Skip to main content

सुवर्ण

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 15/05/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोठ्या मुष्किलीने 'सुवर्ण सहकारी' चालू होणार होती तर पहिल्यांदा, निवडणुकीच्या आचारसंहितेने ती तारीख पुढे ढकलावी लागली. आता असे कानावर आले आहे की ,काही मूठभर असंतुष्ट कर्मचार्‍यांनी एका स्थानिक पक्षाकडे धांव घेतली असून त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापनाला धमकावणे सुरु केले आहे. परिणामी ,त्या बँकेने माघार घेतल्यास दोन लाख ठेवीदारांच्या आशेवर बोळा फिरवला जाणार आहे. एकूण आपल्या महाराष्ट्रात 'विघ्नकर्ते' फारच सक्रीय आहेत हे सिध्द होते. जय महाराष्ट्र!!!

काव्य

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 15/05/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीतीच्या ओसंडलेल्या पेल्यातुन थोडी प्रीत खाली सांडते मी तरी काय करु ? त्यालाच जग काव्य म्हणते.

एक खट्याळ त्रिवेणी

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 15/05/2009 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणीचा प्रयत्न करत आहे.. कशी वाटली जरूर सांगा :)
साबणसुखाच्या गुदगुल्यांनी खळखळले हास्य अन् रोमांचत्वचेवर फुलला प्रणय, खळबळ टबात. छ्या ! मॅटिनीचे चित्रपट म्हणजे कॉलेजकुमारांना नुसता त्रास !
-- लिखाळ.
Taxonomy upgrade extras

एक होती वैदेही.. (कथा)

लेखक नीधप यांनी शुक्रवार, 15/05/2009 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
"कसं वळलात गाण्याकडे? तुमच्या घरी गाण्याची पार्श्वभूमी आहे का?" "नाही हो घरात कोणीच गाणारं नाही. बाबांना गाण्याची आवड होती त्यामुळे त्यांनी क्लासला घातलं. मी आपलं जमेल ते शिकत होते. पण माझ्या गुरूंनी माझ्यातली गायिका ओळखली आणि मला जवळजवळ दत्तकच मागून घेतलं बाबांच्याकडून. तेव्हापासून रियाझ कधी थांबला नाही." घरी आलेल्या मुलाखतकाराला वैदेही म्हणजे सुप्रसिद्ध गायिका वैदेही सरनाईक उत्तरं देत होती. मधूनच फोन घेत होती. अभिनंदनासाठी येणार्‍यांचं चहापाणी बघितलं जातंय ना यावरही देखरेख करत होती. पुरस्कार, अभिनंदनाचा वर्षाव, लोकांचं प्रेम या सगळ्यांनी भारावली होती वैदेही. एकुणात आज उत्सवाचा दिवस होता.

तुझ्या जगात कधी असेन मी,नसेन मी...

लेखक नवाब अमोल यांनी शुक्रवार, 15/05/2009 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या जगात कधी असेन मी,नसेन मी... पण तुझ्यात नेहमी असेन मी,नसेन मी... संपतील डोळ्यातली आसवे सारी तरी पापणीच्या कडेवर असेन मी,नसेन मी... झटकून टाकशील माझा विचार..केसातल्या पाण्यापरी... त्या बटांच्या सावलीशी .. असेन मी,नसेन मी... विसरशीस मला दिलेले शब्द सारे तु.. तरी ओठांच्या किनारी असेन मी,नसेन मी... काढुन टाक ह्रदयातून तू मला... तरी आतवर खोल कुठे असेन मी,नसेन मी... विसरून जाशील सर्व त्या क्षणांना... अन् तरी श्वासात तुझ्या .. असेन मी,नसेन मी...
Taxonomy upgrade extras

काही क्षण.

लेखक जागु यांनी शुक्रवार, 15/05/2009 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
असेही काही क्षण आयुष्यात असतात मनाच्या आकाशात लुकलुकत असतात अवखळ क्षण, खळखळाट भरलेले मनाला भिडलेला चंचलपणा मौज-मस्तीचा उधाण वारा दिशाहीन कुठेही वाहणारा श्वास रोखणारे सुखही असते गुदमरुन, हृदयी कोंडलेले भार पेलवत नाही सुखाचा म्हणुन नयन कडांतुन ओसांडलेले. क्षण असतात सुख-दु:ख एकोप्याचे दु:खातून सुख शोधण्याचे सुखातील दु:ख जाणण्याचे सुख-दु:ख आनंदण्याचे.
Taxonomy upgrade extras

होय निगेटीव्हच

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 15/05/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापुर्वी मी लोकप्रभात आलेल्या पराग पाटील यांच्या नकारात्मक मतावर भाष्य करणार्‍या लेखावर माझा प्रतिसाद दिला होता .तोच प्रतिसाद येथे देत आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हाच लेख आज प्रतिसादाच्या रुपाने का होइना लोकप्रभात प्रकाशीत झालेला आहे.आज आलेल्या अंकात तुम्ही तो वाचु शकता. मुळ लेख- http://www.loksatta.com/lokprabha/20090501/mind.htm माझा प्रतिसाद- http://www.loksatta.com/lokprabha/20090522/vachak.htm

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक सँडी यांनी शुक्रवार, 15/05/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
म.टा.चित्र. हिंदी सिनेसृष्टीवर ९० च्या दशकात अधिराज्य गाजवणा-या 'लाखो दिलांची धडकन' माधुरीचा आज ४२ वा वाढदिवस! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

त्रिशंकू लोकसभा आणि राष्ट्रपती

लेखक क्लिंटन यांनी शुक्रवार, 15/05/2009 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शनीवारी १६ मे रोजी १५ व्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू होईल.यावेळी त्रिशंकू लोकसभा येणार हे तर समोरच दिसत आहे. अशा प्रसंगी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.कारण राज्यघटनेप्रमाणे सरकार बनविण्यासाठी कोणाला बोलावायचे हा अधिकार पूर्णपणे राष्ट्रपतींचा आहे. यापूर्वी १९८९,१९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांनंतर तत्कालीन राष्ट्रपती आर.वेंकटरामन, शंकरदयाळ शर्मा आणि के.आर.नारायणन यांनी अशा स्वरूपाच्या परिस्थितीत निर्णय दिले होते.

माझी मद्रास ची सफर- भाग २

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 15/05/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, पहिल्या भागाच्या भरभरून प्रतिसादाबद्द्ल शतशः धन्यवाद... लिहिंण्यापूर्वी साशंक होते पण आता मात्र हुरूप आलाय... मला दोन-तीन वर्षांपूर्वीचे ऑर्कुट्वरच्या नव्या नवलाईचे दिवस आठवले.. तेव्हा नवीन खरड आलीय का जितक्या उत्सुक्तेने दर तासाला तपासायचे..तसंच आता ईथे नवा प्रतिसादाच्या बाबतीत होतेय.. :D असो.. एक-दोन दिवसांत आमची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली... नि आधी सांगितल्याप्रमाणे, मी आणि एक गुज्जुभाई सोडला तर सारेच दक्षिणी होते. आता आधी या प्रशिक्षणाबद्दल थोडंसं... ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ते आयोजित केले जाते, त्यांनी जर एक वर्षभर आधी त्यबद्दलचा अर्ज केला..