Skip to main content

मोक्ष

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 25/05/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
मातलेला अंधार नी बावरलेपण प्रकाशाचे स्वप्नात जागणार्‍या..,रात्रीत बुडूनी गेलो बेधूंद वाहत्या वारियाला कुंपण अभाळाचे ऐकुन साद चांदण्याची ..,मोहरूनी गेलो समीराची झुळूक चावरी, कुजबुजणे खगांचे आळसावली जाग..,मागे अंधार सोडूनी गेलो ओसाड वाळवंटी ... थांबे फसव्या मृगजळाचे विझुन गेली आग..,धुमसायचे विसरूनी गेलो समाधिस्त मी...,स्विकारले आमंत्रण अद्वैताचे पाश तुटले सारे.., मोहमायेतुन उठूनी गेलो विशाल.

पाठीला साबण चोळण्याचे सहा प्रकार

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 25/05/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या इसमाने "जीवनोन्नत्तीचे सहा सोपान" असे कायसेसे लिहुन ठेवले आहे. भाई काकांच्या गटण्याने ते तोंडपाठ केले होते म्हणे. काल अचानक प्रदीर्घ अभ्यासान्ती मला असेच काही सोपान गवसले. माणसे त्यांच्या स्वभावानुसार अभ्यास करत असतात. पाश्चात्य देशांत तर प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान शोधले जात. उदा : भरभर चालण्याचे वैज्ञानीक तीन प्रकार शास्त्रीय रित्या आळस कसा द्यावा. जेवताना ढेकर कसा द्यावा. घोरण्याचे शास्त्रीय फायदे ईत्यादी. आंघोळीचेही बरेच प्रकार आहेत.

बड्डे

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 25/05/2009 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी बायकोने बड्डे 'अमृत' केला आणि लक्षात आले की के.ई.एम. मधे सकाळी ७.१५ पहिले ट्यांहां केलेल्याला ५४ पुर्ण आली. डॉक्टरने उलटा लटकवुन पाठीवर मारल्यावर किचीत रडलो होतो असे आई म्हणायची. म्हणजे निषेधापुरताच. सिंह चालताना मागे वळुन बघतो त्याला म्हणतो त्याला सिंहावलोकन म्हणतात. तस कुत्र पण चालताना मागे वळुन बघते. त्यामुळे गेल्या ५४ वर्षात काय मिळाले आणि काय गमावले ह्याच्या हिशोबाला मी 'कुत्र्यावलोकन'च म्हणेन. उगाच साला आपल्याला सिंह समजणार्‍यापैकी मी नव्हे. _____________________________________________________ " काल तुम्ही स्वःतशी जरा जास्तच हसत होतात, खरे सांगा, कुणाची खेचलीत"?