काही क्षण.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
असेही काही क्षण आयुष्यात असतात
मनाच्या आकाशात लुकलुकत असतात
अवखळ क्षण, खळखळाट भरलेले
मनाला भिडलेला चंचलपणा
मौज-मस्तीचा उधाण वारा
दिशाहीन कुठेही वाहणारा
श्वास रोखणारे सुखही असते
गुदमरुन, हृदयी कोंडलेले
भार पेलवत नाही सुखाचा
म्हणुन नयन कडांतुन ओसांडलेले.
क्षण असतात सुख-दु:ख एकोप्याचे
दु:खातून सुख शोधण्याचे
सुखातील दु:ख जाणण्याचे
सुख-दु:ख आनंदण्याचे.
वाचने
2027
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
क्षण असतात
In reply to क्षण असतात by मदनबाण
+१
क्षण असतात
सुन्दर!
मौज-मस्तीच
छान..