आजचे शुभदिनी योगानंद विद्यापिठाची स्थापना व प्रवेशाची अधिसुचना जाहिर करताना आम्हाला अत्यंत हर्ष(वायू) होत आहे.
बहूत समयानंतर आमचे या स्वप्नपूर्तीचे क्षणी आमचे नयनातून आनंदाश्रूचा महापूर वहात आहे.
या विद्यापिठातिल सोई व सुविधा:
निसर्गरम्य हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर (डोळे फाड फाडून पहात रहावा असा).
डोळे फाडून, वटारुन, टवकारुनहि दृष्टीक्षेपात मावणार नाहि एवढा कँपसचा परिसर.
आस्थाश्री, आस्थाभूषण, संस्कार गौरव, पंडिताचार्य - आध्यापक व्रतस्थ वर्ग (शोधून शोधून आण्लले आहेत).
प्रवेश प्रक्रिया व प्रवेश योग्यता:
१० वी पास नापास ते पदवीधर, द्वीपदवी