Skip to main content

मराठ्यांना शिवसेनेने खचविले

लेखक टायगर यांनी मंगळवार, 26/05/2009 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिवरायांचा आदर्श बाळगणारा मराठी माणूस अक्षरक्ष: खचला आहे. कारण त्याला न्यूनगंडाने पछाडले आहे. स्वत:च्या कर्तृत्वावर त्याचा तीळमात्र विश्‍वास राहिलेले नाही. त्यामुळे शिवाजी महाराजानंतर शिवसेनाच आपली तारण हार आहे, असे त्याला वाटते. परंतु मराठी माणसाने वेळीत या मानसिकतेतून बाहेर यावे. कारण शिवसेना ही काही मराठी माणसांचे उन्नयन करणारी संघटना कधीच नव्हती. या संघटनेमुळे ठाकरे यांना पोट भरण्याचा स्त्रोत मिळाला आणि राजकारणात डावपेच खेळण्यासाठी मराठी माणूस मिळाला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बाळासाहेबांसह ठाकरे कुटुंबातील कोणत्याचा वक्तव्याला मराठी माणसाने भुलू नये.

निशाणी डावा अंगठा

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 26/05/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी बोलता बोलता सहज एखाद्या पुस्तकाविषयी समजतं. आपल्याला कुणीतरी सांगतं की ते पुस्तक नक्की वाच. आपण हरप्रयत्नाने पुस्तक मिळवतो आणि पुस्तक भन्नाट म्हणजे भन्नाटच निघतं. अशा वेळी पुस्तक नक्की वाचायला सांगणाऱ्याचे आभार कसे मानायचे तेही कळत नाही ! 'निशाणी डावा अंगठा' या पुस्तकाबद्दल असं म्हणजे सेम असंच झालं ! आधी तर चक्क आप्पा बळवंत चौकात चार-पाच दुकानं फिरूनही ते पुस्तक मिळत नव्हतं. बरं, हातात फार वेळही नव्हता, त्यामुळे आता पुढच्या सुट्टीतच पुण्याला आल्यावर 'निशाणी....' वाचायला मिळणार अशी लक्षणं दिसायला लागली होती.

मार्केट?

लेखक अभिज्ञ यांनी मंगळवार, 26/05/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मी मार्च मध्ये काहि शेअर्स काढले व आलेले पैशे वार्षिक गुंतवणुकिसाठी म्युच्युअल फंडाकडे वळवले.(करसवलत घेण्याकरिता) त्यावेळी बाजाराचा निर्देशांक जवळपास ८००० ते ८५०० च्या आसपास होता. अर्थातच एनअव्ही त्यावेळि दहाच्याहि खाली होता. महिन्याभरातच मार्केट हे काहिहि सकारात्मक कारण नसताना १२००० ते १२५०० च्या आसपास चढले. अन नवीन सरकार आल्यावर तर एकाच दिवसात जवळपास २००० अंकांनी वाढले.

धूतवस्त्रांकिता

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 26/05/2009 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
निम्नबावरी सुप्तपहाडी कलियुग सडता बोगनवेली तप्तशहाळी वित्तडहाळी अलगद शीतल भूतलबोली समतादुस्तर प्रतीकअस्तर प्रीतलावणी दुष्टकापणी सचिंत अधरी बलाक समरी चपखल बाला मूर्तवारुणी झाला जोडे आलाप ताना तरुवर प्रस्तर दृष्यआननी की रोगाची भलती चिन्धी दुर्धर तव परमाणुचाचणी निरलस अनघड कलाकऋजुता तीव्राषाढा धूसर चोली प्रत्येकाची कांचनवटवट तीव्रदुधारी तरुवरढोली मथुरापर्वा चाळणदूर्वा भ्रष्टचिकोडी लोळणफ़ुगडी गलितगात्र शतसूर्यविहारी वस्त्रवृत्र अवकाशरांगडी भिन्नशहारी साजणगर्वी तप्तसहाणी उगळचंदनी धूतवस्त्र उलगडे शरीरी लोभसबाला आरसपानी २६ मे २००९, पुणे
Taxonomy upgrade extras

आजी !

लेखक अ-मोल यांनी मंगळवार, 26/05/2009 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजी म्हणजे पापणीमधल्या आसवाचा बिंदू असतो डोळयामध्ये साठवलेला मायेचा सिंधू असतो आजी म्हणजे बोबड बोली सापडलेलं नाव असतं अंगाईच्या थापटण्यात दाटलेला भाव असतं आजी म्हणजे देव्हारयातल्या श्रदृधेचं फुल असतं सुरकुत्यांच्या जाळीआडचं हवंहवंसं मूल असतं आजी म्हणजे कौतुकाचा खजिना एक खुला असतो आठवणींच्या फांदीवर हिंदोळणारा झुला असतो आजी म्हणजे प्रौढत्वीही मूल बनायला वाव असतो... ...क्षितिजापार गेल्यावरती ठसठसणारा घाव असतो!
Taxonomy upgrade extras

पालकांनी उत्तीर्ण करण्याची अकरावी प्रवेशपरिक्षा: काही प्रश्न व सुचना

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 26/05/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
अकरावी प्रवेश सुरळीत व कमी कटकटीचा होण्यासाठी अनेक घटक, शासन, महाविद्यालये आपपल्या परीने प्रयत्न करीत असतातच. परंतू मला काही सुचना द्यायच्या आहेत व काही साधे प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्नांच्या उत्तरासाठी जाणकार मिपाकर ह्यांच्या मदतीची अपेक्षा आहे व सुचनांची पडताळणी व्हावी आणि आपणही सुचना ह्या धाग्यात द्याव्यात. जर त्या सुचना यदाकदाचित योग्य व्यक्तिंनी पाहिल्या तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल अशी माफक अपेक्षा मला आहे. ***[संगणकाव्दारे वर्गीकरण करुन प्रवेश देण्याची बातमी वाचली आहे. ते जर होऊ शकले नाही तर काही सुचना व प्रश्न लागू पडतील]*** प्रश्न: १.

मिसळपाव प्रतिष्ठान..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/05/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.

थांबुनी येथे जराशी

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 26/05/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी मिसळ पाव वर आमच्या स्वताच्या भाषेत लिहायचा हा छोटासा आणी पहिलाच प्रयत्न आहे बघा जमलाय का ते हे कॉपी पेस्ट नाहि बर नाहि तर उगाच ओरडाल ( सहकार्य मार्गदर्शन परिकथेतील राजकुमार ह्यांचे आहे) आमची प्रेरणा थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा हि आहे थांबुनी येथे जराशी दारु पिवुन जा आणि ना प्यायचे तर वळण हे टाळून जा बांधलेल्या ह्या बारच्या टेबलाला हळूसा स्पर्श तू करुनी जा अन्यथा सार्‍या स्मृतीना तु विसरुन जा टेबलाच्या वरती बाटली जागते तव चिंतनी संपवाया टेबलावर सावली ढाळून जा जोवरी होती भरली, तुझ्यावर लुब्ध होउनि राहिली तू पिण्याला उशिर
Taxonomy upgrade extras