मातलेला अंधार नी बावरलेपण प्रकाशाचे
स्वप्नात जागणार्या..,रात्रीत बुडूनी गेलो
बेधूंद वाहत्या वारियाला कुंपण अभाळाचे
ऐकुन साद चांदण्याची ..,मोहरूनी गेलो
समीराची झुळूक चावरी, कुजबुजणे खगांचे
आळसावली जाग..,मागे अंधार सोडूनी गेलो
ओसाड वाळवंटी ... थांबे फसव्या मृगजळाचे
विझुन गेली आग..,धुमसायचे विसरूनी गेलो
समाधिस्त मी...,स्विकारले आमंत्रण अद्वैताचे
पाश तुटले सारे.., मोहमायेतुन उठूनी गेलो
विशाल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2128
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! मस्त !!
धन्यवाद
मस्त !
कस्चं..
हे बाकी बेष्ट
हा काय
हिमालयात
समाधिस्त
अतिशय
धन्यवाद