Skip to main content

म्युचल फंडा बाबत माहिती देणारे संकेतस्थळ

लेखक सदानंद ठाकूर यांनी बुधवार, 22/07/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
म्युचल फंडाचे प्रकार, म्युचल फंडात गुंतवणूक का करावी, योजना कशी निवडावी थोडक्यात म्युचल फंडाबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी मी मराठी मध्ये एक नवीन व याप्रकारचे पहिलेच संकेतस्थळ बनविले असून या ठिकाणी आपण सभासदत्व घेऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता तसेच म्युचल फंड गुंतवणुकी संदर्भात प्रश्न विचारू शकता व चर्चेतही सहभागी होऊ शकता. येथे टिचकी मारून आपण संकेतस्थळावर जाऊ शकता. तुमचा सहभाग आम्हाला सुधारणा करण्यास मदतच करेल. सदानंद

"पाय" दिवस

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 22/07/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज २२ जुलै, २२/७. शाळेत आपली वर्तुळाच्या परिघाशी ओळख याच अपूर्णांकामुळे होते, २२/७, "पाय". याच "पाय"चा आणखी एक दिवस मानता येईल, १४ मार्च. पायची किंमत आहे ३.१४१५९२६५.... पहिले तीनच आकडे घेतले आणि अमेरीकन पद्धतीने तारीख लिहीली तर १४ मार्च होते ३/१४ ... झाला आणखी एक पाय दिवस. तर या पायचं महत्व प्राचीन भारतीय गणितज्ञानांही समजलं होतं. वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर असतं पाय आणि प्राचीन भारतीयांनीही, कोणत्याही संगणक, गणकयंत्राच्या मदतीशिवाय पायची किंमत अनेक स्थानांपर्यंत लिहून ठेवली आहे. प्राचीन इजिप्शियन, बॅबिलोनियन आणि ग्रीकांनाही पायची महती आणि किंमत माहीत होती.

एक अनुभव

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 22/07/2009 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी PMT नं डेक्कनला चाल्लो होतो.. मी पुरुषांच्याच seat वर बसलो होतो... बस एकदम full भरली होती... महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बरेच पुरुष बसले होते... एका स्टाँपवर आजीबाई चढल्या... माझ्या seat जवळ येऊन उभ्या राहील्या... मला वाटलं की त्या कोणाला तरी उठवतील (राखीव seats वर बसलेल्यांपैक्की )... पण नाही.... त्या तश्याच उभ्या राहील्या... मग मीच उठून आजीबाईंना बसायला दीलं (एकतर....महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बसलेल्या एकातरी पुरुषानं आजीबाईंना बसायला द्यासला हवं होतं..

पावसाळ्यातली नरसोबाची वाडी

लेखक श्रीमंत दामोदर पंत यांनी बुधवार, 22/07/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो.... माझा मिपावर काहीतरी लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे चुकभुल दे.घे. :) नरसोबाची वाडी !!!! सांगलीपासुन साधारणतः ३० किमी अंतरावर वसलेलं एक छोटसं गाव... गावापेक्षाही नावाप्रमाणेच वाडी आहे... पण अतिशय प्रसिद्धीला आलं ते दत्त महाराजांच्या तिथल्या वास्तव्यामुळं.... तसा मी नेहमी वाडीला जाणारा... पण पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथे जाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही ( अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ) इतरवेळी संथ वाहणारी कृष्णामाई पावसाळ्यात मात्र रुद्र रुप धारण करुन वाहते. वाडीचं मंदिर अगदी नदीकाठी असल्यानी दरवर्षीच्या पुरात पाण्याखाली जातं.

मुकेश चंद्र माथुर

लेखक टवाळचिखलू यांनी बुधवार, 22/07/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज २२ जुलै, मुकेश चंद्र माथुर म्हणजेच पार्श्वगायक मुकेश यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांची आठवण म्हणुन हा धागा. त्यांनी गायलेल्या काही गजला इथे उपलब्ध आहेत. शेवटी असेच म्हणेल .... ओ जानेवाले हो सके तो लौट के आना ...... .... .... चाहे तु आये न आये ... हम करेंगे इंतजार ....

प्रासंगिक

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 22/07/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रासंगिक येथ ’पौरुषास अटक’, सांगून गेले जे तिथे । ’कोरडे’ पाहून जगणे, क्रंदू लागती ते तिथे ॥ सुहृदांनो काय सांगू, भावना आमच्या इथे । तेव्हाही होतो ’थक्क’, ’चकीत’ झालो या इथे ॥ १ ॥ जे खुशीने विहरती वा, सुखे संचरती तिथे । तेच वैभव मातृभूचे वाढवू शकती तिथे ॥ खंत खुलवत नांदणे, तिथले बरे ना येथले । नांदा खुशीने तेथ वा, सत्वर निघुनी या इथे ॥ २ ॥ वाहिले लाटेवरी अन्‌ पोहोचले, असती जिथे । ओढ घेऊन जे घराची, पाहती स्वप्ने तिथे ॥ त्यांस सल्ला हाच की, सावरा वल्ही तिथे । सत्वरे ती वल्हवा अन्‌, लवकरी पोहोचा इथे ॥ ३ ॥ भावना तुमच्या समजल्या, आम्हीही व्याकुळ इथे । काय राहणे ते विदेशी, त

वाचले जाते विडंबन, मान ते स्थळ आपुले

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 22/07/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा धोंडोपंत यांची सुरेख गझल बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले सुजवले इतके.... मला की चेहरा उरला कुठे? ओळखावा अन स्वःता इतका बरा उरला कुठे? दुष्ट सासू आज बघ ही नेमकी आली घरी झोपण्या आम्हा घरी मग कोपरा उरला कुठे? ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे? आमची घाईच नडली काल पार्किंगच्यामधे हात मग तो ठणकणारा वापरा उरला कुठे? वाचले जाते विडंबन, मान ते स्थळ आपुले 'केशवा' जाली तुला रे, आसरा उरला कुठे? ----केशवसुमार

दोन दिवसांचा चांगला ट्रेक - वा़की -शेवत्या घाट - केळद - मढेघाट

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 22/07/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्तहो, हर्षद आनंदी ह्यांनी कलादालनमध्ये टाकलेले मढेघाटातले अप्रतिम फोटो बघून आणि त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेली माहिती आणि त्याला मिळालेले प्रतिसादातील प्रश्न वाचून मला मढेघाटाविषयी ल्याहावेसे वाटले, ते असे, एक म्हणजे शेवत्या घाट आणि मढे घाट हे दोन्हीही घाट वेगळे आहेत. केळदमधून को़कणात उतरायला तीन घाटवाटा आहेत. १. उपांड्याची नाळ, २. शेवत्या घाट आणि तिसरी ३. मढेघाट, पैकी मढेघाटाची वाट इतर दोन्ही घाटवाटांपेक्षा जास्त बरी आहे. उर्वरीत दोन वाटा त्यामानाने जरा अवघड आहेत. पण दोन्हीही घाटातला एक ऊत्तम ट्रेक होऊ शकतो.

पुणे - शिवथरघळ - पुणे

लेखक सातारकर यांनी बुधवार, 22/07/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार रिकामाच होता म्हणून शिवथरघळीला जाउन यायच ठरवल. आमच्या रीतीप्रमाणे ऐनवेळेला लढाईच्या आधीच दोन मावळे गारद. शेवटी पाचाच्या तिथ तिघच निघालो आणि स्वर्गात जाउन आलो. पाउस फार नव्हता पण तरीही जे काही समोर आल त्यांन डोळ्याच पारण फेडल.

सुर्यग्रहण २००९ - ताजी छायाचित्रे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 22/07/2009 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण फक्त ३.४० मिनीट चालले. यानंतर सुमार १५० वर्षांनंतरच खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण भारतात होणार आहे. (चु.भू.दे.घे.) डिस्के. खालील छाया. बघतांना गॉगल वैग्रे लावावा. डोळ्यांना ईजा झाल्यास धागालेखक जबाबदार नाही. :B छाया. १ सुर्यग्रहण सुरु होतांना छाया. २ छाया.