धूतवस्त्रांकिता
लेखनविषय:
निम्नबावरी सुप्तपहाडी कलियुग सडता बोगनवेली
तप्तशहाळी वित्तडहाळी अलगद शीतल भूतलबोली
समतादुस्तर प्रतीकअस्तर प्रीतलावणी दुष्टकापणी
सचिंत अधरी बलाक समरी चपखल बाला मूर्तवारुणी
झाला जोडे आलाप ताना तरुवर प्रस्तर दृष्यआननी
की रोगाची भलती चिन्धी दुर्धर तव परमाणुचाचणी
निरलस अनघड कलाकऋजुता तीव्राषाढा धूसर चोली
प्रत्येकाची कांचनवटवट तीव्रदुधारी तरुवरढोली
मथुरापर्वा चाळणदूर्वा भ्रष्टचिकोडी लोळणफ़ुगडी
गलितगात्र शतसूर्यविहारी वस्त्रवृत्र अवकाशरांगडी
भिन्नशहारी साजणगर्वी तप्तसहाणी उगळचंदनी
धूतवस्त्र उलगडे शरीरी लोभसबाला आरसपानी
२६ मे २००९, पुणे
वाचन
4381
प्रतिक्रिया
0