रंगाची मुक्त उधळण साधारण दर ८-१० दिवसांच्या अंतराने बदलत जाते.
लेखकक्रान्तियांनी मंगळवार, 14/04/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द निळाईने रंगले आभाळ
शांत तळ्याकाठी दिशा विसावल्या
हलकेच जरा छेडता वा-याने
पाण्यात तरंग होऊन सांडल्या
सोन्याची झळाळी माखलेली सांज
फुलवित आली प्राजक्तपाकळ्या
घुमे घंटानाद राउळाच्या दारी
दूर डोंगरात झांजाही वाजल्या
काजळे क्षितिज, अंधाराच्या संगे
गूढ, अनामिक सावल्या जागल्या
एका अवघड वळणावरून
झाल्या तुझ्या माझ्या वाटाही वेगळ्या
तुझ्या वाटेवर आतुर फुलांनी
मुलायम गंधपाकळ्या पेरल्या
माझ्या वाटेवर उदास काळोख,
काट्यांचे कुंपण, भयाच्या सावल्या
तुझी वाट साद सुखाची घालते,
उजळीत लाख चांदण्यांच्या कळ्या
माझी वाट घुटमळते एकटी,
जशा पायी मणामणाच्या साखळ्या
लेखकपहाटवारायांनी मंगळवार, 14/04/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ऊदयजींची गझल :
उजाडले तरी .....>
मला अभिप्रेत नसलेल्या काहि कल्पना या विडंबनात द्रुश्य होत असल्या-कारणाने (ज्या मला आधी बिल्कुल लक्षात आल्या नाहित), मी हे संपादीत करतो आहे.
धागा अप्रकाशीत कसा करावा हे न समज्ल्याने, सध्या संपादित केले आहे.
लेखकदवबिन्दुयांनी मंगळवार, 14/04/2009 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझ नाव माधव पन जुन्या काळि पालन्यात २-३ नाव ठेवायची पध्दत होती. नाव पन कशि तर जड जड आनि मोठ्ठाली. माझ नाव आत्यान ठेवल. बिन्दुमाधव. पन सगळे लोक मला माधव च म्हनतात.
मी मिपावर आलो तेव्हा पाह्यल तर सर्वे लोकानी छानछान नाव घ्येतलेली होती. मग मी माज नाव बिन्दु ठेवनार होतो म्हंजे मी कोन ते कोनाला कळ्लच नस्त. पन बिन्दु नाव आहे एका नटीच. सगळे मला पोरगीच समजले असते. म्हणुन मी बिन्दुला दव जोडला. आनी माझ नाव झाल इथं दवबिन्दु.
आपन लोक जर मिपावर टोपण नावाने असाल तर ते टोपण नाव कस काय सुचल, आनि तेच नाव का घ्यावस वाटल? डिटेलमधी लोवा.
लेखकउमेश कोठीकरयांनी मंगळवार, 14/04/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी तू मर्द गडी
नसांतून मराठी वाहे
नको उपहास साहू
प्रश्न अस्तित्वाचा आहे!
कोणी म्हणे "घाटी साले"
हाण त्यांना खेटराने
महाराष्ट्री मराठीच
कापते का भितीने?
उगीचच इंग्रजाळे
गरज काय सवतीची
लाज वाटते का तुला
थोर माय मराठीची?
सेरेमनी थ्रेड,बर्थडे
सणदेखील इंग्लीश झाले!
दूध असता आईला
भुकटीला भरते आले!
अतिथी हे देव! पण
मान राखा संस्कृतीचा
एकजीव व्हा ना येथे
प्याला दूधसाखरेचा!
शिवछत्रपती कृपा
मराठी "मानाचे" झाले
मर्दा टिकव अस्मिता तू
देव "१०५" बोले!
महाराष्ट्र देश माझा
राज्य हे मराठी आहे
म्हण ताठ गर्जून तू..
होय "मी मराठी आहे...!!"
लेखकउदय सप्रेयांनी मंगळवार, 14/04/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.कर ,
सप्रेम नमस्कार !
सोबत एक गझल जोडत आहे.....पहा जमली आहे का !
उजाडले तरी .....
उजाडले तरी न कां , तांबडे मला दिसे?
केस मोकळें जयांत वदन गुंतले असे !
दरवळतो मोगरा अजूनही उशीवरी
चुरगळल्या कांतीला गंध कसा येतसे?
झुळझुळत्या साडीच स्पर्श मऊ मखमली
दूर जरी झालीस तू , बोलतात की ठसे !
विचारले न मी तुला , बोललीस तू कुठे?
"ये मिठीत - घे मिठीत " उभयतांस हे पिसे !
सळसळत्या बांगड्या रुमझुमती पैंजणे
अजून यौवनांत तू , अजून मी असा फसे !