मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लिलाव.....!

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कुणीतरी ...... मला पण विचारा ना रे मला काय हवंय ते ! निर्जीव ..... विकल्या जाणार्‍या वस्तुंमध्ये नाहीये मी ! त्यांनाही ..... नाही जमले कधी या गांधीला खरीदणे ! महाग ..... होता खुपच तेव्हाही हा निष्कांचन म्हातारा ! एकटा ..... पडलोय मी आता त्या कागदी तुकड्यांवर ! कंटाळा ..... येतो एकटे बसण्याचा कार्यालयांच्या भिंतीवर ! नकोय ..... नोटेवरचा एकटेपणा भिंतीवरचा अलिप्तपणा ! हृदयात ..... थोडीशी तुमच्या विचारात हवीय जागा आचरणात ! विशाल

वाचने 1929 वाचनखूण प्रतिक्रिया 7

क्रान्ति 22/05/2009 - 15:55
मस्त कविता! अगदी सही. खूप खूप आवडली. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

रेवती 22/05/2009 - 18:38
वा! वा! विशालभौ मस्तच कविता. कवितेचं आणि माझं वाकडं नसलं तरी सख्यही नाही पण आपल्या कविता मी आवर्जून वाचते. (प्रतिक्रिया काय द्यायची असते हे न कळल्याने फारशी कधी देत नाही.) रेवती

प्राजु 23/05/2009 - 01:03
सुरेख!! विशाल, कविता खूप काही सांगून जाते. खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 23/05/2009 - 08:57
वेगळीच कविता. आवडली..! तात्या.

विशाल कुलकर्णी 25/05/2009 - 10:19
कस्चं कस्चं... आता तुमी कौतुक करताच आहात तर आपलं ठांकु ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)