Skip to main content

हल्लाबोल -२

लेखक अनंता यांनी शुक्रवार, 22/05/2009 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
सदरहू लेखाचे श्रेयापश्रेय विप्र यांचे असून मी निमित्तमात्र आहे. ;) तरीही हा लेख (?) वाचून काही विप्रीत घडले तर, लेखकाला जबाबदार धरता येणार नाही. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहीजेत प्रभूमास्तरांसाठी !! ------------------------------------------------------------------------------------------------ ढेकणाधिपतींनी घसा खाकरला आणि सभा सुरु केली. ________________________________________________________ मिपाच्या २ र्‍या वर्धापन दिनानिमित्त तात्या अभ्यंकरांनी 'मिपा विश्वसंमेलन 'भरवायचे ठरवले. दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. निवासित अनिवासित सर्व सद्स्य संमेलनाला येणार होते.

अर्थ

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 22/05/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही. जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

प्रगती ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/05/2009 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
ए sssssssssssssssss टकी, सळ्ळै sssssssssssssssssssssssss य्या ! नेहेमीप्रमाणे ललकारी ऐकु आली आणि मी बाहेर आलो. " नमस्कार आज्जी, आज काय म्हणताय? काय काय आहे आज डोक्यावरच्या पाटीत? आणि काय काय चाललंय तुमच्या, पाटीखालच्या डोक्यात?" सुरुवातीला, साधारणपणे दोन वर्षापुर्वी कुर्ल्याच्या पोलीस क्वार्टर्समधुन इकडे शिफ्ट झालो, तेव्हा आज्जी काय म्हणताहेत ते कळायचेच नाही.

झबडं - टोपलं

लेखक अरुण वडुलेकर यांनी शुक्रवार, 22/05/2009 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
घरांत महिला वर्गाची लगबग चाललेली. निमित्त कुणाच्या तरी बारशाला जाण्याची. "बाबा, बाळंत विडा काय घ्यायचा?" सूनबाईंची पृच्छा (अर्थात्‌ उगाचच ) "घ्या एक झबडं टोपलं" सूनबाईंचं चमकून पाहाणं. "मग वांदीचा चाळा नको कां?"सूनबाई. चेहर्‍यावर एक खट्याळ हसूं. मी पहिल्या क्षणी भांबावलेला. दुसर्‍या क्षणी ओशाळवाणा. तिसर्‍या क्षणी एक सार्वजनिक हास्य स्फोट. वाचकहो, तुम्ही कधी अशा प्रसंगातून गेला आहांत?

लिलाव.....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/05/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीतरी ...... मला पण विचारा ना रे मला काय हवंय ते ! निर्जीव ..... विकल्या जाणार्‍या वस्तुंमध्ये नाहीये मी ! त्यांनाही ..... नाही जमले कधी या गांधीला खरीदणे ! महाग ..... होता खुपच तेव्हाही हा निष्कांचन म्हातारा ! एकटा ..... पडलोय मी आता त्या कागदी तुकड्यांवर ! कंटाळा ..... येतो एकटे बसण्याचा कार्यालयांच्या भिंतीवर ! नकोय ..... नोटेवरचा एकटेपणा भिंतीवरचा अलिप्तपणा ! हृदयात ..... थोडीशी तुमच्या विचारात हवीय जागा आचरणात ! विशाल

कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 22/05/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो आपण नेहमी भांडवलदार ,कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट हे शब्द वापरतो भांडवलदार म्हणजे हे बहुतेकाना माहित असते पण कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट यांच्यातील नक्की फरक उमजत नाही मागे एक विनोद म्हणून त्यांची व्याख्या अशी केली होती समज तुमच्या कडे दोन दुभत्यागायी आहेत तर सर्वसामान्य : एका गायीचे दूध घरातल्या लहान थोरांसाठी ठेवेल दुसर्‍या गाईचे दूध बाजारात विकेल भांडवलदार : त्या दोन्ही गाईचे दूध बाजारात विकेल. व तिसरी गाय आणायचे मनात बाळगुन असेल कम्युनिष्ट : तुमच्या दोन्ही गायी जप्त करून गावातल्या गोठ्यात बांधतील आणि तुमच्याकडून गोठा साफ करवून घेतील .

तुझी माझी प्रित

लेखक जागु यांनी शुक्रवार, 22/05/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी प्रित राधा कृष्णाची रास व्हावी वेणू च्या नादी तुझ्या माझ्या पैंजणांची छूमछूम झंकारावी. तुझी माझी प्रित राम सितेचा आदर्श व्हावी वनवासातील पर्णकूटीलाही तृप्ततेची झालर झळकावी. तुझी माझी प्रित गौरी-शंकरासम पुण्य व्हावी हिमालयाच्या शिखरावरही तुझी माझी प्रित नांदावी. तुझी माझी प्रित विठोबा-रखूमाई भोळी वसून स्वतंत्र मंदीरी जय जय विठोबा-रखुमाई गर्जावी.
Taxonomy upgrade extras

जमा खर्च

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/05/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या समाधीवरची फुले समाधीवर उधळलेला गुलाल... सोबत, रंग उडालेले; फिकुटलेले कुंकू, तिच्या कपाळावरले..... तिने ढाळलेली असंख्य कढत कढत आंसवे! त्यावर तिच्या वाट्याला,... सहानुभूतीचे फक्त कोरडे शब्द; त्याच्या हौतात्म्याची किंमत म्हणून.... !! ह्या बलिदानाचा जमाखर्च कधी लागणार? सुकल्या आंसवांशिवाय तिच्या ओच्यात काहीच नाही का पडणार?........ विशाल

हल्ला बोल

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 22/05/2009 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
ढेकणाधिपतींनी घसा खाकरला आणि सभा सुरु केली. ________________________________________________________ मिपाच्या २ र्‍या वर्धापन दिनानिमित्त तात्या अभ्यंकरांनी 'मिपा विश्वसंमेलन 'भरवायचे ठरवले. दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. निवासित अनिवासित सर्व सद्स्य संमेलनाला येणार होते. तात्यांनी कौल घेतला. विश्वसंमेलन पुण्याला करायचे ठरवले. सामिष, आमिष व शाकाहारी मेन्यु ठरला. हॉटेल बुकींग क्लार्क शी संभाषण करताना खुर्चीतल्या ढेकणाला ही बातमी कळाली. मंदीमुळे गेले २ वर्षे ह्या हॉटेल मधे 'पेस्ट कंट्रोल' झाले नव्हेते. तात्याना बघताच ढेकुण खुष झाला. येत्या मेजवानीची खबर त्याने सर्व ढेकुण समाजाला पोचवली.